महादेव बुक बेटिंग ॲपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावल्यामुळे या विषयी देशभरात चर्चा सुरू आहे. पण हे प्रकरण नेमके काय आहे, रणबीर कपूरसह इतर तारांकीत कलाकारांचा या प्रकरणाशी काय संबध याबाबत माहिती घेऊ या.

महादेव बेटिंग ॲपची सुरुवात कशी झाली?

सौरभ चंद्राकर हा महादेव ॲपचा मालक. तो दुबईत बसून महादेव बुक बेटिंग ॲप चालवत होता. छत्तीसगडमधील भिलाई येथील तो रहिवासी. तेथे तो फळांचा रस विकण्याचे काम करीत होता. करोनाकाळात टाळेबंदी असताना तो सट्टेबाजीशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आला. त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. त्याने हैदराबादला जाऊन त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून बेटिंग ॲपची निर्मिती झाली. महादेव बुक ॲप प्रकरण सध्या देशात खूप गाजत आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आहे. या ॲपची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा संशय आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे. यासोबतच हे ॲप यूजर आयडी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी करण्यात येत होती.

Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…

हेही वाचा – सिक्कीममध्ये हिमनदी तलाव फुटून १४ मृत्यू, १०२ लोक बेपत्ता; तलाव कसे फुटतात?

बेटिंग ॲपचे काम कसे चालते?

सौरभ चंद्राकर व भागीदार रवी उप्पल हे दोघे महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ॲपचे प्रवर्तक आहेत. या संपूर्ण बेटिंग व्यवसायाची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा ईडीला संशय आहे. हे ॲप यूएईमधून चालवण्यात येत असून त्याची संगणकीय यंत्रणा, संकेतस्थळाची यंत्रणा नेदरलँडमध्ये आहे. ॲपचा प्रचार करण्यासाठी नेपाळ, यूएई व श्रीलंका येथून कॉल सेंटर चालवले जात असल्याचा ईडीला संशय आहे. व्हॉट्सॲपद्वारे या ॲपची जाहिरात करण्यात येत होती. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर त्याची माहिती कॉल सेंटरला मिळत होती. तेथून सर्व माहिती दिल्यावर संबंधित व्यक्तीचे आभासी खाते उघडण्यात येत होते. त्यानंतर त्यात रक्कम भरून ॲपद्वारे बेटिंग करण्यात येत होती. या सर्व यंत्रणेमागे देशभरात चार ते पाच हजार पॅनल ऑपरेटर कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक ऑपरेटर छत्तीसगड, मुंबई आणि दिल्ली येथे आहेत. प्रत्येक ऑपरेटर किमान २०० ग्राहक सांभाळतो. या सर्व व्यवहारांसाठी ऑपरेटरला ३० टक्के मिळतात. उर्वरित रक्कम पुढे पाठवण्यात येत होती. आठवड्यातील सर्व व्यवहार प्रत्येक सोमवारी बंद करण्यात येत होते. या ॲपद्वारे दररोज सुमारे २०० कोटी रुपये फायदा मिळत असल्याचा अंदाज आहे. महादेव ॲपचे प्रवर्तक सुमारे ४ ते ५ ॲप चालवत असल्याचा ईडीला संशय आहे. पाकिस्तानातही या टोळीचे बेटिंग ॲप सुरू असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती.

रणबीर कपूरचा या प्रकरणाशी काय संबंध?

रणबीर कपूरने विविध समाजमाध्यमांवर ॲपसाठी जाहिरात केल्याचा आरोप आहे. त्या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे. या जाहिरातीसाठी त्याला मोठी रक्कम मिळाल्याचा संशय आहे. रणबीरसह आणखी सुमारे १२ हून अधिक तारांकित कलाकार, खेळाडू या ॲपच्या समाज माध्यमांवरील प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यात तेलुगू चित्रपटसृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे. ईडी लवकरच त्यांचेही जबाब नोंदवण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रचाराची सर्वाधिक रक्कम रणबीरपर्यंत पोहोचल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे रणबीर कपूरने समाजमाध्यमांवर ॲपचा प्रचार केला. त्याबाबतचा व्यवहार व इतर माहिती त्याच्याकडून घेण्यात येणार आहे. याप्रकरणात एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येईल, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणाचा इतर बॉलीवूड कलाकारांचा काय संबंध?

या प्रकरणाची कुणकुण झारखंड राज्यापूर्ती मर्यादित होती. पण फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी रोख सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमान भाड्याने घेण्यात आले होते. लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना बोलवण्यात आले होते. लग्नकार्याचे नियोजन, नर्तक, सजावट करणारे यांनाही मुंबईतून बोलवण्यात आले होते. अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरूचा, आतिफ अस्लम, अभिनेता पुलकीत, भाग्यश्री, कीर्ती खबंदा, एली अवराम यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केल्यामुळे सर्वच यंत्रणांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुराव्यानुसार, योगेश पोपट यांच्या मेसर्स आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले आणि ४२ कोटी रुपय हॉटेल नोंदणीसाठी खर्च करण्यात आले.

हेही वाचा – विश्लेषण : नितीशकुमार यांची ओबीसी जनगणनेची खेळी… भाजपबरोबर ‘इंडिया’तील सहकारी पक्षांचीही कोंडी?

कलाकारांचे आर्थिक व्यवहार कोणत्या प्रकारचे आहेत?

महादेव बुक बेटिंग ॲपकडून तारांकित कलाकारांमध्ये रोखीने व्यवहार झाला आहे. त्यात इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यामातून या कलाकारांशी संपर्क साधण्यात आला. अनेक कलाकारांनी ८० टक्के रक्कम रोखीने व २० टक्के धनादेशाद्वारे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची सर्व माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कलाकारांना मिळालेली रोख रक्कम हवाला नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीकडे या लग्नाच्या चित्रफीती आहेत. याप्रकरणी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीशी संंबधित व्यक्तींचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. त्यात या कलाकारांच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती ईडीला मिळाली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली?

ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. पोपट या अंगडियाची झडती घेण्यात आली. त्यात दोन कोटी ३७ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १३ कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले. गोविंद केडियाच्या मदतीने विकास चपरिया यांनी त्यांच्या संस्थांद्वारे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. २३६ कोटी ३० लाख रुपयांची गुंतवणूक ईडीने गोठवली आहे. तसेच ईडीने केडियाच्या डीमॅट होल्डिंग्समधील १६० कोटी रुपयांची मालमत्ता पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत गोठवली आहे. या संपूर्ण कारवाईत ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आली आहे. रायपूर येथील विशेष न्यायालयाने फरार संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याशिवाय अभिनेता रणबीर कपूरलाही समन्स बजावण्यात आला आहे. ईडी इतर कलाकारांनाही समन्स बजावण्याची शक्यता आहे. याप्रकरणी झारखंडमधील एका राजकीय सल्लागाराच्या कुटुंबियांचीही ईडीने चौकशी केली आहे.