सुनील कांबळी

कॅनडामधील जंगलातील वणव्यांनी अमेरिकेच्या अनेक शहरांत धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे हवेचा दर्जा कमालीचा घसरला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
blast at IOC plant gujarat
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

वणवे नेमके कुठे?

उष्णतेच्या लाटांमुळे कॅनडाच्या अनेक प्रांतांमध्ये वणवे पेटले आहेत. कॅनडात प्रचंड मोठे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सध्या देशात ४०० ठिकाणी वणवे भडकले आहेत. त्यातील जवळपास निम्मे नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यातील क्युबेक भागातील वणवे भीषण असून, ते अमेरिकेच्या ऱ्होड आयलँडपासून ८०० ते ९०० किलोमीटरवर आहेत. क्युबेकमध्ये १५० ठिकाणी वणवे पेटले असून, तिथून मोठ्या प्रमाणात धूर अमेरिकेच्या दिशेने येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासूनच पश्चिम कॅनडातील आगीमुळे धुराचे लोट अमेरिकेच्या दिशेने येत आहे. गेल्या दहा वर्षांत इतके भीषण वणवे पाहिले नव्हते, असे कोलोरॅडो विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञ एरिक जेम्स सांगतात.

धूर दूरवर पोहोचण्यास पोषक वातावरण?

मोठ्या वणव्यांमुळे शेकडो किलोमीटरपर्यंत प्रदूषण पसरू शकते. या वणव्यांना वेगवान वारे, उष्ण, कोरड्या हवामानाची साथ लाभल्याने अमेरिकेतील अनेक मोठी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. ही हवामान स्थिती नवी नाही. मात्र, सध्या वणव्यांना आणि धूरप्रसारास पोषक वातावरण मिळाले आहे. हवामानात बदल झाल्यानंतर ही स्थिती बदलेल. मात्र, प्रदूषण काही आठवडे राहू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

प्रदूषणाच्या पातळीत किती वाढ?

धुरामुळे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता घसरली आहे. उत्तर अमेरिकेतील बहुतांश शहरांमध्ये गुरुवारी सकाळी हवेचा दर्जा वाईट होता. कॅनडाच्या अल्बर्टामध्ये गुरुवारी हवा गुणवत्ता निर्देशांक ३३८ इतका नोंदविण्यात आला. म्हणजे, हवेचा दर्जा अतिशय वाईट होता. उत्तर अमेरिकेतील सुमारे १० कोटी नागरिकांना खराब हवेचा सामना करावा लागत आहे. वाॅशिंग्टन डीसी (हवा गुणवत्ता निर्देशांक २९३), न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियामध्ये हवेची गुणवत्ता सर्वांत वाईट होती, असे अमेरिकी पर्यावरण संरक्षण संस्थेची आकडेवारी सांगते.

विश्लेषण : एल निनो सक्रिय.. पावसावर काय परिणाम?

जनजीवनावर परिणाम काय?

धूर, कमी दृश्यमानतेमुळे अमेरिकेतील अनेक शहरांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रदूषणामुळे व्हाइट हाऊसमधील नियोजित कार्यक्रमासह क्रीडा स्पर्धा, अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बहुतांश विमानतळांनी उड्डाणे रद्द केल्याने हवाई प्रवास ठप्प झाला. वाॅशिंग्टन डीसी येथील युनियन मार्केट दर गुरुवारी गर्दीने फुलून जाते. मात्र, गेल्या गुरुवारी तिथे शुकशुकाट होता. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयही बंद ठेवण्यात आले असून, प्राण्यांना मोकळ्या अधिवासाऐवजी बंदिस्त भागात ठेवण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावरून उतरलेली मुखपट्टी पुन्हा दिसू लागली आहे.

श्वसन आजाराची भीती?

प्रदूषणामुळे मुख्यत्वे फुप्फुसाचे आजार बळावण्याची भीती आहे. शिवाय, घसा, नाक, डोळे आदी अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बहुतांश निरोगी प्रौढ व्यक्तींवर त्याचा फार काळ प्रभाव राहणार नाही. ते आजारपणातून लवकर बरे होऊ शकतील. मात्र, मुले, वयोवृद्ध व्यक्ती, दमा आणि अन्य श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना दीर्घकाळ आजारपणाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दारे, खिडक्या बंद ठेवून घरातच राहण्याची सूचना अमेरिकेतील अनेक राज्यांनी केली आहे.

वणव्यांवर उपाय काय?

तापमानवाढीमुळे उष्णतेच्या मोठ्या आणि दीर्घकालीन लाटा येत राहतील. त्यातून भीषण वणवे पेटतील आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल, असा इशारा वाॅशिंग्टन विद्यापीठाचे जोएल थाॅर्नटाॅन यांनी दिला आहे. दुसरीकडे, जागतिक तापमानवाढीच्या घातक परिणामाचे हे उदाहरण आहे, असे अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदाे यांच्याशी चर्चा करून वणवे विझविण्यासाठी ६०० अग्निशमन बंब पाठविण्याची ग्वाही दिली. हा तातडीच्या उपायाचा भाग झाला. मात्र, तापमानवाढ रोखण्यासाठी अमेरिकेला दीर्घकालीन उपाययोजनेसाठी मोठा भार उचलणे आवश्यक आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगाच्या तापमानात १.०२ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कर्बउत्सर्जन नियंत्रणात येईपर्यंत तापमानवाढ सुरूच राहणार आहे. अमेरिकेने २०५० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले असले तरी हा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर नाही, असे चित्र आहे.