आपल्या लष्करी क्षमतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी भारतीय सैन्याकडून पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारीत असलेली पाळत यंत्रणा तैनात करण्याकडे लक्ष दिले जात आहे. सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत पाळत यंत्रणा सीमेवर तैनात केली आहे. यामध्ये हाय रिझोल्यूशन कॅमेरे, सेन्सर, मानवरहित हवाई वाहन (UAV) आणि रडार यंत्रणेचा समावेश आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी शोधण्यासाठी सर्व उपकरणांमधून एआयद्वारे माहिती गोळा केली जाते आणि त्या माहितीनुसार कार्यवाही करण्यात येते. डीडब्लू या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर लेख लिहिला आहे. त्याबाबत घेतलेला हा आढवाा …

लष्कारासाठी एआयचा वाढता वापर

दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी एआयवर आधारित असलेले रिअल टाईम मॉनिटरिंग सॉफ्टवेअरदेखील भारताकडून तैनात करण्यात आले आहे. यासह सैन्यात नव्याने भरती करण्यात आलेल्या तुकडीला हाय-टेक सिम्युलेटर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण (संगणकीय सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने एखाद्या समस्येचे निराकरण शोधणे आणि त्यानुसार निर्णय घेण्याच्या तंत्रज्ञानाला सिम्युलेटर म्हणतात) देण्यात येत आहे. भविष्यकाळात सैन्यात लष्करी प्रशिक्षण देत येत असताना अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाऊ शकतो.

EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर

संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकऱ्याने डीडब्लू संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, एआयमुळे सैन्यामधील लॉजिस्टिक, इन्फॉर्मेशन ऑपरेशन्स, गुप्तचर माहितीचे संकलन आणि विश्लेषण यामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास भारतीय लष्कराने अलीकडे सुरुवात केली असली तरी एआय सक्षम लष्करी उपकरणे सीमेवर तैनात करण्यात भारताने लक्षणीय प्रगती साधली आहे. सीमेवर पाळत ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ड्रोन आणि रोबोट्स वापरल्यामुळे अधिक स्पष्ट माहिती मिळत आहे, तसेच धोकादायक परिस्थितीत मानवी हस्तक्षेपाची जोखीमही यामुळे कमी झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जुलै २०२२ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी “एआय इन डिफेन्स” या कार्यक्रमात बोलत असताना भारतीय लष्कराने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत ७५ उपकरणांचा वापर सुरू केला असल्याची माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना भारतीय लष्कर रोबोटिक्स, ऑटोमेशन टुल्स आणि इंटिलिजन्स सर्व्हेलन्स सारखे कृत्रिम बुद्धमत्तेवर आधारित उपकरण वापरणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्र्यांनी केली होती.

भारत आणि अमेरिके दरम्यान ‘संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता संवाद’ कार्यक्रमाचे उदघाटन आणि संयुक्त सायबर प्रशिक्षणाचे विस्तारीकरण करण्यास सहमती दर्शविण्यात आलेली आहे.

यावर्षाच्या सुरुवातीला आशियातील सर्वात मोठ्या हवाई शोपैकी एक असलेल्या ‘एरो इंडिया’ (Aero India) मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या अग्नी-डी (AGNI-D) या सर्व्हेलन्स सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात आले. पाळत ठेवणे आणि सीमेपलीकडून होणाऱ्या उल्लंघणाला आळा घालणे, ही कामे या उपकरणाच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे. चीनच्या अगदी जवळ आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश असलेल्या पूर्व लडाख सेक्टरमध्ये हे उपकरण तैनात करण्यात आले आहे.

अग्नी-डी सॉफ्टवेअर लष्कराने सीमेवर पाळत ठेवण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यामधून शस्त्र, लष्करी वाहन, टँक किंवा क्षेपणास्त्र यांच्या हालचालीची माहिती गोळा करते. सॉफ्टवेअरमधील अद्ययावत अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कॅमेऱ्यातील फोटो आणि व्हिडिओचे विश्लेषण केले जाते. सीमेवर होणाऱ्या संशयास्पद हालचालीची माहिती सैनिकांना देऊन सतर्क करण्यात येते.

