दूरसंचार विभागाने (DoT) सर्व मोबाईल फोन उत्पादकांना आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांकाची (IMEI) भारत सरकारकडे नोंद करणे अनिवार्य केले आहे. आयएमईआय म्हणजे प्रत्येक मोबाईल डिव्हाइसची ओळख पटवून देणारा युनिक १५ अंकी क्रमांक. यापुढे सर्व मोबाईल उत्पादकांप्रमाणेच आयातदारांनाही, प्रत्येक फोनचा आयएमईआय क्रमांक सरकारकडे नोंदवावा लागणार आहे.

आयएमईआय क्रमांक आणि त्याचे महत्त्व काय?

प्रत्येक फोनसाठी त्याचा आयएमईआय क्रमांक अतिशय आवश्यक आहे. याच्याशिवाय कोणताही फोन निरुपयोगी आहे, असे म्हटले तरीही योग्य ठरेल. आज आपण आयएमईआय क्रमांक आणि त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Updates in Marathi
Ladki Bahin Yojana December Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा; २१०० रुपये कधी मिळणार? अर्जांची छाननी होणार का? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
Pegasus logo
Pegasus : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ
Appointments of 23 officers who joined the Indian Administrative Service Mumbai news
भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या २३ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मोबाईल नेटवर्कवर कोणत्याही मोबाईल डिव्हाइसची ओळख पटवण्यासाठी १५ अंकी युनिक नंबर असतो, त्याला आयएमईआय क्रमांक म्हणतात. आपले डिव्हाइस हरवले किंवा चोरीला गेले तर हा क्रमांक उपयुक्त ठरतो. या क्रमांकाच्या मदतीने ज्याने तुमचा फोन चोरला आहे, त्याला आपला फोन वापरण्यापासून प्रतिबंध करू शकतो. याअंतर्गत फोन चोरणाऱ्याला तुमच्या फोनवर कॉल आणि इतर गोष्टी करता येणार नाहीत.

आयएमईआय क्रमांक अनिवार्य करण्यामागचं कारण काय?

आयएमईआय क्रमांक, नियम, २०१७ च्‍या छेडछाडीला प्रतिबंध करण्‍यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं दूरसंचार विभागाने सांगितलं आहे. यानुसार, मोबाईल उत्पादकांना प्रत्येक मोबाईलचा आयएमईआय क्रमांक नोंदणीकृत करणे बंधनकारक असणार आहे. मोबाईल फोनच्या विक्रीपूर्वीच त्याच्या आयएमईआय क्रमांकाची भारत सरकारच्या बनावट उपकरण प्रतिबंध पोर्टलवर नोंद करावी लागेल, असे दूरसंचार विभागाने सोमवार, २६ सप्टेंबरला राजपत्रातील अधिसूचनेमध्ये सांगितले आहे.

तसेच, विक्री, चाचणी, संशोधन किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी भारतामध्ये आयात होणाऱ्या मोबाईल फोनचा आयएमईआय क्रमांकही फोन आयात करण्यापूर्वीच या पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

आयएमईआय क्रमांक काय करणार?

आयएमईआय हा १५ अंकी युनिक नंबर आहे जो नेटवर्कवरील डिव्हाइस ओळखण्यासाठी वापरला जातो. हा क्रमांक म्हणजे फोनची खास ओळख असते. जेव्हा एखादा वापरकर्ता इंटरनेट वापरतो किंवा त्याद्वारे कॉल करतो तेव्हा डिव्हाइसची ओळख पटवण्यासाठी हा नंबर वापरला जातो. ड्युअल-सिम पर्याय असलेल्या फोनमध्ये प्रत्येक सिमसाठी एक, असे दोन आयएमईआय नंबर असतात. वापरकर्त्याचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तो शोधण्यात हा नंबर मदत करू शकतो. तसेच, तक्रार दाखल केल्यानंतर त्या फोनवर नव्या सिमकार्डच्या मदतीने कॉल आणि इतर गोष्टी करण्यास प्रतिबंध करता येणे शक्य होते.

सध्या मोबाईल फोनची सर्रास होणारी चोरी आणि क्लोनिंगवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासाठी दळणवळण मंत्रालयाने यापूर्वी केंद्रीय उपकरणे ओळखपत्र तयार केले होते. यानुसार नोंदणीकृत मोबाईल फोनला त्यांच्या आयएमईआय स्थितीवर पांढरा, राखाडी आणि काळा या रंगावर आधारित तीन सूचींमध्ये वर्गीकृत केले जाते.

या वर्गीकरणानुसार, पांढर्‍या यादीतील आयएमईआय क्रमांक असलेले मोबाइल फोन वापरण्याची परवानगी आहे, तर काळ्या यादीत असलेले फोन चोरी किंवा हरवल्याची तक्रार नोंदवलेले आहेत आणि त्यांना नेटवर्कमध्ये वापरण्याची परवानगी नाही. तर राखाडी यादीतील आयएमईआय क्रमांक असलेली उपकरणे मानकांशी जुळत नाहीत परंतु त्यांना पर्यवेक्षणाखाली कनेक्ट करण्याची परवानगी आहे.

२०१७ मध्ये, सरकारने फोनच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड रोखण्यासाठी नियम अधिसूचित केले होते. त्यासाठी तुरूंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. दूरसंचार विभागाने जुलै २०१७ मध्ये हा प्रकल्प राबविण्याची आपली योजना जाहीर केली होती. याअंतर्गत महाराष्ट्रात एक पायलट प्रोजेक्ट घेण्यात आला होता.

विश्लेषण : वय वाढतं तसे आपण म्हातारे का होतो? आपल्या शरीरात नेमकं घडतं काय? सविस्तर जाणून घ्या

तुमच्या अँड्रॉइड फोनवर आयएमईआय क्रमांक कसा तपासायचा ?

अँड्रॉइड फोनवर आयएमईआय क्रमांक तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे *#06# डायल करणे. तुम्ही हा नंबर डायल करताच तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसेल तो तुमच्या फोनचा आयएमईआय क्रमांक असेल. जर फोन ड्युअल सिम असेल तर तुम्हाला दोन आयएमईआय क्रमांक दिसतील.

सेटिंग्जमधून आयएमईआय क्रमांक कसा पाहायचा?

  • प्रथम सेटिंग अ‍ॅपवर जा.
  • त्यानंतर अबाऊट फोनमध्ये जा.
  • नंतर आयएमईआय क्रमांक पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Story img Loader