देशातील अनेक जण हे विविध कारणांसाठी परदेशात जाण्यास उत्सुक आहेत, पण काही देशांचा व्हिसा मिळण्यासाठी काही आठवडे ते काही महिन्यांचा कालावधी लागत आहे अशी परिस्थिती सध्या भारतात आहे. व्हिसा मिळण्यासाठी प्रतिक्षा यादी ही मोठी आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

जगातील काही देशात जाण्यासाठी व्हिसा उपलब्ध नसून इमिग्रेशन कार्यालयातील प्रतिक्षा यादी ही काही आठवडे ते महिन्यांवर पोहचल्याचं चित्र जगभर बघायला मिळत आहे. विशेषतः भारतातून परदेशात जाणाऱ्या इच्छुकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून इमिग्रेशन कार्यालयातील प्रतिक्षा यादी ही दिवसेंदिवस वाढत आहे, व्हिसा मिळणे कठीण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अमेरिकेाचा व्हिसा मिळण्यासाठी तब्बल वर्षभर थांबावे लागेल अशी परिस्थिती भारतात आहे. एवढंच नाही तर कॅनडाचा व्हिसा मिळण्यासाठी किमान सहा महिने तर इंग्लंडचा व्हिसा मिळण्यासाठी सरासरी सहा आठवडे थांबावे लागत आहे.

या सर्व प्रतिक्षा यादीबाबत परराष्ट्र मनंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले “परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, झेक रिपब्लिक, जर्मनी, न्युझिलंड, पोलंड, इंग्लंड आणि अमेरिका या देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. भारतीय नागरीकांना विशेषतः विद्यार्थ्यांना व्हिसा सुलभतेने मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्याना व्हिसा लवकर मिळवून देण्याबाबत आणखी पावले उचलू असं संबंधितांनी आश्वासन दिलं आहे “.

कोणत्या देशांकडून व्हिसा मिळण्यास विलंब होत आहे ?

अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि युरोपातील अनेक देशाकडून व्हिसा मिळण्यास भारतीयांना अडचणी येत आहेत. एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकच्या दुतावास मुंबई आणि दिल्लीत नवे व्हिसासाठी अर्ज हे सप्टेंबरपासून स्विकारायला सुरुवात होणार आहे. सध्या व्हिसासाठी देण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळा या एप्रिल २०२३ पर्यंत आधीच बुक झाल्या आहेत. तर इंग्लडसाठी व्हिसाची प्रक्रिया पुर्ण व्हायला किमान सहा आठवड्यांचा कालावधी तर कॅनडासाठी चार महिन्यांचा कालावधी लागत आहे. जर्मनीच्या दुतावासाकडून सांगण्यात आले आहे की व्हिसाची प्रक्रिया पुर्ण करण्यासाटी किमान १५ दिवसांचा कालावधी लागत आहे, तेव्हा त्यानुसार तुमच्या प्रवासाचे नियोजन करा.

‘हिंदू बिझिनेस लाईन’ ने दिलेल्या वृत्तानुसार ग्रीस आणि स्पेन या देशांचा व्हिसा मिळण्यासाछी किमान सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागत आहे. मनिकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार डेन्मार्क देशाने तर व्हिसा अर्जांची संख्या लक्षात घेता अल्प कालावधीसाठी आणि निवासासाठी आवश्यक असलेल्या व्हिसाचसाठीचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही कालावधीसाठी स्थगित केली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, अर्जदारांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन व्हिसाचे अर्ज घेणे थांबवले असल्याचे डेन्मार्क दुतावासाने जाहिर केले आहे.

हे सर्व का होत आहे ?

काही देशांचे व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेत भारतातसह अनेक देशात विलंब होत असल्याबद्दल तज्ञांनी काही मते व्यक्त केली आहेत. पर्यटन व्हिसासाठी आलेले मोठ्या प्रमाणात अर्ज, दुतावासांमध्ये असलेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा, विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज आणि व्यावसायिक व्हिसाचे वाढते प्रमाण यामुळे व्हिसा मिळण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ICRA संस्थेच्या म्हणण्यानुसार करोना काळाच्या आधीच्या तुलनेत व्हिसासाठी आलेल्या अर्जांचे प्रमाण हे ७२ टक्क्यांनी वाढले आहे.

VFS Global च्या प्रवक्यांनी ‘दि हिंदू’ला दिलेल्या माहितीनुसार भारतात दररोज २० हजार एवढ्या संख्येने व्हिसासाठी अर्ज येत आहेत. यामधील बहुतांश अर्ज हे पर्यटनासाठीचे आहेत. आता जगभरात करोनावरील निर्बंध हे दूर झाले आहेत, विविध देशातंमधील सीमा या खुल्या झाल्या आहेत, त्यामुळे भारतासह जगभरात पर्यटनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

करोना काळात भारतातील अनेक दुतावासांनी व्हिसा सुविधा या तात्पुरत्या बंद केल्या होत्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठवले होते. भारतातील करोना परिस्थिती लक्षात घेता पुन्हा दुतावास सुरु करत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना परत आणणे संबंधित दुतावासांना कठीण गेले आहे.

युरोपातील दुतावासाने मनिकंट्रोलला दिलेल्या प्रतिक्रियेत म्ंहटले आहे की घरी बसुन काम करण्याचे प्रमाण वाढल्याने दुतावासमधील कर्मचाऱ्यांनी भारतात येण्यापेक्षा त्यांच्या देशात घरीच थांबत दुसरी नोकरी करणे पसंद केले. फर्स्टपोस्टने दिलेल्या वृत्तानुसार काही ट्रँव्हल एजंट असोसिएशनने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहीत, सरकारी पातळीवर चर्चा करत अमेरिका आणि युरोपातली देशांच्या व्हिसा मिळण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

भारतीयांनी काय केले पाहिजे ?

व्हिसा मिळण्यास लागणारा सध्याचा विलंब लक्षात घेता प्रवासाचे आणखी काटेकोर नियोजन करत काही महिने आधीच व्हिसासाठी अर्ज करावा असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

VFS Global चे प्रतिनिधी शुभाशिष गांगुली यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की व्हिसाचे अर्ज स्विकाराला किमान तीन महिने लागत आहेत. युरापोतील प्रवासासाठी व्हिसा मिळावा यासाठी किमान सहा महिने आधी अर्ज केला पाहिजे.

काही तज्ञांनी तर व्हिसाला होणारा विलंब लक्षात घेता प्रवासाचे-सुट्टी घालवण्याचे ठिकाणच बदलण्याचा सल्ला दिला आहे.

विलंब टाळण्यासाठी आणखी कोणता मार्ग आहे का ?

करोनावरील जगभरातील निर्बंध शिथील झाल्यावर जगभरातील विविध विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांकडून व्हिसाचे अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत, होत आहेत. यासाठी निर्धारीत वेळेआधीच व्हिसासाठी अर्ज करावा,संबंधित विद्यापीठांच्या संपर्कात रहावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या व्हिसा अर्जांचे प्रमाण लक्षात घेता दुतावासांनी विशेष पावले उचलण्याची आवशक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why there is a delay in getting visa for us canada england and european countries what steps citizens should follow to avoid delay asj
Show comments