युद्धाच्या साधनांवर प्रभाव

संरक्षण क्षेत्राशी संबंधित थिंक टँक ‘दिल्ली पॉलिसी ग्रुप’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणांसाठी वार्षिक ५० दशलक्ष डॉलर्सचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पॉलिसी ग्रुप या संस्थेने म्हटले, “सुरुवात म्हणून हे एक चांगले पाऊल आहे. परंतु आपल्याला धोरणात्मक आव्हान देणाऱ्या चीनच्या तुलनेत ही तरतूद अतिशय अपुरी आहे. चीन या रकमेच्या तीस पट अधिक निधी खर्च करत आहे. जर आपल्याला तंत्रज्ञानात मागे पडायचे नसेल आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन एआय उपकरणे उत्पादित करायची असतील तर आणखी जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे.”

अमेरिका आणि चीन या देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये आणि त्यांच्या संरक्षण यंत्रणेमध्ये अत्याधुनिक नवकल्पनांचा समावेश केला असला तरी भारतही मागे राहिलेला नसून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतही युद्धकौशल्यात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून स्वतःला आघाडीवर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

संरक्षण क्षेत्राचे जाणकार आणि लेफ्टनंट जनरल शंकर प्रसाद यांनी डीडब्लूला माहिती देताना सांगितले की, “युद्धात लढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंतर्भाव करणे महत्त्वाचे असल्याचे भारताच्या लक्षात आले आहे. सीमा नियंत्रणापासून ते सर्वसमावेशक पाळत ठेवण्यापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ड्रोन आणि विमान तंत्रज्ञान वापरल्यामुळे दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळेस शोध मोहिमेत अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करणे सोपे जात आहे. त्यामुळेच जगातील इतर लष्करी शक्तींप्रमाणे भारतीय लष्करासाठीही एआय लाभदायक ठरणार आहे.”

मानवी बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष होऊ शकते?

शंकर प्रसाद यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा दाखल दिला. इस्रायलसारख्या अतिशय प्रगत आणि सीमेवर पाळत ठेवण्यामध्ये जगातील इतर देशांपेक्षा सर्वाधिक अद्ययावत यंत्रणा वापरणाऱ्या देशाच्या यंत्रणेतील मर्यादा प्रखरपणे समोर आल्या आहेत. यंत्रणेतील या मर्यादामुळे आता इस्रायल आणि हमासमध्ये पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू झाले आहे. “इस्रायलची यंत्रणा अपयशी होणे, हा सर्वच देशांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे. इस्रायलची पाळत ठेवणारी यंत्रणा आणि गुप्तचर विभाग इतर देशांपेक्षाही अत्याधुनिक आहे. तरीही हमासचा हल्ला होणार आहे, याचे आडाखे बांधण्यात ते अपयशी ठरले आणि या हल्ल्याची कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा यंत्रणेकडून देण्यात आला नाही”, अशी माहिती शंकर प्रसाद यांनी दिली.

शंकर प्रसाद यांच्याप्रमाणेच लेफ्टनंट जनरल पी. आर. कुमार यांनीही प्रतिक्रिया दिली. लष्करी कारवाईचे माजी महासंचालक राहिलेल्या कुमार यांनी सांगितेल की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जी माहिती किंवा डेटा मिळेल त्याचा अर्थ लावण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता अतिशय आवश्यक आहे. एखाद्या देशाकडे नाविन्यपूर्ण लष्करी क्षमता असू शकते. परंतु या यंत्रणेतून मिळालेल्या डेटाला अर्थ लावण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मानवी क्षमतांची तितकीच गरज असते.

दिल्लीस्थित ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन या जागितक स्तरावरच्या थिंक टँकने मध्यंतरी एक अहवाल प्रकाशित केला. ज्यामध्ये नमूद करण्यात आले की, संरक्षण खात्याच्या तीनही दलांनी आधुनिक युद्ध पद्धतीतील नवकल्पनांचा स्वीकार केला आहे. मात्र त्याचा विकास तीनही दलात असमान स्वरुपात आहे.

आधुनिक संरक्षण यंत्रणेसाठी एआय आवश्यक

भारतीय लष्करातून उपप्रमुख या पदावरून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल रवी साहनी यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे अनेक सक्षम तंत्रज्ञानापैकी एक असून भविष्यकाळात युद्धाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी याचा वापर होणार आहे. डीडब्लूशी बोलताना साहनी यांनी म्हटले की, आपण आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे लष्कराने जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरुवात केली नाही तर आपण तांत्रिकदृष्ट्या मागास होऊ शकतो. एआयशिवाय माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया ठरू शकते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर लष्करी सामर्थ्य अधिक अवलंबून राहिल्यास लष्कारातील मानवी घटकांना अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे, हेदेखील लक्षात घ्यावे लागेल.

Story img Loader