मांसाहार हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जगातील काही लोक पूर्णपणे शाकाहाराचे पालन करीत असले तरी बहुतांश लोक मांसाहारावरच अवलंबून असतात. त्यामध्ये भारतात प्रामुख्याने चिकन, मटन, मासे, खेकडे इत्यादींचे सेवन केले जाते. जगभरात इतरही अनेक प्राणी मारून खाल्ले जातात. जगातील काही भागांमध्ये कीटकही अगदी चवीने खाल्ले जातात. आता सिंगापूर या देशानेही कीटक खाण्याला परवानगी दिली आहे. सिंगापूरच्या राज्य अन्न विभागाने (SFA) १६ प्रकारच्या खाद्य कीटकांची विक्री आणि त्यांचे सेवन करण्याला परवानगी दिली आहे. ८ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकामध्ये या संदर्भात काही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वेही घालून देण्यात आली आहेत. सिंगापूरने असा निर्णय का घेतला आहे, ते पाहूया.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींना रशियात मिळालेल्या ‘सेंट ॲण्ड्र्यू’ सर्वोच्च नागरी पुरस्काराचे महत्त्व काय?

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

सिंगापूरमध्ये मिळणार कीटकांचे पदार्थ

राज्य अन्न विभागाने (SFA) जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे, “हा निर्णय तातडीने लागू करण्यात येत आहे. आता कीटक आणि कीटकांवर आधारित उत्पादने आयात केली जाऊ शकतात. कमी जोखीम असलेल्या कीटकांच्या प्रजातींच्या आयात, विक्री आणि सेवन करण्याला परवानगी देण्यात येत आहे.” सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, टोळ, नाकतोडा, पेंड अळी अशा १६ प्रकारच्या किटकांना यामध्ये परवानगी देण्यात आली आहे.

“कीटक आणि कीटकांवर आधारित ही उत्पादने खाद्यपदार्थ म्हणून वापरली जाऊ शकतात तसेच ती पशुखाद्य म्हणून प्राण्यांनाही खायला दिली जाऊ शकतात.” मात्र, हे कीटक जंगलातून प्राप्त केलेले नसावेत, असेही कटाक्षाने नमूद करण्यात आले आहे, अशीही माहिती सीएनएनने दिली आहे. न्यूज एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरच्या राज्य अन्न विभागाने २०२२ सालच्या उत्तरार्धामध्ये कीटक आणि कीटक उत्पादनांसंदर्भात नियमन करण्यासंदर्भात लोकांशी सल्लामसलत केली होती. २०२३ सालच्या उत्तरार्धामध्येच १६ कीटकांच्या प्रजातींच्या सेवनाला परवानगी देणारा हा निर्णय लागू करण्यात येणार होता, अशी माहिती गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये देण्यात आली होती. मात्र, हा निर्णय लागू करण्यास विलंब झाला. कीटकांचे सेवन करणे ही बाब अद्याप सिंगापूरमध्ये परवलीची झालेली नाही. जगातील इतर देशांमध्येही कीटकांचे सेवन करणे सर्वसामान्य झालेले नाही. सिंगापूरमध्ये अनेकदा जिवंत कीटक विकले जातात. मात्र, ते सॉन्गबर्ड आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी खाद्य म्हणून विकले जातात. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरमधील स्थानिक शेफ, रेस्टॉरंट आणि खाद्य कंपन्या सुरक्षितपणे कीटक पुरवतात. ते प्रोटीन बार्ससारख्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये कीटक वापरतात.

काय आहे नियमावली?

राज्य अन्न विभागाने म्हटले, “सिंगापूरमधील कीटक उद्योग नवा असून कीटकांना खाद्यपदार्थ म्हणून नव्यानेच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्य अन्न विभागाने कीटकांच्या वापरासंदर्भात नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.” ज्यांना माणसांसाठी खाद्यपदार्थ अथवा पशुखाद्य म्हणून कीटकांची आयात, पैदास आणि विक्री करायची आहे, त्यांनी हे नियम पाळणे गरजेचे आहे. राज्य अन्न विभागाने पुढे असे म्हटले आहे की, या कीटकांची पैदास दिलेल्या नियमांनुसार आणि प्राधिकरणाद्वारे मान्यता दिलेल्या जागेतच केली गेली आहे, याचा कागदोपत्री पुरावाही असणे आवश्यक आहे. कीटक किंवा कीटक उत्पादनांची शेती करताना किंवा त्यावर प्रक्रिया करताना कोणत्याही प्रकारच्या प्रदूषकांचा वापर केला जाणार नाही, याची खात्री बाळगणे गरजेचे आहे. तसेच थेट जंगली अधिवासातून प्राप्त केलेल्या कीटकांना खाद्य म्हणून वापरले जाऊ शकत नाही. खाद्य म्हणून वापरण्यात येणारे कीटक हे परवानगी दिलेल्या १६ कीटकांच्या प्रजातींपैकीच हवेत. जर ते नसतील, तर ते मानवी खाद्य म्हणून वापरण्यास किती सुरक्षित आहेत, हे तपासले गेले पाहिजे. सध्या अन्न किंवा पशुखाद्य म्हणून कीटकांची विक्री आणि वापरासाठी कोणतीही आंतरराष्ट्रीय नियमावली अस्तित्वात नाही; मात्र सिंगापूरच्या राज्य अन्न विभागाने इतर काही देशांमधील नियमांचा आधार घेऊन आपली नियमावली तयार केली आहे.

हेही वाचा : रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!

प्रथिनांचा उत्तम स्रोत

संशोधकांनी कीटकांच्या २,१०० हून अधिक खाद्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश कीटक हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही प्रचंड असते. मिथेन वायू निर्माण करणाऱ्या गुरांसाठी हा चांगला पर्याय ठरतो. FAO च्या मते, जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये पशुधनाचा वाटा १४.५ टक्के आहे. या उत्सर्जनांचा पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. त्यामुळे कीटक हे प्रथिनांचा एक दुर्लक्षित स्रोत राहिले असले तरीही हवामान बदलाशी लढण्याचा एक उत्तम मार्ग ठरतात, असे २०२२ च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालामध्ये म्हटले आहे. मेक्सिकोच्या काही प्रदेशांमध्ये टोळ या कीटकाला स्वादिष्ट पदार्थ मानले जाते. थायलंड आणि कंबोडियामध्ये मुंग्या, क्रिकेट (कीटकाचा प्रकार) व अगदी टारंटुला या कीटकाचेही वारंवार सेवन केले जाते. अनेक पौष्टिक गरजा पूर्ण करणाऱ्या कीटकांच्या काही प्रजातींना युरोपियन युनियन ,तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया व थायलंड या राष्ट्रांनीही खाद्यान्न म्हणून परवानगी दिली आहे.