ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिवाळीनिमित्त डाऊनिंग स्ट्रीट येथे दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. दिवाळी पार्टीच्या आयोजनाबद्दल त्यांची प्रशंसाही झाली. या दिवाळी पार्टीत हिंदू समुदायातील प्रमुख व्यक्तींसह राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. परंतु, आता या दिवाळी पार्टीवरून नव्या वादाची सुरुवात झाली आहे. १० डाऊनिंग स्ट्रीटवर पंतप्रधानांच्या दिवाळी पार्टीतील मेन्यूमध्ये मांसाहारी स्नॅक्स आणि दारूचा समावेश होता, असे सांगितले गेले; ज्यावरून ब्रिटिश हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊ.

डाऊनिंग स्ट्रीटमधील दिवाळी पार्टी

३१ ऑक्टोबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी १० डाउनिंग येथे दिवाळी साजरी केली. या पार्टीत समुदायातील नेते आणि देशातील प्रमुख राजकारणी उपस्थित होते. या पार्टीमध्ये सर्वत्र दिव्यांची रोषणाई पाहायला मिळाली. दिवाळीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संगीत आणि नृत्याचेदेखील आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध कुचिपुडी नृत्य कलाकार अरुणिमा कुमार आणि त्यांच्या तरुण विद्यार्थिनी आरुषी नागराजू व ऐश्वर्या गुप्ता यांनी ‘ज्योतिर’ हे पारंपरिक नृत्य सादर केले. ब्रिटिश-भारतीय समुदायाला दिलेल्या त्यांच्या संदेशात स्टार्मर यांनी असेही म्हटले होते, “आम्ही तुमचा वारसा आणि परंपरांना महत्त्व देतो आणि त्यांचा आदर करतो.”

India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!
३१ ऑक्टोबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी १० डाउनिंग येथे दिवाळी साजरी केली. (छायाचित्र-कीर स्टार्मर/एक्स)

हेही वाचा : भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला कॅनडात अटक; खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा निकटवर्तीय अर्श डल्ला कोण आहे?

“जगभरात अंधार आहे, असे दिसते आणि अंधारावर मात करण्यासाठी प्रकाशाचा उत्सव साजरा करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला आशा मिळते आणि स्थिरताही मिळते,” असे त्यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिलेय. “ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा! मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंददायी उत्सवाच्या शुभेच्छा देतो. हा एकत्र येण्याचा, विपुलतेचा, स्वागताचा आणि काळोखावर नेहमी विजय मिळवण्याचा क्षण आहे,” असेही ते पुढे म्हणाले. या सोहळ्याचे फोटोही त्यांनी ‘एक्स’वर शेअर केले.

पार्टीतील खाद्यपदार्थांमध्ये चिकन-मटन अन् दारूही?

आता दिवाळी पार्टीत कर्मचाऱ्यांना दारू आणि मांस दिल्याची माहिती समोर आल्यानंतर हिंदूंमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. ‘द स्पेक्टेटर’ने दिलेल्या वृत्तानुसार, कार्यक्रमात बिअर, वाइन आणि लँब कबाब हे सर्व असल्याचे पाहून पार्टीतील काही उपस्थित पाहुणे नाराज झाले. त्यावरून काही ब्रिटिश-हिंदूंनी पंतप्रधान स्टार्मर यांच्यावर टीका केली. ब्रिटिश हिंदू आणि भारतीयांची एक सामाजिक चळवळ असलेल्या ‘इनसाइट यूके’ने निराशा व्यक्त केली. दिवाळी पार्टीत धार्मिक महत्त्वाची कमतरता होती, असेही ते म्हणाले. इन्स्टाग्रामवरील एका दीर्घ संदेशात तिरस्कार व्यक्त करताना ‘इनसाइट यूके’ने म्हटले आहे की, दिवाळी हा केवळ उत्सवाचा सण नाही, तर त्याला धार्मिक अर्थही आहे. दिवाळीचा पवित्र सण पावित्र्य व भक्तीवर आधारित आहे आणि म्हणूनच त्यात पारंपरिकपणे शाकाहारी जेवण आणि दारूपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

दिवाळी पार्टीत कर्मचाऱ्यांनी दारू आणि मांस दिल्याची माहिती समोर आल्यानंतर हिंदूंमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

“स्वत: पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत ठरवल्या गेलेल्या खाद्यपदार्थांवरून दिवाळीच्या सणाशी संबंधित धार्मिक परंपरांबद्दलची त्यांना समज नसल्याचे दिसून येते,” असेही ते म्हणाले. संवेदनशीलता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करताना हिंदू समुदाय किंवा धार्मिक नेत्यांना विचारात घेतले होते का, असा प्रश्नही त्यांनी आपल्या पोस्टमधून पुढे केला. केवळ ‘इनसाइट यूके’च नव्हे, तर प्रख्यात ब्रिटिश हिंदू पुजारी पंडित सतीश के. शर्मा यांनीदेखील स्टार्मर आयोजित पार्टीत मांस व दारूच्या उपस्थितीबद्दल संताप व्यक्त केला आणि अनवधानाने असले तरीही ते अत्यंत चुकीचे आणि निराशाजनक असल्याचे म्हटले.

“मी निराश झालो आणि मला धक्का बसला की, १० डाउनिंग स्ट्रीट येथे या वर्षीचा उत्सव सकारात्मक आणि आध्यात्मिक होण्याऐवजी या कार्यक्रमात मद्यपान आणि मांसाचे सेवन करण्यात आले,” असे पंडित सतीश के. शर्मा म्हणाले. “पंतप्रधानांचे सल्लागार इतके निष्काळजीने वागले ही शोकांतिका आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले. स्टार्मर आणि १० डाऊनिंग स्ट्रीट यांनी अद्याप या वादावर काहीही बोलणे टाळले आहे.

ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात

१० डाऊनिंग स्ट्रीटवर दिवाळी साजरी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. २००९ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राउन यांनी १० डाऊनिंग येथे हा सण साजरा करण्यास सुरुवात केली. यावेळी ब्राउन म्हणाले होते, “डाऊनिंग स्ट्रीटसाठी हा एक चांगला दिवस आहे. आमच्यासाठी एक चांगला दिवस आहे आणि ब्रिटनसाठी डाउनिंग स्ट्रीटमध्ये पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्याचा एक चांगला दिवस आहे. ही ऐतिहासिक घटना आहे.” गेल्या वर्षी, ब्रिटिश-आशियाई पंतप्रधान ऋषी सुनक यांनी १० डाऊनिंगमध्ये उत्सव साजरा केल्यामुळे या उत्सवाचे महत्त्व वाढले होते .

हेही वाचा : ३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं

शाकाहारी किंवा मांसाहारी वाद

स्टार्मर यांनी आयोजित केलेल्या दिवाळीच्या पार्टीत मद्यपान करणे, या काळात हिंदूंसाठी चुकीचे मानले जाते. मात्र, या काळात मांसाहार केला जातो की नाही, असा प्रश्नही मांसाहारी पदार्थांच्या सर्व्हिसने निर्माण केला आहे. भारतातील काही समुदाय दिवाळीला मांसाहार करतात; तर काही जण हा सण शाकाहारी जेवणाने साजरा करतात. उदाहरणार्थ, तमिळनाडूमधील काही समुदाय या काळात मांसाहार करतात आणि दिवाळी साजरी करतात; ज्यात इडली आणि मटण करी यांचा समावेश असतो.

Story img Loader