इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्यासह इतर तीन अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष रईसी अजरबैजानमधून परतत असताना त्यांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर कोसळले. त्यांचे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले. हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या जागतिक नेत्यांच्या आणि सेलिब्रिटींच्या लांबलचक यादीत रईसी यांच्या नावाचाही आता समावेश झाला आहे. यामध्ये प्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट, लेबनॉनचे माजी पंतप्रधान रशीद करामी आणि चिलीचे माजी अध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा यांचा समावेश आहे. परंतु, अपघातांचा इतिहास असूनही राजकारणी प्रवासासाठी हेलिकॉप्टरलाच पसंती का देतात? हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण होतो. याविषयीच जाणून घेऊ या.

फेब्रुवारी २०२४ मध्ये चिलीचे माजी अध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे हेलिकॉप्टर दक्षिण चिलीमधील तलावात कोसळले. ते चिलीच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते, त्यांनी सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषवले होते. २०२० मध्ये प्रतिष्ठित अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू कोबे ब्रायंट आणि त्यांच्या मुलीचे कॅलिफोर्नियातील कॅलाबास येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. २०१८ मध्ये लीसेस्टर सिटी फुटबॉल क्लबचे मालक विचाई श्रीवद्धनाप्रभा यांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Abu Asim Azmi
Abu Azmi : “कोण विरोधक? त्यांनी आम्हाला…”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत? आमदारकीची शपथही घेतली
bhandara Mobile phone explodes in pocket Principal died
धक्कादायक! दुचाकीरून जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट; मुख्यध्यापकाचा मृत्यू
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात
हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या जागतिक नेत्यांची आणि सेलिब्रिटींची यादी लांबलचक आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाचा इराणवर काय परिणाम होणार?

त्याचप्रमाणे २००५ मध्ये सुदानचे नेते जॉन गारांग डी माबिओर हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले होते. हेलिकॉप्टरला अपघात झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांची भेट घेतल्यानंतर ते युगांडाच्या अध्यक्षीय एमआय-१७२ हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. जून १९८७ मध्ये लेबनॉनचे पंतप्रधान रशीद करामी हेलिकॉप्टरने बेरूतला येथे जाताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या अनेक घटना असूनही, अनेक नेत्यांसाठी हेलिकॉप्टर हा प्रवासाचा पसंतीचा पर्याय राहिला आहे. राजकारण्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर करण्यामागे चार प्रमुख कारणे असल्याचे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.

हेलिकॉप्टरलाच पसंती का?

सर्वप्रथम हेलिकॉप्टर अशा ठिकाणी पोहोचू शकतात, जिथे कार किंवा विमाने पोहोचू शकत नाहीत. विमानाला विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी धावपट्टीची आवश्यकता असते. परंतु, हेलिकॉप्टरच्या बाबतीत असे नाही. ते कोणत्याही सपाट पृष्ठभागावर उतरू शकतात, विशेषत: निवडणुका आणि प्रचाराच्या वेळी हेलिकॉप्टर प्रवास वाहतुकीचा सर्वात पसंतीचा पर्याय ठरतो. भारतात लोकसभा निवडणुका होत असताना सहा महिन्यांपूर्वीच्या तुलनेत चार्टर्ड हेलिकॉप्टरच्या संख्येत १५-२० टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात दिसून आले आहे.

निवडणुका आणि प्रचाराच्या वेळी हेलिकॉप्टर प्रवास वाहतुकीचा सर्वात पसंतीचा पर्याय ठरतो. (छायाचित्र-एएनआय)

दुसरे म्हणजे, हेलिकॉप्टर प्रवासाने वेळेची बचत होते. एखाद्या राजकारणी किंवा नेत्याला दूरच्या ठिकाणी भेट द्यायची असेल तर हेलिकॉप्टर तुम्हाला कमीत कमी वेळेत त्या ठिकाणावर पोहोचवण्यास सक्षम असते. विमानाच्या तुलनेत हेलिकॉप्टरचा प्रवास स्वस्त असतो. उदाहरणार्थ, राजकारणी १० ते १२ प्रवासी क्षमता असलेले ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर किंवा सहा-सात लोकांच्या क्षमतेचे सिंगल-इंजिन हेलिकॉप्टर निवडू शकतात. परंतु, विमानाने प्रवास केल्यास किमान २० लोक आवश्यक असतात आणि विमानाचा आकार जसजसा वाढतो, तसतसा खर्चही वाढतो.

भारतात सर्वात लहान चार्टर विमानाची किंमत प्रति तास ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपये आहे. त्या तुलनेत एका चार्टर्ड हेलिकॉप्टरसाठी प्रति तास १.५ लाख रुपये खर्च करावे लागतात. हेलिकॉप्टरच्या मालकीच्या कंपन्या नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर (NSOP) श्रेणीत येतात, त्यामुळे त्यांना व्यावसायिक विमान कंपन्यांप्रमाणे वेळापत्रक पाळावे लागत नाही.

हेलिकॉप्टर प्रवास आणि सुरक्षा

रईसी यांचे हेलिकॉप्टर कशामुळे क्रॅश झाले याची पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. ती मानवी चूक होती की त्याला हवामानात झालेला बदल कारणीभूत होता, हे अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. मात्र, रईसी यांच्या मृत्यूमुळे पुन्हा हेलिकॉप्टर प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

धोकादायक ऑपरेशन्समध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य केले जाते. (छायाचित्र-पीटीआय)

Howstuffworks.com या वेबसाइटवर अनेकांनी हेलिकॉप्टरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एकाने लिहिले की, “१९३० च्या दशकात हेलिकॉप्टरचा शोध लागल्यापासून एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे, ती म्हणजे यात होणारा बिघाड.” परंतु, हेलिकॉप्टर तुलनेने सुरक्षित असल्याचे अनेक विमान वाहतूक तज्ज्ञ सांगतात. युरोपात हेलिकॉप्टरमधील मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. इंटरनॅशनल हेलिकॉप्टर सेफ्टी टीम (IHST) नुसार, युरोपमधील हेलिकॉप्टर अपघातांची संख्या २०१३ मध्ये १०३ वरून २०१७ मध्ये ४३ वर आली आहे.

धोकादायक ऑपरेशन्समध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य केले जाते. जसे की शोध, बचाव मोहीम, युद्ध क्षेत्रांमध्ये आणि कधीकधी खराब हवामानात. त्यावेळीदेखील अपघात होतात. अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचे माजी सदस्य जॉन गोगलिया यांनी ‘एनपीआर’ला सांगितले की, हेलिकॉप्टर स्वतः सुरक्षित असतात. समस्या मुख्यतः वैमानिकाच्या चुकीमुळे किंवा ऑपरेशनल समस्यांमुळे उद्भवते.

हेही वाचा : ‘या’ देशातून सर्व हिमनद्या लुप्त, आधुनिक इतिहासात प्रथमच एवढी मोठी घटना; हे संकट जगासाठी किती गंभीर?

त्याच अहवालात त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “हेलिकॉप्टरला अधिक नियंत्रणाची आवश्यकता असते. विमानात बऱ्याचदा ऑटोमेशन मोडमुळे वैमानिकाला जास्त लक्ष केंद्रित करावे लागत नाही. मात्र, हेलिकॉप्टरच्याबाबतीत तसे नाही. हेलिकॉप्टर चालवणार्‍या वैमानिकाला लक्ष केंद्रित करण्याची आणि पूर्णपणे नियंत्रणाची आवश्यकता असते. वैमानिकाला आपले लक्ष सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकवून ठेवावे लागते. कधीकधी लक्ष विचलित झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

Story img Loader