बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील एका बड्या उद्योजिकेला घोटाळ्याच्या आरोपावरून सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा व्हिएतनामच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील सर्वात मोठा टप्पा ठरू पाहत आहे. त्याबरोबरच व्हिएतनाममध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचे प्रमाण वाढले आहे, ही गंभीर बाबदेखील अधोरेखित होत आहे.

त्रू मि लान यांना फाशीची शिक्षा का सुनावण्यात आली?

व्हिएतनाममधील हो चि मिन्ह शहरातील न्यायालयाने गुरुवारी लान यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यांना २०२२मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा कट रचल्याचा आरोप होता. हा घोटाळा तब्बल १२.५ अब्ज डॉलरचा, म्हणजे व्हिएतनामच्या जीडीपीच्या जवळपास तीन टक्के इतका होता. हा आर्थिक घोटाळा करण्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख बँकेवर बेकायदा नियंत्रण ठेवले आणि परिणामी बँकेला २७ अब्ज डॉलरचा तोटा झाला असेही तपासात आढळले होते. हे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
amravati case has been registered against prankster youth
मॉलमध्‍ये प्रँक करणे पडले महागात; स्‍वच्‍छतागृहात सोडले रॉकेट, गुन्‍हा दाखल

हेही वाचा >>>स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

त्रू मि लान कोण आहेत?

त्रू मि लान या अनेक वर्षांपासून व्हिएतनाममधीलसर्वात महत्त्वाच्या व्यावसायिकांपैकी एक आहेत. लक्झरी अपार्टमेंट, हॉटेल, कार्यालये आणि शॉपिंग मॉल विकसित करण्याच्या व्यवसायात त्या आघाडीवर आहेत. लान यांचा जन्म १९५६मध्ये झाला. त्यांची आई हो चि मिन्ह या शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठेत व्यवसाय करत असे. त्यांनी आईच्या कॉस्मेटिक्स विक्रीच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात करून व्यावसायिक जगात पाऊल टाकले. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९९२मध्ये ‘व्हॅन थिन फाट’ ही कंपनी स्थापित केली. त्याच काळात व्हिएतनामने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून परदेशी गुंतवणूकदारांना आमंत्रित केले. कालांतराने लान कुटुंबियांची व्हीटीपी ही कंपनी व्हिएतनाममधील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक कंपनी झाली. हो चि मिन्हमधील झगमगती ३९ मजली टाइम्स स्क्वेअर सायगॉन, पंचतारांकित विंडसर प्लाझा हॉटेल, ३७ मजली कॅपिटल प्लेस कार्यालय इमारत आणि पंचतारांकित शेरवूड रेसिडेन्स हॉटेल अशा काही महत्त्वाच्या इमारती त्यांनी विकसित केल्या. अटक होईपर्यंत लान शेरवूड रेसिडेन्स हॉटेलमध्ये राहत होत्या. लान यांचा विवाह १९९२मध्ये झाला, त्यांचे पती एरिक चू नाप-की हे हाँगकाँगमधील गुंतवणूकदार आहेत. त्यांना गुरुवारी नऊ वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला.

लान यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?

२०११ साली, सायगॉन जॉइंट कमर्शियल बँक किंवा एससीबी या अडचणीत सापडलेल्या बँकेचे विलिनीकरण अन्य दोन वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांबरोबर करण्यात आले. ही योजना व्हिएतनामच्या मध्यवर्ती बँकेच्या समन्वयाने पार पडली. लान यांनी २०११ ते २०२२ या काळात एससीबीचा वापर स्वतःला अर्थपुरवठा करणाऱ्या बँकेसारखा केला असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी देशात आणि परदेशात हजारो बनावट कंपन्या तयार करून स्वतःला आणि स्वतःच्या सहयोगींना कर्ज मिळवला. यामध्ये एससीबीला तब्बल २७ अब्ज डॉलरचा तोटा झाला. त्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचाही आरोप आहे. याच संबंधात बँकेच्या मध्यवर्ती अधिकाऱ्याला ५२ लाख डॉलरची लाच घेतल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?

न्यायालयाने कोणते निरीक्षण नोंदवले?

लान यांना मृत्युदंड सुनावताना न्यायालयाने सांगितले की, त्यांच्या कृत्यांमुळे केवळ व्यक्तींचे मालमत्ता व्यवस्थापनाच्या अधिकारांचे उल्लंघन झाले असे नाही तर त्यांनी एससीबीवर विशेष नियंत्रण मिळवले, लोकांचा कम्युनिस्ट पार्टीचे नेतृत्व आणि शासनसंस्थेवरील विश्वास कमी झाला.

या घटनेने जगाचे लक्ष का वेधून घेतले?

