सध्या टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमतीत २० रुपयांनी वाढ झाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाने दिल्लीत ६५ रुपये प्रतिकिलोग्राम या अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू केली. सोमवारी काही भागांत टोमॅटोच्या किरकोळ किमती १२०-१३० रुपयांपर्यंत पोहोचल्या. देशभरात टोमॅटोसाठी ग्राहक ८० ते ९० रुपये देत आहेत. मंत्रालयाने संकलित केलेल्या ग्राहक किमतींच्या डेटामध्ये ७ ऑक्टोबर रोजी सरासरी किमती एक महिन्यापूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढल्या आहेत. मात्र, टोमॅटोचे दर अचानक वाढण्याचे कारण काय? हे दर आणखी वाढतील की घटतील? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोमॅटोचे दर वाढण्याचे कारण काय?

अपेक्षेपेक्षा कमी पेरणी आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांतील पीक नष्ट झाले आहे. अचानक दर वाढण्याची ही मुख्य कारणे आहेत. २० सप्टेंबरपर्यंत खरीप टोमॅटोची एकूण १.९८ लाख हेक्टर पेरणी नोंदवली गेली. या कालावधीपर्यंत २.८९ लाख हेक्टर पेरणी होणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी याच तारखेला खरीप टोमॅटोची २.२० लाख हेक्टर पेरणी झाली होती. खरीप टोमॅटोचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये घेतले जाते; तर रब्बी पीक महाराष्ट्राच्या काही भागांत आणि कर्नाटकच्या काही भागांत घेतले जाते. फेब्रुवारी-मार्चमध्ये रब्बी टोमॅटोची पुनर्लागवड केली जाते आणि सुमारे १६० दिवसांनी कापणी केली जाते. खरीप पिकाची लावणी जून-जुलैनंतर केली जाते आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सप्टेंबरपर्यंत पुनर्लागवड केली जाते.

दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमतीत २० रुपयांनी वाढ झाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाने दिल्लीत ६५ रुपये प्रतिकिलोग्राम या अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : भूकंप की अणू चाचणी? इराणमधील रहस्यमयी भूकंपामागे नक्की काय?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक अभिजित घोलप यांनी सांगितले की, गेल्या वर्षातील अतिउष्णता लक्षात घेता, अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटोऐवजी मक्यासारख्या पिकांची लागवड करण्याचे ठरवले. “रब्बी टोमॅटोचे पीक ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले. देशातील मक्याचे क्षेत्र गतवर्षी ८४.५६ लाख हेक्टर होते, जे या वर्षी ८८.५० लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. तीव्र हवामानातही हे पीक टिकून राहते आणि धान्य-आधारित इथेनॉल उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळेही मक्याची लोकप्रियता वाढली आहे.

गेल्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर जीवाणू आणि विषाणूजन्य रोगाचा हल्ला झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. शेतकरी म्हणतात की, टोमॅटोला प्रतिएकर किमान एक ते दोन लाख रुपयांचे भांडवल आवश्यक आहे. जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांमुळे त्याचा उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी यंदा टोमॅटोची लागवड केली नाही हेदेखील भाववाढीचे एक कारण सांगितले आहे.

गेल्या वर्षातील अतिउष्णता लक्षात घेता, अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटोऐवजी मक्यासारख्या पिकांची लागवड करण्याचे ठरवले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘हा’ देश समुद्राखाली साठविणार कार्बन डाय-ऑक्साइड; कारण काय?

टोमॅटोचे दर कधी कमी होतील?

नाशिकच्या पिंपळगाव बसवंतच्या घाऊक बाजारात टोमॅटोची मोडल (सरासरी) किंमत सध्या ५२-५५ रुपये प्रतिकिलो आहे. येत्या काही दिवसांत दर याच पातळीवर राहतील किंवा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे घोलप आणि इतर शेतकऱ्यांनी सांगितले. दसऱ्यानंतर नाशिक आणि तेलंगणातील ताज्या कापणीनंतर काही काळासाठी बाजारपेठेत पुरवठा सुरळीत होईल; परंतु पुरवठा कमी झाल्यानंतर दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुढील पीक मार्चच्या आसपासच बाजारात येणार असल्याने नजीकच्या भविष्यात टोमॅटोच्या किमतीत घट होण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why tomato has hit rs 100 kg reasons rac
Show comments