उपग्रहातील इलेक्ट्रॉनिक सामग्री निष्क्रिय होईल, ती अक्षरश: भाजून निघेल अथवा थेट अण्वस्त्र डागून उपग्रहच उडवला जाईल, असे अणुऊर्जेवर आधारित अंतराळ क्षेपणास्त्र रशिया विकसित करत आहे. विश्लेषकांनी यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर अमेरिकी प्रतिनिधीगृह गुप्तचर समितीच्या प्रतिनिधीने त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा इशारा दिल्याने अस्वस्थता पसरली. अंतराळात अण्वस्त्रांचा स्फोट घडवणे, उपग्रहांच्या कार्यात अडथळे आणण्याचे सामर्थ्य उपग्रहाधारीत जगात अतिशय विपरित परिणाम करू शकते.

रशिया नेमके काय करतोय?

रशियाच्या अंतराळ कार्यक्रमाचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये नव्या अस्त्राविषयी मतमतांतरे दिसून येतात. काहींना तो अंतराळातील अण्वस्त्र धोका वाटत नाही. उपग्रहांवर हल्ले करण्यासाठी अणुऊर्जाचलित उच्च शक्तीचे हे उपकरण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्यामध्ये ‘सिग्नल जॅमर’, प्रतिमा संवेदक निष्प्रभ करणारी शस्त्रे वा विद्युत चुंबकीय लहरींचा समावेश असू शकतो. जे एखाद्या क्षेत्रातील सर्व उपग्रहांची इलेक्ट्रॉनिक सामग्री उष्णतेने भस्मसात करतील. शस्त्रास्त्र नियंत्रण अधिवक्ता संघटनेच्या मते रशिया अणुऊर्जाचलित प्रणाली विकसित करत आहे. इलेक्ट्र्रॉनिक युद्ध क्षमतेचे हे अंतराळ क्षेपणास्त्र अण्वस्त्रही वाहू शकेल. अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेच्या अहवालात रशिया वैयक्तिक उपग्रहांना लक्ष्य करण्यासाठी खास रचनेची शस्त्रे तयार करत असल्याचे म्हटले आहे. सर्व उपग्रहांच्या संरचनेला धोका निर्माण करणारी ती उच्च शक्ती प्रणाली असण्याचा कयास आहे. नव्या आण्विक क्षमतांबाबतचे हे दावे रशियाने मात्र फेटाळले आहेत.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी…”, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
jitendra awhad
Somnath Suryavanshi : “अदृश्य शक्तींनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली”, शवविच्छेदन अहवालावरून जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
volodymyr zelensky
Russia Vs Ukraine War : ‘युद्धात मेलेल्या कोरियन सैनिकांचे रशिया जाळतोय चेहरे’; Video शेअर करत झेलेन्स्की यांचा गंभीर आरोप
Ukraine spy agency Sluzhba bezpeky Ukrainy SBU
विश्लेषण : युक्रेनची गुप्तचर संघटना इस्रायलच्या ‘मोसाद’पेक्षा धोकादायक? रशियाचा काटा काढणाऱ्या ‘एसबीयू’चा इतिहास काय?
russia cancer vaccine
आता कॅन्सरवरील उपचार शक्य? रशियाचा दावा काय? नवीन लस कसे कार्य करते?
loksatta editorial on igor Kirillov
अग्रलेख : रसायनांची सूडयात्रा!

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘शिक्षण हक्क कायद्या’तील बदलांचा संभाव्य परिणाम काय?

अमेरिकेला काय वाटते?

अमेरिकन प्रतिनिधीगृह गुप्तचर समितीच्या एका सदस्याने रशियाच्या कथित नव्या सामर्थ्याचा संबंध अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याशी जोडला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲँटनी ब्लिंकन यांनीही त्यावर मत मांडले. रशियाची ही सक्रिय क्षमता नाही. खुद्द अमेरिका रशियन अण्वस्त्र क्षमता व अंतराळाधारीत शस्त्रे विकसित करण्याचे कौशल्य बाळगून आहे. रशियाने हे अस्त्र निर्माण केले, पण ते तैनात झालेले नाही. रशियाच्या नव्या क्षमतेमुळे अमेरिकेला लगेचच कुठलाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांपासून रशिया व चीन अवकाश युद्धात आपल्या क्षमता विकसित करून अमेरिकेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा अधिकारी व अंतराळतज्ज्ञांनी वारंवार दिलेला आहे. अमेरिकी उपग्रहांना कोणताही धोका दूरगामी परिणाम करतील, असेही ते सूचित करतात.

हेही वाचा >>>‘इस्त्रो’ने GSLV रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असे टोपणनाव का दिले? यामागची नेमकी कहाणी काय?

