पीडित महिलांचा आवाज ठरलेली ‘मी टू’ चळवळ ज्यांच्या अत्याचारकथांमुळे प्रथम नावारूपाला आली असे अमेरिकेतील चित्रपट निर्माते हार्वे वाइनस्टीन दोन गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले होते. त्यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि दुसरीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाला होता. या दोघींनीही न्यायालयात साक्ष दिली होती. मात्र, न्यूयॉर्कचे सर्वोच्च न्यायालय असलेल्या ‘न्यूयॉर्क कोर्ट ऑफ अपील्स’ने ४-३ अशा बहुमताने त्यांची शिक्षा रद्द केली. त्यामुळे आता चळवळीचे पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हार्वे वाइनस्टीन कशासाठी प्रसिद्ध?
हार्वे वाइनस्टीन अमेरिकेतील प्रख्यात चित्रपट निर्माते आहेत. मात्र, २०१७मध्ये त्यांनी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. शोषित महिलांमध्ये काही आघाडीच्या अभिनेत्रीही होत्या. त्यांच्यातीलच काहींनी अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी #MeToo ही मोहीम सुरू केली. पाहता पाहता ही चळवळ जगभरात पसरली. या मोहिमेअंतर्गत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचार याबद्दल होत असणाऱ्या जनजागृतीला बळ मिळाले. या मोहिमेच्या केंद्रस्थानी हार्वे वाइनस्टीन होते.
वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली?
७२ वर्षीय वाइनस्टीन यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि दुसरीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाला होता. त्या दोघींनी न्यायालयात वाइनस्टीन यांच्याविरोधात साक्ष दिली होती. मात्र, ट्रायल कोर्टामध्ये सुरू असलेल्या या खटल्यात, वाइनस्टीन यांच्यावरील फौजदारी गुन्ह्यांचा भाग नसलेले आरोप करणाऱ्या तीन महिलांची साक्ष नोंदवण्यात आली होती. या तिघींची साक्ष नोंदवण्यास परवानगी द्यायला नको होती असे ‘न्यूयॉर्क कोर्ट ऑफ अपील्स’ने ४-३ बहुमताने निश्चित केले. पूर्वीच्या गैरकृत्यांमध्ये अशा प्रकारे साक्ष देण्यास न्यूयॉर्कच्या ‘मोलनू रूल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नियमामध्ये बंदी आहे. त्या नियमाचा या ठिकाणी आधार घेण्यात आला.
मुळात तीन महिलांना साक्ष देण्यास परवानगी का?
‘मोलनू रूल’ हा अनिर्बंध नाही. या नियमानुसार, आरोपीची गुन्हा करण्याची प्रवृत्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या साक्षीचा सरकारी पक्षाला वापर करता येत नाही. मात्र, हेतू आणि उद्देशाचा पुरावा म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. वाइनस्टीनच्या बाबतीत, सरकारी वकिलांनी ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांना हे पटवून दिले की, की आरोपीने केलेल्या लैंगिक अत्याचाराला फिर्यादींची संमती नव्हती, तरीही त्यांच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध करण्याचा त्याचा हेतू होता. या पुराव्यांमुळे, लैंगिक संबंध संमतीने ठेवण्यात आले होते हा वाइनस्टीन यांचा दावा अमान्य होण्यास मदत होईल असा सरकारी पक्षाचा विश्वास होता. मात्र, ‘कोर्ट ऑफ अपील्स’ला असे आढळून आले की, केवळ वाइनस्टीनचा हेतू आणि उद्देशाचा पुरावा म्हणून या तीन महिलांची साक्ष नोंदवली नव्हती तर आरोपीची गुन्हा करण्याची प्रवृत्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी साक्ष नोंदवण्यात आली होती.
कॅलिफोर्निया खटल्याचे काय?
कॅलिफोर्नियामध्ये २०२२च्या आणखी एका बलात्काराच्या आरोपानंतर वाइनस्टीन यांना १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, त्या शिक्षेविरोधातही ते अपील करण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क ‘कोर्ट ऑफ अपील्स’च्या निकालाचा त्यावर वेगळा परिणाम होणार नाही. वास्तवात, कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, आरोपीची लैंगिक गुन्हे करण्याची प्रवृत्ती आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून लैंगिक गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये पूर्वी केलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल साक्ष देण्यास परवानगी आहे. अशा पुराव्याचा वाइनस्टीनच्या कॅलिफोर्निया खटल्यात वापर करण्यात आला होता. या राज्याच्या कठोर कायद्यामुळे त्याच्या वकिलांना त्या निकालाला आव्हान देणे कठीण असेल.
हेही वाचा >>>बांबी बकेट म्हणजे काय? IAF ने नैनितालच्या जंगलात का केला त्याचा वापर?
भविष्यातील खटल्यांवर काय परिणाम?
सदर खटल्यातील न्यायाधीश जेनी रिवेरा यांनी लिहिले की, बहुमताने हा निर्णय प्रस्थापित न्यूयॉर्कच्या कायद्याच्या आधारे घेण्यात आला. हा निर्णय १९९६च्या ‘पीपल विरुद्ध व्हर्गास’ या खटल्यातील ‘कोर्ट ऑफ अपील्स’च्या निर्णयासमान असल्याने रिवेरा यांनी नमूद केले. त्याही खटल्यात साक्षीदाराला आरोपीने केलेल्या पूर्वीच्या कथित बलात्कारांबद्दल साक्ष देण्याची परवानगी देण्यात आली होती. अल्पतातील न्यायाधीशांनी असे नमूद केले की, या निर्णयामुळे वाइनस्टीनच्या बाबतीत झाले तसे पीडितांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्याशी सतत संबंध असलेल्या लोकांनी केलेल्या लैंगिक गुन्ह्यांवर खटला चालवणे अधिक कठीण होईल. न्यायाधीश अँथनी कॅनाटेरो यांनी बहुमताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगितले. तर, पूर्वीच्या गैरकृत्यांचा पुरावा म्हणून वापर करणे यामुळे बंद होईल असे अन्य एक न्यायाधीश मॅडलिन सिंगास यांनी सांगितले.