जगातील सर्वात जास्त मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येणाऱ्या देशांमध्ये व्हिएतनामचा समावेश होतो असा ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा अहवाल आहे. दहशतवाद आणि खुनासारख्या गुन्ह्यांसाठी तिथे मृत्युदंड सुनावला जातो. मात्र, आर्थिक गुन्ह्यासाठी मृत्युदंड हा त्या देशातही दुर्मीळ आहे. या देशामध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेबाबत गोपनीयता पाळली जाते. २०१७च्या सरकारी आकडेवारीनुसार, २०१३ आणि २०१६ या कालावधीत तब्बल ४२९ जणांना फाशी देण्यात आली. केवळ चीन आणि इराण या दोन देशांमध्ये यापेक्षा अधिक प्रमाणात मृत्युदंड सुनावला जातो. सध्या व्हिएतनाममध्ये तब्बल एक हजारांपेक्षा जास्त लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे.

या शिक्षेकडे कसे पाहिले जात आहे?

सिंगापूरच्या ‘आयएसईएएस-युसुफ इसाक इन्स्टिट्यूट’चे विश्लेषक वेन खक जांग यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले की, गुरुवारी सुनावण्यात आलेल्या शिक्षेकडे व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील सर्वात मोठा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

‘ब्लेझिंग फर्नेस’ मोहीम काय आहे?

‘ब्लेझिंग फर्नेस’ ही व्हिएतनामच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने सुरू केलेली भ्रष्टाचारविरोधी मोहीम आहे. पक्षाचे सरचिटणीस वेन फु त्राँ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. भ्रष्टाचार हा आपल्या पक्षासमोरील गंभीर धोका असल्याचे त्यांचे मत आहे. या मोहिमेअंतर्गत भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या कोणालाही सोडायचे नाही असे त्यांचे धोरण आहे. मात्र, कठोर पावले उचलूनही भ्रष्टाचाराबद्दल जनतेचे मत अजूनही संमिश्र आहे. एका पाहणीनुसार, भ्रष्टाचाराविरोधात सरकार कठोरपणे पावले उचलत आहे असे वाटणाऱ्यांची संख्या २०२३मध्ये कमी झाली होती.

ही मोहीम कशा प्रकारे राबवण्यात आली?

तेथील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने २०१३मध्ये सुरू केलेल्या ‘ब्लेझिंग फर्नेस’ मोहिमेअंतर्गत भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलण्यात आली. मात्र, २०१८पर्यंत खासगी क्षेत्रातील भ्रष्टाचार या मोहिमेच्या रडारवर आला नव्हता. खासगी क्षेत्राची छाननी सुरू केल्यापासून तेथील झपाट्याने वाढणाऱ्या अनेक उद्योगांच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील एफएलसी या कंपनीचे माजी प्रमुख त्रिन व्हान क्वे यांना २०२२मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. व्हिएतनाममधील तिसऱ्या क्रमांकाची हवाई वाहतूक सेवा, बांबू एअरवेज त्यांच्या मालकीची आहे. त्यांच्यावर येत्या काही दिवसांमध्ये खटला सुरू होईल. अशा प्रकारच्या खटल्यांसाठी आता लान खटला हे ठळक उदाहरण असेल.

व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेने खासगी क्षेत्रालाही लक्ष्य केल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. एकीकडे जागतिक व्यापार-उद्योगात साखळी पुरवठ्यासाठी चीनचा पर्याय शोधणाऱ्या व्यवसायांना व्हिएतनाम आपल्याकडे आकर्षित करू पाहत आहे. पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकाच वर्षात दोन बड्या कंपन्यांच्या अध्यक्षांना तुरुंगात जावे लागले आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत यासाठी तेथील नोकरशाही काहीही न करण्यास अधिक पसंती देत आहे. याचा परिणाम देशांतर्गत घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेणे अशी दुहेरी होत आहे. त्यातच लान यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यामुळे व्यवसाय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्यात अनिश्चिततेची भावना वाढत आहे, असे जांग सांगतात. 

बांधकाम व्यवसायावर काय परिणाम झाला?

बांधकाम व्यवसाय डबघाईला जाऊ लागला आहे. गेल्या वर्षी, २०२३मध्ये या क्षेत्रातील जवळपास १,३०० प्रॉपर्टी फर्मनी बाजारातून अंग काढून घेतले. तर हनोई आणि हो चि मिन्ह यासारख्या प्रमुख शहरांमथील गगनचुंबी इमारती रिकाम्या पडल्या आहेत. याच्या जोडीला मंदावलेली जागतिक मागणी आणि घटलेली सार्वजनिक गुंतवणूक यामुळे गेल्या वर्षी व्हिएतनामची अर्थव्यवस्था ०.५ टक्क्यांनी उणावली.

nima.patil@expressindia.com

Story img Loader