Shivaji Maharaj and Maratha navy: महाराष्ट्राला हजारो वर्षांचा इतिहास असला तरी मराठाकालीन इतिहासाचा कालखंड हा इथल्या मातीतील शौर्याची गाथा सांगतो. केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर या कालखंडाने भारताच्या इतिहासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवाजी या नावाने परकीयांना धडकी भरवण्यापलीकडे जात काळाची पावलं ओळखून त्या दिशेने राज्याची स्वराज्याची मांडणी कशी करावी ही मोलाची शिकवण दिली आहे. आणि याच शिकवणुकीतील एक पर्व म्हणजे मराठा आरमार भारताच्या या स्वकीय राजाने युरोपीय शक्तींची ताकद ओळखून स्वदेशी आरमाराचा पाया रचला. म्हणूनच या राजाला ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ म्हणून गौरवण्यात येते. ४ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हटले जाते याचा घेतलेला हा आढावा!
१७ व्या शतकातील राजकीय परिस्थिती काय होती?
एकुणातच भारताच्या इतिहासात १७ वं शतक हे वेगवेगळ्या पातशाह्यांसाठी प्रसिद्ध होतं; महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नव्हती. विजापूरचा आदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि मुघल यांचा अंमल होता. कोकण किनाऱ्यावरील बंदरे आदिलशहाच्या ताब्यात होती. इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी या नाविक शक्तींचा अमल होता. १४९८ साली वास्को द गामा मलाबारच्या किनाऱ्यावर कालिकत येथे उतरला आणि अल्पावधीत त्याने संपूर्ण अरबी समुद्र आणि तिथे होणाऱ्या व्यापारावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. त्यामुळेच इतर कोणालाही व्यापार करावयाचा असल्यास (कर्ताझ) दस्तक सक्तीचं केलं. अन्यथा ते जहाज जाळून टाकण्यात येत असे. म्हणजेच समुद्र भारताचा परंतु भारतीयांनाच व्यापार करण्यास मनाई होती. वसई, चौल, दमण, गोवा, बसरूर, मंगलोर या कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांच्या प्रमुख वसाहती होत्या. पोर्तुगीजांकडे स्वसंरक्षणासाठी एक नौदल होते. या नौदलात गॅली, गलीबत (गलबत) यांचा समावेश होता. तर दुसऱ्या बाजूला १६१३ मध्ये इंग्रजांनी सुरतमध्ये पहिली वखार स्थापन केली. तर ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेटाचा ताबा १६६५ साली घेतला. तर १६६९ साली बेटाच्या आग्नेय कोपऱ्यात चार बुरुजांचा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि १६८३ साली या किल्ल्याचे काम पूर्ण झाले. १६७२ साली सुरत येथे ‘हंटर’ ही १४ तोफांची आणि ‘रिव्हेंज’ ही २२ तोफांची युद्धनौका बांधण्याचे काम सुरू झाले. या युद्धनौका बांधून पूर्ण होईपर्यंत मुंबई कौन्सिलने ३-४ तोफा बसतील अशी ४ शिबाडे- लहान स्थानिक जहाजे खरेदी केली होती. याशिवाय डच, फ्रेंच या नाविक शक्ती भारताच्या किनाऱ्यावर कार्यरत होत्या. तर मूळचे हबशी असलेले सिद्दी कोकण किनारपट्टीवर जंजिऱ्याच्या परिसरात होते. सिद्दींनी आपले नाविक कौशल्य आधी आदिलशाहीसाठी आणि नंतर मुघलांची वापरले. ते उत्तम दर्यावर्दी होते. त्यांच्याकडे २० गलबते आणि चार गुराब होती.
या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेत स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली. अफजलखानाच्या वधानंतर कोकण आणि कोल्हापूरचा बराचसा मुलुख स्वराज्याला जोडला. यातच उत्तर कोकणातील कल्याण आणि भिवंडी ही दोन महत्त्वाची बंदरे स्वराज्यात आली. तर महाराजांनी १६५७ ते १६५८ या काळात सावित्री नदीपासून ते उत्तरेस कोहोज आणि अशेरीगडापर्यंतचा मुलुख स्वराज्यात आणून जवळपास १०० कि.मी. लांबीचा कोकण किनारा अधिपत्याखाली आणला. इतकच नाही तर सुरगड, बिरवाडी, तळा, घोसाळे, सुधागड, कांगोरी आणि रायगड (रायरी) असे किल्ले स्वराज्यात आणून स्वराज्याची हद्द सिद्दीच्या मुलखाशी नेऊन भिडवली.
