जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या बहुतेक देशांनी करोना साथीवर नियंत्रण मिळवलं असून परिस्थिती सामान्य बनली आहे. कोविड लशीमुळेच जगभरातील लाखो लोकांचा जीव वाचल्याचा निष्कर्ष संशोधकांनी यापूर्वीच काढला आहे. पण करोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कालांतराने रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता बूस्टर डोस घेणं महत्त्वाचं ठरू लागलं आहे.
पहिल्या डोसप्रमाणे बूस्टर डोसही सुरुवातीला गंभीर स्वरुपाचा आजार असणाऱ्या रुग्णांना देण्यात आला. आता डिसेंबर २०२१ पासून ब्रिटनमध्ये सर्व प्रौढांसाठी तिसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. एका आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये ७० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी बूस्टर किंवा लशीचा तिसरा डोस घेतला आहे. परंतु तरुणांमध्ये लस घेण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. ब्रिटनमध्ये १८ ते २४ वयोगटातील ७० टक्क्याहून अधिक तरुणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. पण केवळ ३९ तरुणांनी बूस्टर डोस घेतला आहे.
करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात वयोवृद्ध किंवा गंभीर स्वरुपाचा आजार असणाऱ्या लोकांना करोना विषाणूचा अत्यधिक धोका होता, हे स्पष्ट झालं होतं. तर निरोगी किंवा तरुणांना रुग्णालयात दाखल करण्याचं किंवा मृत्यूचं प्रमाण खूपच कमी होतं, हेही स्पष्ट झालं होतं. त्यामुळे तरुणांनी कोविड लस का घ्यावी? हा प्रश्न विचारण्यात काहीही गैर नाही. पण तरुणांनी लस का घ्यायला याची काही कारणं समोर आली आहेत. संबंधित कारणे पुढीलप्रमाणे…
कोविड लशींची प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होते
‘एमएमआर’सारख्या लशीमुळे गोवर, गालगुंड आणि रुबेला सारख्या आजारांपासून आयुष्यभरासाठी संरक्षण मिळतं. याउलट, करोना लशीची परिणामकारकता काही महिन्यांनी कमी होऊ लागते. ही रोगप्रतिकारकशक्ती अचानक कमी होत नाही. ती हळूहळू कमी होते. लस घेतल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात साधारण २१ टक्के संक्रमणापासून संरक्षण होते. तर १० टक्के गंभीर रोगांपासून संरक्षण मिळतं.
वृद्ध किंवा कमकुवत लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी होत असली तरी याचा सर्वच वयोगटातील लोकांवर परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्तीमध्ये घट होताच विषाणूच्या संक्रमणाचा धोका वाढतो. परिणामी गंभीर आजार उद्भवू शकतो तसेच रुग्णालयातही दाखल होण्याची वेळ येते. शिवाय मृत्यूही ओढावू शकतो. पण सुदैवाने mRNA लशीचा बूस्टर डोस घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
इतर लोकांचे संरक्षण करणे
लशीमुळे केवळ लसीकरण झालेल्या व्यक्तीचेच संरक्षण होतं, असं नाही. कोविड लस घेतल्याने अप्रत्यक्षपणे विषाणूचं पुढील संक्रमण रोखलं जातं. परिणामी संपूर्ण लोकसंख्येचं संरक्षण होतं. बरेच तरुण लोकं वृद्ध किंवा वैद्यकीयदृष्ट्या असुरक्षित नातेवाईक किंवा मित्रांच्या संपर्कात येत असतात, त्यांना नियमित भेटत असतात. अशा मित्रांच्या घरात गर्भवती जोडीदार असू शकते, यामुळे त्यांनाही कोविडची लागण होण्याची शक्यता वाढते.
कोविडचा दीर्घकालीन प्रभाव कमी करणे
करोना विषाणूचा पहिल्यांदा संसर्ग झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये बरेच दिवस कोविडची लक्षणे आढळून आली आहेत, यालाच आपण ‘लाँग कोविड’ किंवा ‘दीर्घकालीन कोविड’ म्हणतो. हे संक्रमण तुलनेनं सौम्य असलं तरी यामुळे लोकांमध्ये शारीरिक कमकुवतपणा येतो. करोना विषाणूची लागण झालेल्या जवळपास ३० टक्के लोकांना अशाप्रकारची लक्षणं आढळल्याचा अंदाज आहे.
याबाबत केलेल्या एका संशोधनात असं दिसून आले आहे की, लसीकरणामुळे दीर्घकालीन कोविडचा धोका कमी होतो. दुसऱ्या एका अभ्यासानुसार, करोना लशीमुळे दीर्घकालीन कोविडचा धोका १५ टक्क्यांपर्यंत कमी होतो. बूस्टर डोस घेतल्यास धोक्यात आणखी घट होते.
कोविड लस सुरक्षित आहे का?
गेल्या दोन वर्षांत जगभरात कोट्यवधी लोकांना कोविड लस देण्यात आली आहे. कोविड लस अतिशय प्रभावी असून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे. दुर्मिळ प्रकरणांमध्ये करोना लशीचे गंभीर दुष्परिणाम आढळले आहेत. जसे की शरीरात रक्ताची गुठळी तयार होणे किंवा हृदयाच्या स्नायूमध्ये जळजळ होणे. परंतु हा संभाव्य धोका लक्षात घेऊन कोणत्या गटासाठी कोणती लस सुरक्षित आहे, यावरही संशोधन करण्यात आलं आहे.
वारंवार लस घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, असं काही लोकांना वाटतं. पण यात काहीही तथ्य नाही. मागील अनेक दशकांपासून आपण दरवर्षी फ्लू लसीकरण करतो. पण याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. लशीमुळे प्रजननक्षमतेला हानी पोहोचत नाहीत. शिवाय गरोदर महिलांसाठीदेखील ही लस सुरक्षित मानली गेली आहे.