अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियामध्ये मर्यादित हल्ल्यांसाठी अमेरिकेत तयार झालेली ‘ATACMS’ क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. रशियन लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते. अमेरिकेने यापूर्वी रशियाविरुद्ध अशा हल्ल्यांना परवानगी देण्यास नकार दिला होता. कारण- त्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती होती. आता ट्रम्प सरकार युक्रेनला मदत करील की नाही, याबाबत साशंकता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीत नवीन सरकार स्थापन करण्यापूर्वी धोरणात बदल करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या गटातील अनेकांचे असेही मत आहे की, येणारे अमेरिकन प्रशासन युक्रेनला अमेरिकेने पुरवलेली शस्त्रे रशियामध्ये वापरण्याची परवानगी देईल. रशियाने नक्की काय इशारा दिला? तयार झालेले ‘ATACMS’ क्षेपणास्त्र काय आहे? क्षेपणास्त्र वापरामुळे खरंच तिसरे महायुद्ध होऊ शकते का? त्याविषयी जाणून घेऊ.
युक्रेनच्या क्षेपणास्त्र वापराविरुद्ध रशियाचा इशारा
“अमेरिकेने ज्या पातळीचा निर्णय घेतला आहे, तो लक्षात घेतला, तर सकाळपर्यंत युक्रेनचे राज्य पूर्णतः उद्ध्वस्त होऊ शकते,” असे फेडरेशन कौन्सिलचे वरिष्ठ सदस्य आंद्रेई क्लिशस टेलिग्राम ॲपवर म्हणाले. रशियातील वरिष्ठ सभागृहाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी समितीचे प्रथम उपप्रमुख व्लादिमीर झाबरोव्ह यांनी राज्य वृत्तसंस्था ‘झाबरोव्ह’ला सांगितले की, हा निर्णय म्हणजे तिसऱ्या जागतिक युद्धाच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल.” कनिष्ठ सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष लिओनिड स्लुत्स्की यांनी सांगितले की, एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांसह कीवने रशियावर अमेरिकेच्या समर्थनासह हल्ला केल्यास सर्वांत कठोर प्रत्युत्तर मिळेल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, युक्रेनने रशियाच्या भूभागावर पाश्चात्त्य-निर्मित लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर हल्ला करण्याची परवानगी दिल्यास पश्चिमेचा हा रशियाशी थेट लढा समजला जाईल. या हालचालीमुळे संघर्षाचे स्वरूप आणि व्याप्ती बदलेल.
हेही वाचा : ‘नासा’समोर नवं संकट, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वायुगळती; नेमकी कशामुळे? परिणाम काय?
बायडेन प्रशासनाने हा निर्णय का घेतला?
रशियाविरोधात अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्याला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी नेहमीच विरोध केला आहे. अमेरिका आणि रशिया संघर्षात ओढला जाऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. परंतु, अमेरिकेच्या सध्याच्या हालचाली बघता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अहवाल असे सूचित करतो की, बायडेन यांच्या निर्णयामुळे ब्रिटन आणि फ्रान्सला रशियामध्ये लांब पल्ल्याच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास युक्रेनला परवानगी देणे शक्य होईल. बायडेन यांच्या निर्णयाला ब्रिटन किंवा फ्रान्सने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
ट्रम्प यांचा विचार काय?
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अद्यापपर्यंतचे धोरण पुढे चालू ठेवले जाईल, असे सांगितलेले नाही. परंतु, त्यांच्या काही सहायकांनी आधीच युक्रेनला केल्या जाणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर टीका केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स म्हणाले की, अमेरिकेने युक्रेनला आणखी लष्करी मदत देऊ नये. तसेच ट्रम्प यांनी जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली की, ते शस्त्रास्त्रांचा पुरवठा खंडित करतील, अशी भीती अनेक युक्रेनियन अधिकाऱ्यांना वाटत आहे. ट्रम्प आहे तेच धोरण पुढे चालू ठेवतील की नाही, याबाबत युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह युक्रेनियन अधिकारी चिंतेत आहेत.
रशियाविरुद्ध वापराची परवानगी मिळालेले क्षेपणास्त्र काय आहे?
ATACMS हे लॉकहीड मार्टिनद्वारे निर्मित करण्यात आले आहे आणि युक्रेनला प्रदान केलेले सर्वांत शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्यात सुमारे ३७५ पौंड स्फोटके असलेले वॉरहेड आहे, तसेच हे क्षेपणास्त्र १९० मैल दूर असलेल्या लक्ष्यांवर मारा करू शकते. HIMARS मोबाईलचा वापर करून ATACMS क्षेपणास्त्र डागले जाऊ शकते. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, शत्रूच्या उच्च-मूल्याच्या सोविएत लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी ATACMS क्षेपणास्त्र १९८० मध्ये विकसित केले गेले. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनियन सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सुरुवातीला रशियन आणि उत्तर कोरियाच्या सैन्याविरुद्ध क्षेपणास्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने आतापर्यंत क्षेपणास्त्राची परवानगी का दिली नव्हती?
फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून, राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात आणि अखेरीस रशियामध्ये आणखी खोलवर मारा करू शकतील, अशी शस्त्रे देण्याची विनंती केली आहे. अमेरिकेने गेल्या वर्षी युक्रेनला ATACMS क्षेपणास्त्र प्रदान केले होते; परंतु रशियाविरुद्ध त्याचा वापर करण्यास मनाई केली होती. कारण- पुतिन सरकारकडून प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्यात येईल आणि युद्ध चिघळेल, अशी भीती होती. “आम्ही तिसरे महायुद्ध टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असेही बायडेन म्हणाले होते. झेलेन्स्की अशा शस्त्रांच्या गरजेविषयी सांगताना म्हणाले होते की, त्यांची अशा शस्त्रांचा रशियाविरुद्ध वापर करण्याची किंवा नागरिकांना लक्ष्य करण्याची कोणतीही योजना नाही.
काय परिणाम होऊ शकतो?
कुर्स्क प्रदेशाच्या आसपास युक्रेनियन सैन्याचा १,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश आहे. त्या भागात ही क्षेपणास्त्रे युक्रेनला रशियामधील लक्ष्यांवर हल्ला करण्यास मदत करतील. त्या बदल्यात, युक्रेनवर रशियन आणि उत्तर कोरियाच्या सैन्याकडून प्रतिआक्रमण होऊ शकते. अशा निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आधीच आपली लष्करी साहित्य जसे की, जेट विमाने रशियाच्या आत एअरफिल्डवर हलवली आहेत, अशा अनेक बातम्या आल्या आहेत. अमेरिकन सैन्याने १९९१ मध्ये ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मदरम्यान इराकच्या मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचर्स आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र साइट्सवर ३० ATACMS क्षेपणास्त्रे डागली होती. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या मते, अगदी सुरुवातीला तयार करण्यात आलेले ATACMS सुमारे १०० मैल दूरपर्यंत जाऊ शकले. २००३ च्या आक्रमणात, अमेरिकन आर्मीने ऑपरेशन इराकी फ्रीडममध्ये ४०० हून अधिक वॉरहेड वाहून नेणारी रणनीतिक क्षेपणास्त्रेदेखील डागली.