अधिक वाचा: Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
एका नव्या अध्यायाची सुरुवात
किनारी भूभाग ताब्यात आलेला तरी ते पुरेसे नव्हते याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. लाल समुद्र असो किंवा अरबी समुद्र अधिसत्ता होती ती युरोपीय सत्ताधीशांची. त्यामुळे पर्यायाने सागरी व्यापारावरही त्यांचीच मालकी होती. त्याचेच फलित म्हणून कोणत्याही अडसराशिवाय ते व्यापार करत होते. भारतीय द्विपकल्पातून येणाऱ्या विविध प्रकारच्या मालाची निर्यात कोकण किनारपट्टीवरील अनेक बंदरांतून होत असे. या परदेशी व्यापारातून मिळणारे उत्पन्न राज्य निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण होते. युरोपीय शक्तींशिवाय सागरी चाच्यांची भीती होती. तत्कालीन भारतीय राजसत्ता या चाच्यांचा उपद्रव रोखण्यास असमर्थ होत्या. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जर समुद्र अधिपत्याखाली हवा असेल तर नाविक सामर्थ्याची आवश्यकता होती. व्यापार, स्वराज्याची उभारणी, शत्रूंवर जरब, चाच्यांवर रोख असा महत्त्वाचा दृष्टिकोन समोर ठेवून शिवाजी महाराजांनी आरमाराच्या पायाभरणीचा विचार सुरु केला. इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात, मराठ्यांकडे युद्धाची परंपरा असली तरीही समुद्र हा त्यांच्यासाठी एक नवीनच पैलू होता. भारताच्या इतिहासात शिवाजी हा कदाचित एकमेव राजा होता ज्याने नौदलाची स्थापना राजकीय दृष्टीने केली.
शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची सुरुवात नक्की कशी केली याविषयी मराठा इतिहासात थेट नोंद नाही. साधारणपणे १६५९ च्या सुमारास कल्याण आणि भिवंडी येथे जहाज बांधणीस सुरुवात केली. याविषयीचे संदर्भ पॊर्तुगीज दस्ताऐवजांमध्ये सापडतात. १९ जुलै १६५९ रोजी पोर्तुगीज सल्लागार मंडळाची एक बैठक झाली होती. या बैठकीत वसईच्या कॅप्टनने पाठवलेल्या पत्राचा विषय मुख्य होता. अंतोनियो कॅस्ट्रो याने गोव्याच्या गव्हर्नरला पत्र पाठवले होते. या पत्रात त्याने म्हटले की, शिवाजी (महाराज) भिवंडी, कल्याण आणि पेण येथे २० संग्विसेलचे (संगमेश्वरी जहाजे) आरमार सिद्दीशी लढण्यासाठी उभारत आहे. याची जबाबदारी रुय लैंताव व्हियेगश याच्यावर सोपवलेली आहे. तसेच आरमाराच्या बांधकामासाठी लाकूडफाटा आणि बंदरातून बाहेर पडण्याची परवानगी पोर्तुगीजांकडे त्याला मागण्यास सांगितली आहे. मी यावर उत्तर दिले की, अशी परवानगी गव्हर्नरकडून घ्यावी लागते. माझा काहीही संबंध नाही. माझ्या मते तशी परवानगी घेऊ नये नाहीतर घरातच एक ‘चाचा’ निर्माण होईल. आपली इतकीही मैत्री नाही की आपण धास्ती बाळगू नये. त्याचा दांड्याबरोबर दुसरा काही हेतू असेल तर साष्टी बेटाला घटक होईल. त्याने जहाजांच्या बांधणीसाठी गोरे कामावर ठेवले आहेत हे अधिकच वाईट आहे. गव्हर्नरने जो काही निर्णय आहे तो मला तातडीने कळवावा. शिवाजीचे सर्वच मार्ग अडवणे शक्य नाही. आपले सामर्थ्य अपुरे आहे. वसईत दहा-बारा जहाजे बांधण्याचा हुकूम द्यावा. तसेच किल्ला मजबूत करण्याचाही हुकूम द्यावा म्हणजे दहशत बसेल.
