Marine heat waves: जमिनीवर ज्या प्रकारे उष्णतेच्या लाटा सरासरीपेक्षा असलेले अतिरिक्त तापमान सूचित करतात, त्याचप्रमाणे महासागरातील उष्णतेच्या लाटा (MHWs) समुद्राच्या पाण्याच्या असामान्य तापमानवाढीच्या निदर्शक आहेत, अलीकडच्या वर्षांत, जागतिक तापमान वाढीमुळे (ग्लोबल वॉर्मिंग) MHWs-महासागरात उष्णतेच्या लाटा वारंवार निर्माण होत आहेत आणि त्यांची तीव्रता जास्त असते. एका नवीन अभ्यासानुसार हे घटक केवळ पृष्ठभागापुरतेच मर्यादित नाहीत.

MHWs या सामान्यत: समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाचे निरीक्षण करून मोजल्या जातात. महासागरात खोलवर जाताना पाण्यात सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होत जाते. अशा परिस्थितीत समुद्राच्या उच्च दाबाच्या जोडीने खोल- समुद्राचा शोध अत्यंत आव्हानात्मक ठरतो.

loksatta analysis how china new great wall threat to nepal
विश्लेषण : चीनची नवी ‘भिंत’ नेपाळसाठी संकट?
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Rivers all over the world were drained
जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…
Increase in the price of tomato cabbage chillies Pune news
टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ
High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
Long term impacts of climate change on coastal area
किनारपट्टीवरील शहरांतील हवामान बदल नियमांच्या अंमलबजावणीत त्रुटी
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!

अधिक वाचा: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

महासागरातील ‘ट्वायलाइट झोन’ हा २०० ते १००० मीटर दरम्यान असतो. तिथे काही प्रमाणात दृश्यमानता असते. परंतु या क्षेत्रावर झालेले संशोधन अपुरे आहे. बुधवारी (१६ ऑक्टोबर) नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या ‘कॉमन ओक्युरन्सेस ऑफ सबसरफेस हीटवेव्ह्ज अँड कोल्ड स्पेल्स इन ओशन एडीज’ या शोध निबंधात चीन आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी या प्रदेशातील समुद्री उष्णतेच्या लाटा (MHWs) आणि थंड वातावरणाच्या लाटांचा (Marine Cold Spells) अभ्यास केला.

संशोधकांना महासागरातील उष्णतेच्या लाटांबद्दल काय आढळले आहे?

संशोधकांना आढळले की, महासागराच्या खोल भागातील सागरी उष्णतेच्या लाटांची (MHWs) नोंद फार कमी प्रमाणात झाली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारी संस्था CSIRO चे वरिष्ठ प्रमुख संशोधन वैज्ञानिक मिंग फेंग हेही प्रस्तुत शोध निबंधाच्या लेखकांपैकी एक आहेत. त्यांनी द कन्व्हर्सेशन मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, खोल महासागरात उष्णतेतील बदलांसाठी वातावरणीय घटक जबाबदार नसतात (जसे की MHWs मध्ये ते असतात). त्याऐवजी, एडी प्रवाह यामध्ये मुख्य भूमिका बजावतात. (एडी प्रवाह म्हणजे महासागरातील पाण्याचे मोठे फिरते वर्तुळाकार प्रवाह (current), जे एखाद्या विशिष्ट भागात वेगाने फिरतात. या प्रवाहांचे लूप (loops) कधी कधी शेकडो किलोमीटर लांबीचे असू शकतात आणि एक हजार मीटरपेक्षा अधिक खोलीपर्यंत पोहोचू शकतात. एडी प्रवाह पाण्यातील उष्णता किंवा थंडावा एका भागातून दुसऱ्या भागात वाहून नेतात. साधारणपणे, एडीज समुद्राच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे असतात आणि ते गरम किंवा थंड पाण्याला लांब अंतरांवर नेण्याचे काम करतात.)

अधिक वाचा: World Cotton Day 2024: भारतीय वस्त्रोद्योगाला ब्रिटिशांनी लावला सुरुंग; नेमके काय घडले?

फेंग यांनी एडी प्रवाहांचे वर्णन “विशाल फिरणाऱ्या प्रवाहांचे लूप, जे कधी कधी शेकडो किलोमीटरच्या अंतरावर पसरलेले असतात आणि १००० मीटरपेक्षा अधिक खोलवर पोहोचतात,” असे केले आहे. एडी प्रवाह गरम किंवा थंड पाण्याचे प्रवाह दूरवरपर्यंत वाहून नेतात.
त्या खोलीवर तापमानातील बदल नोंदवण्यासाठी, जगभरातील महासागरांमध्ये लॉन्ग टर्म मूरिंग्स – मेजरमेंट बायूजची व्यवस्था करण्यात आली. तसेच, आर्गो फ्लोट्स नावाचे रोबोटिक डायव्हर्स वापरले गेले, ते २,००० मीटर खोलीपर्यंत जाऊन पुन्हा पृष्ठभागावर येऊ शकतात. त्यांचा वापर तापमान आणि क्षारता (salinity) मोजण्यासाठी करण्यात आला.

या शोधाचे महत्त्व काय आहे?

सर्वप्रथम हा शोध असे दर्शवतो की, जागतिक तापमानवाढ ही केवळ पृष्ठभागावरील महासागराच्या तापमानालाच नाही तर एडी प्रवाहांद्वारे खोल सागरातील पाण्यालाही प्रभावित करते आहे. फेंग यांनी लिहिले की, “आमच्या संशोधनानुसार एडी प्रवाह समुद्री उष्णतेच्या लाटांच्या तापमानवाढीच्या दरात वाढ आणि थंड वातावरणाच्या लाटांच्या थंड होण्याच्या दरात वाढ करण्याचे काम करत आहेत. एकंदर गरम होत असलेला महासागर अधिक शक्तिशाली एडी प्रवाह निर्माण करत आहेत.” ट्वायलाइट झोनमधील अत्यधिक तापमानबदल देखील चिंतेचा विषय आहे, कारण येथे अनेक माशांच्या प्रजाती आणि प्लँक्टन असतात. प्लँक्टन हे महासागरातील अन्नसाखळीचे आधार आहेत आणि लहान माशांचे खाद्यस्रोत आहेत. फेंग यांनी लिहिले आहे की, “एडीजने आणलेली उष्णता आणि थंडावा हा ट्वायलाइट झोनसाठी एकमेव धोका नाही. तर ते समुद्री उष्णतेच्या लाटा पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी करू शकतात आणि पोषक घटकांमध्ये घटही करू शकतात.”

एकूणात या साऱ्याच्या परिणामस्वरूप सागरी जीवन धोक्यात येऊ शकते.