दोन दिवसांपूर्वी मोहरमनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. जम्मू-काश्मीर हा भारताचा संवेदनशील भाग. इथे २० व्या शतकात मोहरमच्या मिरवणुका निघत होत्या. शिया मुस्लिमांच्या या मिरवणुकांमध्ये सुन्नी मुस्लीमही सहभागी होत होते. परंतु, कालांतराने काश्मीर-श्रीनगर भाग संवेदनशील झाला. शिया-सुन्नी संघर्ष, दहशतवादी हल्ले अशा कारणांमुळे तत्कालीन सरकारने मोहरमच्या मिरवणुकांवर निर्बंध लादले. हे निर्बंध का लादले ? ३५ वर्षांनंतर मोहरमची मिरवणूक का निघाली, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराकमधील करबलाच्या लढाईत (इ.स. ६८०) मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसैन यांना मारण्यात आले. यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ जगभरातील शिया मुस्लिम आशुरा मिरवणूक काढतात. गुरुवारी जम्मू आणि काश्मीर सरकारने तीन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी दिल्यानंतर श्रीनगरमध्ये मोहरमची मिरवणूक काढण्यात आली. दि. १९ जुलै रोजी इस्लामी वर्षाचा पहिला महिना सुरू झाला, त्याच दिवशी श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी देण्यात आली. तसेच मोहरमच्या मुख्य आशुरा मिरवणुकीवरील बंदीही उठवण्यात आली.इराकमधील करबलाच्या लढाईत इ.स. ६८० मध्ये मोहम्मद पैगंबराचे नातू इमाम हुसैन यांना मारण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ जगभरातील शिया मुस्लीम आशुरा मिरवणूक काढतात.

मोहरमच्या मिरवणुकांवर डोग्रांच्या अधिपत्याखाली निर्बंध

जम्मू आणि काश्मीरच्या डोग्रा राज्यकर्त्यांनी मोहरमच्या मिरवणुकांवर बंदी घातली, त्यांना फक्त रात्री मिरवणूक काढण्यास परवानगी दिली. १९२० च्या दशकात, डोग्रांनी ‘शिया-सुन्नी मुस्लिमांमधील तणाव’ हे कारण देत मोहरमच्या मिरवणुका सूर्योदयाच्या आधी संपाव्यात, असा आदेश दिला. १९२४ मध्ये, शिया मुस्लिमांनी या आदेशाचा अवमान केला आणि दिवसभर मिरवणुका काढण्यात आल्या. लेखक हकीम समीर हमदानी यांच्या मते, सुन्नी मुस्लीमदेखील या मिरवणुकीत सामील झाले होते. ही मिरवणूक जुन्या श्रीनगरच्या झाडीबल परिसरातील इमामबारा येथे गेली आणि नरवारा येथे संपली. या मिरवणुकीमध्ये ख्वाजा साद-उद-दीन शॉल हे एक प्रमुख सुन्नी व्यापारी आणि आगा सय्यद हुसैन जलाली, शिया जहागीरदार सहभागी होते,” असे हमदानी म्हणाले. परंतु, डोग्रांच्या आदेशाविरुद्ध असणाऱ्या या मिरवणुकीचा संबंध काश्मीरमधील मुस्लिमांच्या स्वातंत्र्याशी जोडण्यात आला.

हेही वाचा : विश्लेषण : सतत चर्चेत असणारे ट्विटर बर्ड; काय आहे ट्विटरच्या लोगोचा इतिहास…

