Do men spend more on girlfriends than wives? Wife vs. mistress: लोकप्रिय समज असा आहे की, पुरुष पत्नीपेक्षा त्यांच्या प्रेयसींवर अधिक खर्च करतात. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो, कोलोरॅडो स्प्रिंग्स येथील पदवीधर विद्यार्थिनी ओलिव्हिया जेम्स आणि हॅमिल्टन कॉलेजमधील मानसशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका कीला विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील अलीकडेच पार पडलेल्या संशोधनाने या प्रसिद्ध समजुतीला आव्हान दिले आहे. या संशोधनावरील ही चर्चा.
या संशोधनामागील प्रेरणा/What Fairy-Wrens Can Teach Us About Human Relationships
एकूणच मुळात या विषयात रस निर्माण का झाला या प्रश्नाचे उत्तर देताना प्रस्तुत संशोधातील लेखकांनी एका पक्षाचे उदाहरण दिले. त्यांनी एका वन्यजीव जीवशास्त्रज्ञाला ऑस्ट्रेलियातील स्थानिक पक्षी फेरी रेनच्या गिफ्टिंग पद्धतींबद्दल बोलताना ऐकले. या पक्ष्यांमधील नातेसंबंध हे मानवांच्या नातेसंबंधांसारखेच असतात. त्यांच्यातही मोनोगॅमस (एकनिष्ठ) आणि एक्स्ट्रापेअर (अतिरिक्त नातं) संबंध आढळतात. या पक्षाच्या बाबतीत असे आढळले की, बाहेरच्या नात्यांच्या बाबतीत नर फेरी रेन आपल्या इच्छेची अभिव्यक्ती करण्यासाठी मादीला फूलाच्या पाकळ्या भेट देतो, तर ही वागणूक त्यांच्या एकनिष्ठ नात्यांमध्ये दिसून येत नाही.
Fairy-wrens पक्षी फेरी रेन आणि मानवी समाजातील साम्य
फेरी रेन हा ऑस्ट्रेलियातील स्थानिक लहान पक्षी आहे. हा पक्षी त्याच्या गुंतागुंतीच्या सामाजिक वर्तनासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः या पक्ष्यांचे मानवी वर्तनाशी असलेले साम्य संशोधकांना या विषयाकडे आकर्षित करण्यात महत्त्वाचे ठरले. फेरी रेन समूहात राहतात, ज्यामध्ये सहसा त्यांचा एक एकनिष्ठ जोडीदार असतो आणि त्यांचे काही मदतनीस पक्षी असतात. हे मदतनीस पक्षी पिल्लांना वाढवणे, क्षेत्राचे संरक्षण करणे आणि अन्न शोधणे यामध्ये मदत करतात; या वर्तनामध्ये कुटुंब आणि सामाजिक जबाबदारीतील सामूहिक दृष्टिकोन दिसून येतो. ही सहकारी वागणूक मानवाच्या विस्तारित कुटुंबीयांमध्ये किंवा सामुदायिक गटांमध्ये एकत्रितपणे मूल वाढवण्याच्या पद्धतींसारखीच आहे.
जोडीदाराशिवाय बाह्यसंबंध Extramarital vs. Monogamous relationships.
फेरी रेनमध्ये एकनिष्ठ जोडीदाराशिवाय बाह्य (एक्स्ट्रापेअर) संबंध मोठ्या प्रमाणात दिसतात. नर फेरी रेन मादीला आकर्षित करण्यासाठी फूलाच्या पाकळ्या देतो, ती त्याची इच्छा व्यक्त करण्याची पद्धत आहे. या वर्तनामध्येही मानवी नातेसंबंधांशी साम्य दिसून येते. या पक्षांमध्ये एकनिष्ठता असली तरी, काही वेळा इतर जोडिदाराशी बाह्यसंबंध किंवा खुले नाते प्रचलित असल्याचे आढळते. फेरी रेन वेगवेगळ्या आवाजांचा वापर करतात, ज्याद्वारे धोकादायक इशारे आणि जोडीदारांबरोबरचे युगल गाणे समाविष्ट असते.
परोपकारी वागणूक
संशोधनात आढळले आहे की, हे पक्षी अंड्यामध्ये असतानाच विशिष्ट आवाज शिकतात. हा प्रारंभिक शिक्षण प्रक्रियेचा भाग मानवी भाषाशिक्षणासारखाच आहे, जिथे बाळ जन्मापूर्वीच आवाज ओळखण्यास आणि अनुकरण करण्यास सुरुवात करते. संशोधन असे दर्शवते की, फेरी रेन कठीण परिस्थितीत त्यांच्या जवळच्या सामाजिक गटातील व्यक्तींना मदत करण्यास प्राधान्य देतात. ही निवडक परोपकारी वागणूक मानवी वर्तनाशी सुसंगत आहे, जिथे व्यक्ती कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना इतरांच्या तुलनेत जास्त प्राधान्य देतात.
अधिक वाचा: Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?
संशोधनातील निष्कर्ष/Breaking Misconceptions About Spending Habits in Relationships
गिफ्ट देण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी, या अभ्यासामध्ये सहभागी लोकांवर संशोधन करण्यात आले. सहभागींना त्यांच्या एकनिष्ठ (मोनोगॅमस) नात्यांमधील आणि बाहेरच्या अतिरिक्त (एक्स्ट्रापेअर) नात्यावर होणाऱ्या खर्चाबद्दल विचारण्यात आले. तसेच, त्यांना जोडीदारांकडून कशा प्रकारे गिफ्ट मिळाले, याही बद्दल विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर, नातेसंबंधांमध्ये पुरुष गिफ्टवर अधिक खर्च करतात का, याचा शोध घेण्यासाठीही त्यांना काही प्रश्न विचारले गेले. अभ्यासाच्या निकालांमध्ये असे आढळले की, लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, लोक दीर्घकालीन नातेसंबंध टिकवण्यासाठी बाहेरच्या विवाहबाह्य संबंधांपेक्षा अधिक खर्च करतात. एकनिष्ठ जोडीदाराला गिफ्ट देणे अनेक उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरू शकते, यामुळे नातेसंबंध मजबूत आणि दृढ होण्यास मदत होते.
गैरसमज
तसेच, सर्वसाधारणपणे असा समज आहे की, नातेसंबंधांमध्ये पुरुष गिफ्ट खरेदीसाठी महिलांपेक्षा अधिक खर्च करतात. मात्र, या अभ्यासाच्या निकालांनी हा गैरसमज खोडून काढला. यामध्ये असे स्पष्ट झाले की, नातेसंबंध टिकवण्यासाठी पुरुष आणि महिला दोघेही समान प्रमाणात खर्च करतात. असे मानले जाते की, गिफ्ट देणे हा दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधाला प्रोत्साहन देण्याचा एक भाग आहे. विवाहबाह्य संबंधांमध्ये दीर्घकालीन स्थिरतेचा घटक नसतो; त्यामुळे लोक अशा नातेसंबंधांवर आपल्या संसाधनांचा खर्च करण्यास किंवा त्यात मोठे योगदान देण्यास अनिच्छुक असतात.