बुधवारी युनायटेड स्टेट्सच्या हाऊस ओव्हरसाइट कमिटीने ट्विटरच्या माजी मुख्य कायदेशीर अधिकारी विजया गाड्डे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांपुढे प्रश्नांची सरबत्ती केली. विशिष्ट राजकीय कंटेट कमी करण्याच्या किंवा त्यावर मर्यादा आणण्याच्या सोशल मीडियाच्या निर्णयांबाबत ही चौकशी करण्यात आली. एलॉन मस्क यांच्यासोबत ट्विटरची डील झाली तेव्हा सर्वात आधी बातमी आली ती सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी होण्याची. त्यानंतर पॉलिसी हेड विजया गाड्डे यांच्यावरही कारवाई झाली.
विजया गाड्डे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्याविषयी त्यांना विचारणा करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याचा निर्णयही विजया गाड्डे यांनीच घेतला होता. ट्विटर बोर्डच्या मिटिंगमध्ये त्या रडल्या होत्या.
विजया गाड्डे यांची जी चौकशी करण्यात आली त्या दरम्यान अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप, FBI सोबत हातमिळवणीचे आरोप आणि ट्विटरवर आणलेली सेन्सॉरशिप हे प्रमुख मुद्दे होते. कमिटीतले लॉरेन बोएबर्ट यांनी ओरडतच गाड्डे यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोण आहात? असा प्रश्न विचारला.
विजया गाड्डे यांचा जन्म हैदराबादच आहे. त्या ट्विटरच्या लीगल आणि पॉलिसी हेड म्हणून काम करत होत्या. ४८ वर्षीय विजया गाड्डे यांनी २०११ मध्ये ट्विटर जॉईन केलं होहंत. तेव्हापासून त्या कंपनीसाठी धोरणात्मक निर्णय घेत होत्या. ट्विटरच्या अधिकारी वर्गातल्या सर्वाधिक अधिकार असलेल्या अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. विजया यांच्या सेन्सॉरशीपच्या पॉलिसीवर एलॉन मस्क यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे तर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉच्या त्या पदवीधर आहेत. त्यांना मात्र आपल्या घेतलेल्या निर्णयांबाबत चौकशीला सामोरं जावं लागतं आहे.
युएस हाऊस ओव्हरसाईट कमिटीतर्फे विजया गाड्डे यांची चौकशी सुरू आहे. ट्विटरवर सेन्सॉरशीपचा निर्णय का घेतला? तसंच बायडेन यांची लॅपटॉप स्टोरी दडपण्यात ट्विटरची काय भूमिका होती? याबाबत प्रामुख्याने ही चौकशी सुरू आहे. इतर अधिकाऱ्यांनाही विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.