जागतिक तापमानवाढ हा जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि जागतिक तापमानवाढीमुळे जगातील नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढलाय. तापमानात लक्षणीयरीत्या होणार्‍या वाढीमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. सध्या याच्याशीच संबंधित एक घटना म्हणजे अंटार्क्टिकाचा भाग असलेला जगातील सर्वात मोठा हिमखंड आपल्याच जागेवर फिरत आहे. ३० वर्षांहून अधिक काळ हा हिमखंड अंटार्क्टिकमध्ये समुद्राच्या तळात फसला होता.

न्यूयॉर्क शहराच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या पाचपट आणि हजार फुटांपेक्षा जास्त खोल असलेला हा हिमखंड अखेर २०२० मध्ये आपल्या जागेवरून सरकला आणि दक्षिण महासागराच्या दिशेने हळूहळू वाहू लागला. मात्र, आता हा हिमखंड मध्येच अडकला असून एका जागेवर फिरत असल्याचे लक्षात आले आहे. ही घटना जगासाठी चिंतेचे कारण ठरू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर या हिमखंडाविषयी सविस्तर जाणून घेऊ.

Shapoorji Pallonji Group latest marathi news
टाटा सन्सच्या ‘आयपीओ’बाबत शापूरजी पालनजी समूह आग्रही
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
icici prudential value discovery fund
आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची द्विदशकपूर्ती; गुंतवणुकीवर ‘निफ्टी’च्या तुलनेत दुप्पट लाभ
Large Ozone Hole Detected Over Antarctica
भूगोलाचा इतिहास : आभाळाला छिद्र?
gangster janglya satpute marathi news
पुणे: घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
russian spy whale death
नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?
Cyclone in August after sixty years in the Arabian Sea Pune news
अरबी समुद्रात साठ वर्षांनी ऑगस्टमध्ये चक्रीवादळ
न्यूयॉर्क शहराच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या पाचपट आणि हजार फुटांपेक्षा जास्त खोल असलेला हा हिमखंड अखेर २०२० मध्ये आपल्या जागेवरून सरकला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : Gen X आणि Millenials पिढीला कॅन्सरचा सर्वाधिक धोका; कारण काय?

हिमखंड फिरतोय एकाच जागेवर

हिमखंड अंटार्क्टिकातून पुढे सरकल्यानंतर सीमाउंट म्हणजेच पाण्याखालील पर्वताच्या भोवऱ्यात अडकला. हा हिमखंड सुमारे १५०० चौरस मैल क्षेत्रफळात पसरलेला असून, एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या लांबीइतका खोल आहे. यावरून हा हिमखंड किती महाकाय असेल, याचा अंदाज लावता येतो. जवळ जवळ २४ दिवसांपासून हा महाकाय हिमखंड हळूहळू एकाच जागेवर फिरत आहे. या हिमखंडाचे नाव आहे ‘A23a’. अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या सुमारे ३७५ मैल ईशान्येस, दक्षिण ऑर्कनी बेटांजवळ हा हिमखंड फिरत आहे. याची माहिती ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण, युनायटेड किंगडमच्या ध्रुवीय संशोधन संस्थेने सोशल मीडियावर दिली. “मुळात तो त्या भागात अडकला असून एका जागेवर फिरत आहे आणि हळूहळू वितळत आहे,” असे भौतिक समुद्रशास्त्रज्ञ आणि ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षणातील ओपन ओशन रिसर्च ग्रुपचे प्रमुख ॲलेक्स ब्रेअरले यांनी सांगितले. यातून हा हिमखंड कधी बाहेर पडेल हे सांगणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.

तापमानात लक्षणीयरीत्या होणार्‍या वाढीमुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

A23a म्हणजे नक्की काय?

A23a सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. A23a हा आकारात A23 पेक्षाही मोठा आहे. A23 हा १९८६ मध्ये फिल्चनर आइस शेल्फमधून तुटलेल्या किंवा वाहून गेलेल्या तीन हिमखंडांपैकी एक होता. A23 हे सोव्हिएत युनियन संशोधन केंद्राचे घर होते. A23a त्या वर्षाच्या उत्तरार्धात वेगळा झाला आणि वेडेल समुद्रात तळाशी धडकला, जिथे तो आणखी ३४ वर्षे राहील असा अंदाज होता. २०२० मध्ये, A23a आपल्या जागेवरून हलला. डिसेंबरमध्ये हा हिमखंड वारे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे हळूहळू पुढे सरकू लागला. डिसेंबरमध्ये याच्या अभ्यासासाठी ब्रेअरले आणि एका संशोधन जहाजाला या हिमखंडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जवळजवळ संपूर्ण दिवस लागला. हे पाहून ते पूर्णपणे थक्क झाले. “याचे वर्णन करणे कठीण आहे. हा जमिनीसारखा दिसतो, इतकेच सांगता येऊ शकते,” असे ब्रेअरले म्हणाले.

