अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांनी हॉवर्ड विद्यापीठात भाषण दिले. त्यांच्या भाषणादरम्यान गर्दीतील अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. परंतु, केवळ गर्दीतील महिलाच निराश झाल्या नाहीत, तर एकूणच अमेरिकेतील महिला ट्रम्प यांच्या विजयाने निराश असल्याचे चित्र दिसून आले. अमेरिकेतील महिलांनी आपली निराशा जाहीर करण्याचा एक वेगळा आणि अनोखा मार्ग अवलंबला आहे. तो मार्ग म्हणजे 4B चळवळ. ही दक्षिण कोरियात सुरू झालेली एक निषेध चळवळ आहे. त्याद्वारे स्त्रियांना पुरुषांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जाते. मात्र, अमेरिकेत ही चळवळ सुरू करण्यामागील नेमका उद्देश काय? या चळवळीचा नेमका अर्थ काय? त्याविषयी जाणून घेऊ.

4B चळवळ काय आहे?

देशातील ‘मीटू’ चळवळीच्या अनुषंगाने २०१७ व २०१८ मध्ये दक्षिण कोरियातील स्त्रियांनी 4B चळवळीची सुरुवात केली. ही चळवळ पूर्वीच्या ‘एस्केप द कॉर्सेट’ चळवळीशी जुळलेली असल्याचे सांगितले जाते; ज्यात स्त्रियांना केस लहान करणे, टक्कल करणे, मेकअप वर्ज्य करणे अशा गोष्टी करण्यास सांगितले जात असे. इंग्रजीत 4B चा अर्थ ‘bi’ म्हणजेच ‘नो’ असा होतो. 4B मध्ये bihon, bichulsan, biyeonae, bisekseu हे चार कोरियन शब्द आहेत. bihon म्हणजे विषमलिंगी विवाह नाही, bichulsan म्हणजे बाळंतपण नाही, biyeonae म्हणजे डेटिंग नाही आणि bisekseu म्हणजे लैंगिक संबंध नाही. सोप्या भाषेत सांगायचे, तर चळवळीतील सहभागी महिला पुरुषांशी डेट करीत नाहीत, लग्न करीत नाहीत, लैंगिक संबंध ठेवत नाहीत किंवा मुले जन्माला घालत नाहीत. एकूणच काय तर त्यांच्याद्वारे लिंग असमानता कायमस्वरूपी वाटत असलेल्या प्रणालीवर बहिष्कार टाकला जातो.

Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?

पण, दक्षिण कोरियात या चळवळीची सुरुवात का झाली, असाही प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी अनेक कारणे आहेत. प्रथम, दक्षिण कोरिया समाजात कठोर लिंग मानदंड आणि सौंदर्याशी निगडित कठोर मानके आहेत. त्यानंतर ‘स्पायकॅम’ प्रकरण घडले. त्यामध्ये लैंगिक संबंधादरम्यान किंवा सार्वजनिक स्नानगृहांमध्ये त्यांच्या माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय महिलांचे चित्रीकरण करण्यात आले. हे व्हिडीओ पुरुषांद्वारे विकले गेले आणि त्यांची देवाणघेवाण केली गेली. 4B चळवळ सुरू करण्याचे आणखी एक कारण म्हणजे २०१८ मध्ये एका महिलेला अटक करण्यात आली. त्या महिलेने तिच्या आर्ट क्लासमध्ये एका नग्न पुरुष मॉडेलचा फोटो काढला कारण- त्याने त्याचे गुप्तांग झाकण्यास नकार दिला आणि हा फोटो महिलेने इंटरनेटवर शेअर केला. या घटनेनंतर तिच्यावर खटला चालवला गेला आणि तिला १० महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे देशातील अनेक महिला संतप्त झाल्या, त्यांनी हा निर्णय दुटप्पीपणाचे प्रतीक असल्याचा आरोप केला. ज्या पुरुषांनी महिलांविरुद्ध गुन्हे केले, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले; परंतु ज्या महिलांनी पुरुषांविरुद्ध तेच गुन्हे केले, त्यांना शिक्षा करण्यात आली, असा महिलांचा आरोप होता.