शिया आणि सुन्नी दोघांचाही सहभाग

श्रीनगरमधील मोहरमच्या मिरवणुका पारंपारिकपणे नामछाबल येथून सुरू झाल्या आणि जुन्या शहरातील झाडीबल येथे संपल्या. शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी मोहरम १० ची मुख्य मिरवणूक श्रीनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या अबी गुजर येथून सुरू व्हावी, जुन्या शहरातून जाऊन झाडीबल येथे समाप्त करावी, असा आग्रह धरला. अन्सारी कुटुंब आणि बडगामच्या आगा कुटुंबाने पर्यायी वर्षांत मिरवणुकीचे नेतृत्व करावे, अशीही मागणी शेख अब्दुल्ला यांनी केली. मिरवणूक शहराच्या मध्यभागी जात असताना, इत्तेहादुल मुस्लीमीनचे अब्बास अन्सारी, इफ्तिकार हुसेन अन्सारी संबोधित करतील. अन्सारी आणि त्याचा इत्तेहादुल मुस्लीमीन शिया आणि सुन्नी यांच्या सलोख्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे या मिरवणुकीत सुन्नीही सहभागी झाले. अशा प्रकारे श्रीनगरमध्ये शिया आणि सुन्नी मुस्लीम सहभागी होत.

हेही वाचा : आईबाबांनी शिकवलं नाही का ? अनेक मुलींना विचारला जाणारा प्रश्न

दहशतवादानंतरची परिस्थिती

मोहरमच्या मिरवणुका त्यांच्या पारंपरिक मार्गावरून अनेक दशके सुरू होत्या. १९८८ मध्ये सरकारने या मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली. कारण, मोहरमच्या मिरवणुकीचा संबंध पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल झिया-उल-हक यांच्या मृत्यूशी जोडण्यात आला. यामुळे ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात निदर्शने झाली. काश्मीर भागामध्ये दहशतवाद सुरू झाल्यानंतर सरकारने श्रीनगरमधील मुख्य रस्त्यांवरून मोहरमच्या मिरवणुका काढण्यावर बंदी घातली. तरीही शहरातील शियाबहुल भागात छोट्या मिरवणुका होत्या.
अब्बास अन्सारी आणि त्यांचा मुलगा मसरूर अब्बास यांच्या नेतृत्वाखाली शिया मुस्लिमांनी सरकारी आदेश धुडकावून लावले आणि मोहरमच्या ८ तारखेला शहरातील शहीद गुंज परिसरातून मिरवणूक काढणे सुरूच ठेवले. पोलिसांनी कर्फ्यू आणि निर्बंध लादले. इत्तेहादुल मुसलमीन हा फुटीरवादी हुर्रियत कॉन्फरन्सचा एक घटक होता, तसेच अब्बास अन्सारी स्वतः हुर्रियतचे अध्यक्ष होते.सरकारला भीती होती की, या मिरवणुकांना हिंसक वळण लागेल किंवा या मिरवणुकांचा सरकारच्या विरोधात वापर होईल. गव्हर्नर जगमोहन यांच्या कार्यकाळात मोहरमच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली असताना, सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार एकापाठोपाठच्या सरकारांनीसुद्धा हेच धोरण चालू ठेवले.

श्रीनगरमधील ३५ वर्षांनी निघालेली मोहरमची मिरवणूक

प्रशासनाने गुरुवारी आठव्या दिवशी मोहरमच्या मिरवणुकीला ३४ वर्षांत प्रथमच श्रीनगरच्या गुरुबाजार ते दलगेट या पारंपरिक मार्गाने जाण्यास परवानगी दिली. शनिवारी निघालेल्या मोहरमच्या आशुरा दिन मिरवणुकीत जडीबल-बोटा कादल येथे मनोज सिन्हा सहभागी झाले. त्यांनी काळा कुर्ता परिधान केला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलीस आणि नागरी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. सिन्हा यांनी मिरवणुकीतील अन्य लोकांशी संवाद साधला. त्यांना अल्पोपहाराचे वाटप केले. अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी सांगितले, की, या वेळी कडेकोट सुरक्षा होती. नायब राज्यपालांनी संबंधितांना दिलेल्या आश्वासनानुसार ते या मिरवणुकीत सहभागी झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अभिवादन करून आदरांजली वाहिली. हा एक चांगला संकेत आहे. लष्कराने सुरक्षा स्थिती सुधारण्यास मदत केली असली तरी शांतता राखण्याचे मोठे श्रेय येथील जनतेचेच आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was the muharram procession not held in srinagar for three decades what is history vvk
Show comments