अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाला भव्य स्वरूप देण्यासाठी अयोध्येत तयारीला अंतिम स्वरूप दिले जात असून देशभरात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र हिंदू धर्मात मानाचे स्थान असलेल्या शंकराचार्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. शंकराचार्य उपस्थित न राहण्याची कारणे काय, याचा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उत्तराखंडमधील शंकराचार्यांचा विरोध का?
सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, असे शंकराचार्यांनी सांगितले. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, ‘‘हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांपैकी काेणीही उपस्थित राहणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याप्रति द्वेष नाही. पण हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही. मंदिराच्या बांधकामात आणि कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले हिंदू धर्मातील प्रस्थापित नियामांकडे दुर्लक्ष करत आहे.’’ आमच्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुरेसा वेळ होता. मात्र आपण घाई करत आहोत. आता आम्ही गप्प बसू शकत नाही. कदाचित कार्यक्रमाचे आयोजन करणारे आम्हाला मोदीविरोधी म्हणतील. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही. पण त्याच वेळी आम्ही आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
हेही वाचा – विश्लेषण : भारत आणि मालदीव वाद म्हणजे जुने संबंध अन् नवा तणाव
पुरीच्या गोवर्धनपीठाच्या शंकराचार्यांचे मत काय?
पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झालेल्या कार्यक्रमात धर्मग्रंथांच्या विरोधात असलेल्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले. अयोध्येतील सोहळ्यास एका व्यक्तीसह उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र धार्मिक नियमांचे पालन केले जात नसलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले. ‘‘आयोजकांनी माझ्याकडून कोणतीही सूचना घेतली नाही म्हणून मी त्यांच्यावर रागावलो आहे, असे समजू नका. स्कंद पुराणानुसार जर असे विधी योग्यरीत्या केले गेले नाहीत तर अशुभ चिन्ह मूर्तीमध्ये प्रवेश करतात आणि क्षेत्र नष्ट करतात. मी एखाद्या कार्यक्रमात तेव्हाच भाग घेतो जेव्हा, तो शुद्ध आणि सनातन धर्मानुसार असतो,’’ असे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले. राजकारणी भविष्यात ढवळाढवळ करतील आणि स्वत:ला योगी आणि धर्माचार्य म्हणून प्रसिद्ध करतील, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. ‘‘मी अनेकदा अयोध्येला जातो आणि राम मंदिरात नतमस्तक होतो. मी योग्य वेळी पुन्हा भेट देईन,” असे पुरीच्या शंकराचार्यांनी सांगितले.
इतर शंकराचार्यांचे मत काय?
अविमुक्तेश्वरानंद यांचे शिष्य स्वामी मुक्तानंद यांनी यासंबंधी सांगितले की, ‘‘शंकराचार्यांचे चार आखाडे गेल्या २,५०० वर्षांपासून सर्वात योग्य धार्मिक केंद्रे आहेत आणि सनातन धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना विरोध करण्याची जबाबदारी त्यांच्या प्रमुखांवर आहे. आम्ही इतर शंकराचार्यांशी संवाद साधला आहे आणि मंदिराचे बांधकाम सुरू असताना त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात अनास्था दाखवली आहे.” शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारिकापीठाचे स्वामी सदानंद सरस्वती या दोन शंकराचार्यांनी मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अयोध्येतील श्री राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे काय?
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित असलेल्या ट्रस्टने सांगितले की, तीन मजली मंदिराचा पहिला मजला तयार आहे, परंतु उर्वरित बांधकाम पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. मात्र २२ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. कार्यक्रमाला शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याबाबत मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, ‘‘हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे, शैव, शाक्य आणि संन्याशांचे नाही. अठराव्या शतकातील वैष्णव संत स्वामी रामानंद यांच्या शिष्यांनी निर्मोही अणी, दिगंबर अणी आणि निर्वाणी अणी हे तीन आखाडे स्थापन केले होते. त्यांनी निंबार्क, रामानंद आणि मध्वगोडेश्वर या चार उपपंथांची स्थापना केली. रामानंद पंथाने विष्णूचा अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे केवळ पालन केले आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतले.
हेही वाचा – विश्लेषण: आगामी वर्ष आणखी उष्ण असण्याची शक्यता?
चंपत राय यांच्या वक्तव्याबाबत शंकराचार्यांची प्रतिक्रिया काय?
चंपत राय यांच्या वक्तव्याचा शंकराचार्यांनी निषेध व्यक्त केला. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘‘हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे, असे चंपत राय म्हणाले असतील, तर त्यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी राजीनामा देऊन दुसऱ्या कुणावर तरी जबाबदारी सोपवावी. राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करताना ते संपूर्ण राष्ट्राचे आहे, असे सांगितले गेले होते. आम्हीही त्यासाठी वर्गणी दिली. मात्र आता आम्ही तिथे येण्यास विरोध केला, तर हे मंदिर रामानंद संप्रदायाचे झाले.’’ शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनीही राय यांच्या वक्तव्यावर टीका केली. सत्तेच्या पदावर असताना आपली उंची कमी करू नका, असा सल्ला त्यांनी राय यांना दिला.