या पत्रावर उत्तर म्हणून मंडळाने शिवाजी महाराजांच्या कार्यात अडथळा आणण्याचे सुचवले. ते करण्यासाठी वसईच्या कॅप्टनने ज्यूआंव द सालाझार याची निवड केली. त्याने मराठा आरमाराच्या बांधकामात सामील असलेल्या पोर्तुगीज आणि इतर गोऱ्या लोकांना धर्म आणि राजाचा हवाला दिला. याचे पुरावे रुय लैंताव व्हियेगश याने लिहिलेल्या पत्रात सापडतात. त्याने राजा आणि धर्मासाठी ४०० लोकांसह शिवाजी महाराजांचे काम कसे सोडले हे सविस्तर नमूद केले आहे. पोर्तुगीज मराठा आरमाराच्या कामावर लक्ष ठेवून होते. शिवाजी महाराज चौलमध्ये ५० युद्धनौका बांधत आहेत आणि त्यातील ७ पाण्यात लोटल्या याचा उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये सापडतो. शिवाजी प्रबळ असल्याचे त्याच्या बाबतीत सबुरीची भूमिका घेण्याचा सल्लाही या कागदपत्रांमधून देण्यात आला आहे. किंबहुना डच कागदपत्रांमधूनही अशाच प्रकारच्या नोंदी सापडतात. शिवाजी महाराजांकडील फ्रिगेट्स, हर्णे येथील युद्धाचे, किल्ला बांधण्याचे संदर्भ या नोंदींमध्ये सापडतात.
आज्ञापत्रातील नौदलाचा संदर्भ:
मराठा नौदलाच्या धोरणांबद्दल रामचंद्रपंत यांनी आपल्या आज्ञापत्रात १. आरमारी जहाजांची बांधणी २. आरमाराचे संघटन ३. व्यापारी दृष्टी ४. नाविक युद्ध ५. जहाज ठेवण्याविषयीचे नियम या विषयी सविस्तर मांडणी केली आहे. आज्ञापत्रात म्हटल्याप्रमाणे मराठा आरमारात दोन प्रकारची जहाजे होती. १. व्यापारी जहाजे २. युद्धनौका. व्यापारी जहाजांमध्ये मचवा, शिबाड, पाडाव, तरांडी आणि पगार यांचा समावेश होई तर युद्धनौकांत गलबत, गुराब, महागिरी तसेच शिबाड, तारांडे, तरूस आणि पगार यांचाही समावेश होई. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांविषयी निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु इंग्रज दप्तरातील नोंदी, लेखन आणि बखरींमसधून साधारण कल्पना येते. १९६५ मधील एका इंग्रजी नोंदीप्रमाणे “शिवाजीचे आरमार ५००० लोकांचे असून त्यात ३० ते १५० टन आकाराची ८५ जहाजे असल्याचे” म्हटले आहे. यात ३ जहाजे मोठ्या डोलकाट्या असलेली गुराब होती. तर १६७३ पर्यंत ही संख्या ३३ पर्यंत वाढल्याची नोंद आहे. चित्रगुप्तांच्या नोंदीत म्हटले आहे की, “पाणियातील तरांडे जहाजे सुमारे ३० थोर गुरब, १००० गलबते, १५० महागिरी, ५० लहान गुरब, १० होड्या, १५० लहान होड्या, ६० तरावे, २५ पाल, १५ जूग, ५० माचवे होती. आज्ञापत्रातील आरमाराविषयीच्या नोंदीत म्हटले आहे की, मराठा आरमाराची दोन सुभ्यात विभागणी केली होती. प्रत्येक सुभ्यात ५ गुरब आणि १५ गलबते असत. आरमाराची तनखा सरकारने नेमून दिल्याप्रमाणे करावी अशी नोंद आहे.
शिवाजी महाराजांनी आरमाराच्या दृष्टीने किल्ल्यांचे महत्त्व ओळखले होते आणि ते त्यांच्या सागरी धोरणाचा महत्त्वाचा भाग होते. मराठा आरमारासाठी किल्ले तीन प्रकारांत विभागले गेले होते:
१. खाडी मुखाजवळ भूशिरावर असलेले किल्ले
२. किनाऱ्यालगत असलेले किल्ले
३ . किनाऱ्याजवळील बेटांवर बांधलेले किल्ले
कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही प्रकारच्या किल्ल्यांनी मराठा आरमाराच्या विकासाला महत्त्वाची चालना दिली.
आज्ञापत्रातील आरमारी लढाईविषयी मार्गदर्शक तत्त्वे:
शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात आरमारी लढाईसाठी खालील निर्देश दिले गेले:
आरमाराने नेहमीच समुद्रावर गस्त ठेवावी आणि सतत सज्ज राहावे.