धोके काय?

अंतराळातील जुन्या उपग्रहावर उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी अमेरिका, चीन आणि भारताने केल्यानंतर रशियाने तीन वर्षांपूर्वी त्याचे अनुकरण केले होते. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रे अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. विश्लेषकांकडून सांगितल्या जाणाऱ्या क्षमतेत तथ्य असल्यास अंतराळात अण्वस्त्राचा स्फोट करणे ही पूर्णत: वेगळी बाब ठरेल. त्याचे लष्करी आणि व्यावसायिक दोन्ही उपग्रहांवर गंभीर परिणाम संभवतात. उपग्रहविरोधी अस्त्र लष्करी व व्यावसायिक कार्य विस्कळीत करू शकतात. मागील काही दशकात अवघे जग उपग्रहाधारीत झाले आहे. उपग्रह हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. दळणवळण, संदेशवहन, हेरगिरी, जमिनीवरील स्थितीदर्शक प्रणाली (जीपीएस), हवामान, वातावरणीय अभ्यास, आर्थिक व्यवहार आदी क्षेत्रातील कार्य त्यावर अवलंबून आहे. याची धुरा सांभाळणारे उपग्रह निष्प्रभ झाल्यास हाहाकार उडू शकतो. सैन्य दलांच्या कार्यवाहीवर मर्यादा येतील. अमेरिकन सैन्याला तर त्याची सर्वाधिक झळ बसेल. उपग्रहांवर पूर्णपणे विसंबणे अंतराळ संघर्षात असुरक्षिततेला निमंत्रण देणारे आहे.

नियमनाची काही रचना आहे का?

या नव्या अस्त्राच्या निर्मितीमागे रशियाचा अण्वस्त्रे अंतराळात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. परंतु, तशी कृती १९६७ मधील बाह्य अंतराळ कराराचे उल्लंघन ठरते. कार्नेगी एन्डाॅव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस थिंक टँकचे अणुतज्ज्ञ जेम्स ॲक्टन यांनी त्यावर बोट ठेवले. अमेरिका व रशियाने स्वाक्षरी केलेल्या या करारानुसार अंतराळात आण्विक शस्त्रे वा कुठलीही सामूहिक संहारक शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध आहे. करार मदारांचे गांभिर्य कितपत बाळगले जाते, यावर त्यांचे भवितव्य निश्चित होते. उभयतांतील २०२३ मधील अण्वस्त्र नियंत्रणाशी संबंधित नवीन करार रशियाने तहकूब केला. ज्यातून किती अण्वस्त्रे बाळगावीत, हे ठरणार होते. सिक्युअर वर्ल्ड फाउंडेशनचे ब्रायन विडेन यांच्या मते रशियाने अंतराळात अण्वस्त्राचा स्फोट केल्यास त्याच्या विश्वासार्हतेला ओहोटी लागेल. लष्करी आणि व्यावसायिक दोन्ही उपग्रहांवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता ते वर्तवितात.

हेही वाचा >>>कमलनाथ भाजपाच्या वाटेवर, पण १९८४ च्या दंगलीमुळे अडचण; वाचा ४० वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

अंतराळ नवीन युद्धभूमी कशी बनतेय?

भविष्यातील युद्धे अंतराळात लढली जातील. त्या दिशेने प्रबळ राष्ट्रांकडून जय्यत तयारी सुरू आहे. विविध उपग्रहांचा दैनंदिन कार्यात वापर केला जातो. अंतराळातील संपत्ती सुरक्षित ठेवण्याची प्रत्येकास निकड आहे. उपग्रह नष्ट करून एखाद्या देशाचा कणा मोडता येऊ शकतो. त्यामुळे जगभरातील लष्करांचे अंतराळ हे महत्वाचे केंद्र बनले आहे. त्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली जात असून अंतराळात नव्या शस्त्रास्त्र स्पर्धेला तोंड फुटले आहे. आधुनिक युद्धात मुख्य रोख लढाईपूर्वीच शत्रूला निष्प्रभ करण्यावर राहणार आहे. टेहेळणी व माहिती दळणवळण अशा वेगवेगळ्या प्रयोजनाचे उपग्रह नष्ट झाल्यास त्याचे विपरित परिणाम केवळ लष्करीच नव्हे तर, नागरी क्षेत्रालाही सहन करावे लागतील. त्यामुळे अंतराळ या नव्या युद्धभूमीवर संघर्षासाठी नव्या अस्त्रांवर काम प्रगतीपथावर आहे. रशियाचे अस्त्र हा त्याचाच एक भाग.

Story img Loader