हा हिमखंड कधीपासून फिरत आहे?

वसंत ऋतूपासून A23a आपल्या जागेवर फिरू लागला. उपग्रह प्रतिमाच्या मदतीने ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण संस्थेला एप्रिलमध्ये पहिल्यांदा हा हिमखंड फिरत असल्याचे आढळून आले. अंटार्क्टिकामधील या हिमखंडांना ते नक्की कुठे उगम पावले या आधारावर A, B, C, D असे नाव दिले जाते. जेव्हा या हिमखंडांचा आकार मोठा होतो, तेव्हा नावांशी आकडे जोडले जातात. A23a हा जगातील सर्वात मोठ्या हिमनगांच्या यादीत किती काळ राहील हे सांगणे कठीण आहे. कारण, A76 २०२१ मध्ये सर्वात मोठा हिमखंड होता. परंतु, हा हिमखंड दोन वर्षांत वितळत गेला, त्यामुळे त्याचा आकार कमी झाला.

A23a सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. A23a हा आकारात A23 पेक्षाही मोठा आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या घटनेचे कारण काय?

हा हिमखंड दक्षिणी महासागराच्या एका भागात अडकला आहे, ज्याला आइसबर्ग ॲली म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण हिमनगांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. सामान्यतः, मोठे हिमखंड वेगाने पुढे जातात आणि सागरी प्रवाहाच्या दिशेने खेचले जातात. कालांतराने बर्फाचे हे तुकडे पूर्वेकडे उष्ण पाण्याकडे सरकतात आणि वितळू लागतात, ज्यामुळे त्यांचे विघटन होते. A23a हा हिमखंड सीमाउंट्सभोवती निर्माण होणारा विद्युतप्रवाह म्हणजेच टेलर कॉलममध्ये अडकला आहे आणि घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहे. A23a हा सुमारे १०० किलोमीटर (सुमारे ६२ मैल) वर तरंगतो आहे. ही एक सुंदर भूभौतिकीय घटना आहे, असे ब्रेअरले यांचे सांगणे आहे.

हेही वाचा : ‘मुलांना जन्म देण्याऐवजी पाळीव प्राणी बरे’; ‘या’ देशात वाढतोय पाळीव प्राण्यांचा ट्रेंड, कारण काय?

हे टेलर कॉलम किती वारंवार तयार होतात किंवा त्यामध्ये आजपर्यंत किती वेळा हिमखंड अडकले आहेत, हे माहीत नाही आणि घटनेची वारंवारता पूर्णपणे समजून घेण्यासाठी पुरेसा उपग्रह डेटा किंवा पाण्याखालील मॅपिंग उपलब्ध नाही, असे ब्रेअरले यांनी सांगितले. हिमखंड किती काळ जागेवर राहील हे देखील स्पष्ट नाही. पण, एक गोष्ट स्पष्ट असल्याचे ब्रेअरले यांचे म्हणणे आहे आणि ती म्हणजे, हा हिमखंड सध्या वितळणार नाही आणि दक्षिण गोलार्धात पूर येणार नाही. त्यांनी याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, केवळ A23a सारखे हिमखंडच जागतिक समुद्र पातळी वाढण्यास कारणीभूत ठरत नाहीत. बर्फ आधीच समुद्रात तरंगत आहे. हवामान शास्त्रज्ञ चिंतित आहेत की, तापमानवाढीमुळे बर्फाच्या शेल्फचे मोठे भाग खराब झाल्यामुळे खंडातील हिमनद्या धोक्यात आल्या आहेत. जर A23a या भोवऱ्यात जास्त वेळ अडकून पडला तर हिमखंड लक्षणीयरीत्या वितळू शकतो आणि त्या भागातील सागरी अन्नसाखळीतील प्लँक्टन आणि इतर जीवांवर याचा परिणाम होऊ शकतो, असे ब्रेअरले म्हणाले.