आरमारासाठी आवश्यक असलेला दारू आणि गोळा जंजिऱ्यापासून नियमितपणे मिळवावा.
दर्यावर्दी गनिमाची माहिती सतत मिळवत राहावी आणि त्यानुसार धोरण आखावे.
शत्रूच्या स्थळांवर परिस्थितीनुसार हल्ला करावा.
जर आरमाराची शत्रूशी गाठ पडली, तर सर्व जहाजांनी एकत्र येऊन लढावे.
वाऱ्यामुळे शत्रूला प्रबळ स्थिती मिळाली, किंवा गलबते वाऱ्यामुळे एकत्र येऊ शकली नाहीत, तर जंजिऱ्याच्या आश्रयाला जावे.
आवश्यकतेशिवाय जहाजे व सैनिकांना युद्धात ओढू नये. स्वतःला सुरक्षित ठेवत शत्रूवर हल्ला करावा.
शत्रू कमकुवत झाला तरी एकट्याने हल्ला न करता लांबून घेराव घालून तोफांचा मारा करावा.
शत्रू जवळ आला तरी अंदाज घेऊन प्रतिउत्तर द्यावे.
मराठा आरमारी जहाजांची रणनीती:
मराठ्यांची आरमारी जहाजे आकाराने युरोपीय जहाजांच्या तुलनेत लहान होती, त्यामुळे त्यांना काही मर्यादांना तोंड द्यावे लागत असे. परंतु, या मर्यादांवर मात करण्यासाठी मराठ्यांनी खास रणनीति तयार केली होती.
१. २०-३० गलबते आणि गुरब एकत्र येऊन एका मोठ्या युरोपीय जहाजावर हल्ला करत.
२. त्या जहाजाच्या डोलकाठीवर (मास्ट) प्रखर हल्ला केला जाई. डोलकाठी निकामी झाली की ते जहाज सहज काबूत आणले जाई.
३ .त्यानंतर मराठा सैनिक जहाजावर उतरून ते पूर्णपणे ताब्यात घेत.
या रणनीतींमुळे मराठ्यांनी समुद्रावर प्रभावी वर्चस्व निर्माण केले आणि आपल्या सागरी सामर्थ्याचे भक्कम प्रदर्शन केले.
पहिली आरमारी स्वारी
शिवाजी महाराजांच्या आरमाराने थेट युद्ध केल्याचे पुरावे सापडत नाहीत. परंतु त्यांनी आरमाराच्या साहाय्याने अनेक ठिकाणी हल्ले केले, कोकण किनारपट्टीवर आणि समुद्रावर आपली सत्ता प्रस्थापित केली . युरोपियन शक्तींबरोबर झालेल्या युद्धाचे संदर्भ नसले तरी सिद्दीबरोबर झालेल्या नाविक युद्धाचे संदर्भ सापडतात. महाराजांच्या कालखंडात मराठा आरमाराने अनेकदा आदिलशाही , पोर्जुगीज, इंग्रज यांची जहाजे पकडल्याचे उल्लेख आहेत. शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमारी शक्तीमुळे अनेक अफवा पसरत होत्या, एकीकडे ते साबरमती नदीमार्गे अहमदाबाद शहरावर हल्ला करणार अशी अफवा होती तर दुसरीकडे ते त्यांच्या युद्धनौकांना मोखा, बसरा, पर्शिया येथून सुरतेला येणाऱ्या जहाजावर हल्ला करणार अशी होती, तर तिसरी अफवा ते मिरजान, अंकोला आणि कारवार येथे जाणार असल्याची होती. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी बसरूर येथे पहिली आरमारी स्वारी केली. शिवाजी महाराजांची ही स्वारी १४ फेब्रुवारी १६६५ रोजी मालवणहून समुद्रमार्गे निघून बसरूरला पोहोचली. १४ मार्च १६६५ च्या कारवारहून सुरतेला पाठवलेल्या एका इंग्रजी पत्रात या स्वारीबद्दल उल्लेख आहेत. या पात्रात म्हटले आहे की, ‘शिवाजी महाराजांनी मालवणहून ८५ फ्रिगेट आणि ३ मोठी जहाजे घेऊन गोव्यातील पोर्तुगीजांकडून कोणताही विरोध न होता (बार्सिलोर) बसुरवर स्वारी केली आणि त्यांनी बसरूर लुटले. ते परत जाताना मिरजान आणि अंकोला यामधील गोकर्ण येथील मोठ्या हिंदू चर्चात- देवळात गेले आणि नंतर ४००० पायदळ घेऊन अंकोल्यास आले. तेथे त्यांनी आपल्या