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर लवकरच संपूर्ण अमेरिकेमध्ये 4B चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात गूगल करण्यात आले. (छायाचित्र-रॉयटर्स)

अमेरिकेत 4B चळवळीची सुरुवात कशी झाली?

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर लवकरच संपूर्ण अमेरिकेमध्ये 4B चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात गूगल करण्यात आले. गूगल करण्यात येण्याचे सर्वाधिक प्रमाण वॉशिंग्टन डीसी, कोलोरॅडो, व्हरमाँट व मिनेसोटा येथून नोंदवले गेले. काही अमेरिकन महिलांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील याबद्दल पोस्ट केले. “महिलांनो, आपण दक्षिण कोरियातील महिलांप्रमाणे 4B चळवळीचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि अमेरिकेच्या जन्मदरात तीव्र घट घडवून आणली पाहिजे,” असे एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले. ही पोस्टला आठ दशलक्षांहून अधिक वेळा पाहिली गेली.

“दक्षिण कोरियातील महिला याचा अवलंब करत आहेत,” असे दुसऱ्या एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले. “आपल्याला त्यांच्यात सामील होण्याची वेळ आली आहे. पुरुषांना पुरस्कृत केले जाणार नाही किंवा आमच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची अनुमती मिळणार नाही,” असे त्या महिलेने पुढे लिहिले. अमेरिकन महिला टिकटॉकवरही असेच संदेश पोस्ट करीत आहेत. अशाच एका वापरकर्त्याने लिहिले, “काल रात्री मी ट्रम्पला मत देणार्‍या माझ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केले असून, आज सकाळी अधिकृतपणे 4B चळवळीत सामील होऊन एक अमेरिकन महिला म्हणून माझी भूमिका पार पाडत आहे.”

अमेरिकेतील महिला या चळवळीत सामील होण्याचे कारण काय?

ट्रम्पच्या विजयानंतर अनेक महिलांचा भ्रमनिरास झाला आहे आणि चिंतेमुळे अमेरिकन महिला 4B चळवळीत सहभागी होत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांच्या विजयाने त्यांचे अधिकार कमी होतील, अशी चिंता त्या व्यक्त करतात. राष्ट्रव्यापी गर्भपातबंदीच्या भूमिकेवर ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली आहे. ते यापूर्वी एक संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देत होते आणि हेदेखील म्हणाले होते की, हा मुद्दा राज्यांनी निश्चित केला पाहिजे. मात्र, आता त्यांची भूमिका बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. जॉर्जियामध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय कलाकार मिशेला थॉमसने ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडे स्पष्ट केले की, 4B हा फक्त लोकांना दाखविण्याचा एक मार्ग आहे की, कृतींचे परिणाम होतात.

हेही वाचा : अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘चीफ ऑफ स्टाफ’पदी महिला ऑफिसरची नियुक्ती; कोण आहेत सूसी विल्स? या पदाचे महत्त्व काय?

तरुण पुरुष लैंगिक संबंधांची अपेक्षा करतात; परंतु आपण गर्भपात करू नये, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु, या दोन्ही गोष्टी ते ठरवू शकत नाहीत, असे स्पष्ट करून, त्या पुढे अनेक रिपब्लिकन नेत्यांच्या गर्भपातविरोधी भूमिकेचा संदर्भ देत म्हणाल्या, “महिलांच्या हक्कांसाठी लढत नसलेल्या पुरुषांशी महिलांनी जवळीक साधण्याची गरज नाही; ते आमचा आदर करत नाहीत हे त्यांच्या कृतीतून दिसून येते.” काही महिलांनी असेही म्हटले की, चळवळीतील त्यांच्या स्वारस्याचे श्रेय ट्रम्प यांच्या महिलांबद्दलच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळेदेखील असू शकते. २००५ मध्ये बिली बुश यांच्या ॲक्सेस हॉलीवूड मुलाखतीत ट्रम्प महिलांवर चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या.