बरोबर स्वराज्यात जाताना येणाऱ्या नद्या ओलांडण्यासाठी १२ फ्रिगेट ठेवून बाकीचे आरमार पुढे पाठवून दिले. अंकोल्याहून महाराज कारवारला आले. त्याच वेळी आम्हाला हेरांकडून माहिती कळाली होती, त्यामुळे मस्कतच्या इमामाच्या जहाजावर कंपनीचा असलेला १०० टन माल आणि पैसा हलवला. जहाजाचा कप्तान प्रणव रक्षण करेल आणि संधी मिळाल्यास आम्हाला हव्या त्या बंदरास पोहोचवेल. शिवाजीच्या १२ फ्रिगेट्स आदल्या दिवशी पुढे गेल्या’
इतर चकमकी आणि इंग्रजांवर मात
याशिवाय शिवाजी महाराज आणि सिद्दीमधील नाविक चकमकी सर्वश्रुत आहे. महाराजांनी दांड्याचा जंजिरा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यात यश लाभले नाही. सिद्दीला पोर्तुगीजांची मदत होती. शिवाजी विरुद्ध आपण एकटे हतबल आहोत याची जाणीवही लवकरच सिद्दीला झाली. त्याने पोर्तुगीजांचे मांडलिकत्त्व स्वीकारले. एकमेकांची ताकद पुरती ओळखून मराठा आणि पोर्तुगीज यांनी तह केला. शिवाजी महाराज पोर्तुगिजांबरोबर डावपेचाच्या धोरणाचा अवलंब करत असत. इंग्रजांनी एका पत्रात पोर्तुगीज शिवाजी महाराजांना किती घाबरतात याचे वर्णन केले आहे. यानंतरच्या कालखंडातही मराठा आरमार आणि मुघल-सिद्दी यांच्यात चकमकी सुरूच राहिल्या. परंतु मराठा आरमाराला जंजिरा सर करणे शेवटपर्यंत शक्य झाले नाही. त्यामुळेच नाविक तळासाठी दुसरी पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरु झाले. यासाठी मुंबईजवळील खांदेरीची निवड करण्यात आली. शिवाजी महाराजांनी खांदेरीवर ताबा मिळवण्याचा प्रथम प्रयत्न १६६२ साली केला. परंतु बेटावर पाणी नसल्याने हा प्रयत्न तात्पुरता स्थगित केला गेला. १६७९ मध्ये पुनः प्रयत्न करण्यात आला. शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर सैन्य व सामान उतरवले तेव्हा मात्र इंग्रजांच्या स्वारस्याला खऱ्या अर्थाने धोका निर्माण झाला. शिवाजीसारख्या बलाढ्य शत्रूच्या हातात खांदेरी हे बेट असणे म्हणजे मुंबईच्या हृदयावर नेहमीच टांगलेली तलवार होती. इंग्रजांनी याला विरोध केला, परंतु त्यांना अपयशाने माघार घ्यावी लागली.
महाराजांनी स्थापन केलेले आरमार फार मोठे नव्हते. परंतु सातासमुद्रापलीकडून आलेल्या युरोपीय व्यापाऱ्यांच्या यशाचे मर्म त्यांच्या आरमारी शक्तीत आहे हे त्यांनी जाणले. शिवाजी महाराजांनी कोकणातील प्राकृतिक रचनेचा उपयोग किल्ले, बंदरे आणि नाविक तळ यांची स्थाने निवडण्यासाठी यशस्वीरीत्या केला. स्थानिक लोकांच्या समुद्र आणि नौकानयनातील ज्ञानाचा वापर आरमार सक्षम करण्यास केला. नवीन विचारसरणी अंगीकारून व्यापार आणि बंदरे सुरक्षित करून व्यापारात वाढ केली. म्हणून त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते.
संदर्भ:
आपटे, बी.के. मराठा नेव्ही आणि मर्चंटशिपचा इतिहास. १९७३.
जोशी, पी.आर. अमात्यकृत आद्यपात्र. १९६९.
मुखर्जी, आर.के. हिस्टरी ऑफ इंडियन शिपिंग. १९१२.
पेंडसे, एस. मराठा आरमार: एक अनोखे पर्व. २०१७.
सरकार, जे. शिवाजी आणि हिज टाइम्स. १९१९.
सेन, एस.एन. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ मराठास. १९२३.