भारतीय जनता पक्षाची ओळख प्रामुख्याने उत्तरेकडील किंवा हिंदी भाषक पट्ट्यातील पक्ष अशी होती. गेल्या (२०१९) निवडणुकीत दक्षिणेकडील लोकसभेच्या १३० जागांपैकी भाजपला कर्नाटकमध्ये २५ तर तेलंगणात चार अशा २९ जागा जिंकता आल्या. मात्र यंदा मतदानोत्तर चाचण्यांचे कल पाहता भाजप तेथील सर्वच राज्यांमध्ये खाते उघडण्याची चिन्हे आहेत. यंदा या भागात ३८ ते ४२ जागांवर कमळ फुलेल असे चित्र आहे. त्यामुळे आता विरोधकांना भाजपवर उत्तर किंवा पश्चिम भारतातील पक्ष असा शिक्का मारणे कठीण जाईल.

दक्षिणेतील जागांचे गणित

दक्षिणेकडील तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ ही राज्ये तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होते. तमिळनाडू सर्वाधिक ३९ तर पुदुच्चेरीत एक जागा आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक २८, आंध्र प्रदेश २५, केरळ २०, तेलंगण १७ अशा लोकसभेच्या जागा आहेत. गेल्या वेळी उत्तर तसेच पश्चिमेकडील राज्यांमध्ये जवळपास ९० टक्के जागा जिंकल्याने यंदा भाजपने दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर या वर्षातच पहिल्या पाच महिन्यांत तमिळनाडूचे किमान सात ते आठ दौरे केले. याखेरीज स्थानिक संस्कृतीची प्रतीके सातत्याने प्रचारात आणली. त्यामुळे राज्यात भाजपची एक प्रतिमा तयार झाली. त्याचा लाभ होताना दिसत आहे. केरळवरही पंतप्रधानांचे विशेष लक्ष होते.

Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का

हेही वाचा – बर्फाळ प्रदेशातल्या आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा भीषण उद्रेक कसा झाला? ज्वालामुखीची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…

अण्णामलाई यांचा उदय

तमिळनाडू भाजपची ताकद वाढण्यात प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचा मोलाचा वाटा आहे. आयपीएस असलेले अण्णामलाई यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेत राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. राज्यभर सर्व विधानसभा मतदारसंघात यात्रा काढून वातावरणनिर्मिती केली. अण्णा द्रमुकने भाजपशी असलेली आघाडी तोडली तरी, पक्षाने छोट्या गटांना बरोबर घेत राज्यात लोकसभेच्या सर्व ३९ जागा लढवत द्रमुकला आव्हान दिले. पंतप्रधानांची लोकप्रियता तसेच अण्णामलाई यांची मेहनत पाहता, लोकसभेला निकाल काहीही लागू देत २०२६च्या विधानसभा निवडणुकीची पायाभरणी या निमित्ताने भाजपने केली. जयललितांच्या पश्चात अण्णा द्रमुकची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाची जागा भाजप भरून काढताना दिसत आहे. भविष्यात द्रमुकपुढे राज्यात भाजपचेच आव्हान असेल.

तेलंगणमध्येही संधी

तमिळनाडूपाठोपाठ तेलंगणमध्ये भाजपला यंदा जागा वाढविण्याची संधी दिसते. विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा पराभव झाला. पाठोपाठ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे निम्म्याहून अधिक खासदार काँग्रेस किंवा भाजपमध्ये गेले. आता लोकसभेला सत्तारूढ काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना झाला. भारत राष्ट्र समिती एक ते दोन जागा जिंकेल असे चित्र आहे. उर्वरित १३ ते १४ जागांवर या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच सामना होईल. थोडक्यात दक्षिणेत तेलंगणा हे भाजपसाठी महत्त्वाचे राज्य ठरेल.

केरळमध्ये खाते उघडण्याची आशा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तम काम असलेले राज्य अशी केरळची ओळख. मात्र राज्यातील सामाजिक समीकरणे पाहता भाजपला येथे फारसे यश मिळत नाही. विधानसभेला एकदा खाते उघडता आले तर लोकसभेला गेल्या वेळी भाजप एका मतदारसंघात दुसऱ्या स्थानी होता. उर्वरित १९ जागांवर तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. येथे मुख्य सामना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी विरोधात काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली संयुक्त लोकशाही आघाडी असाच असतो. मात्र तिरुअनंतपुरम, त्रिचूर, अटिंगल, पथ्थनमथिट्टा या चार जागांवर यावेळी भाजप स्पर्धेत आहे. त्यापैकी तिरुअनंतपुरम आणि त्रिचूर येथे अनुक्रमे मंत्री राजीव चंद्रशेखर व अभिनेते सुरेश गोपी यांना यश मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यात मुस्लीम २६ टक्के तर ख्रिस्ती १८ टक्के आहेत. भाजपने हिंदू मतपेढी भक्कम करण्याबरोबरच ख्रिस्ती समुदायातील मते मोठ्या प्रमाणात वळवल्याचे मानले जात आहे. जर भाजपला यश मिळाले तर दोन आघाड्यांच्या पारंपरिक राजकारणात केरळमध्ये तिरंगी सामना भविष्यात होऊ शकतो.

कर्नाटकमध्ये फटका?

एकीकडे दक्षिणेत भाजपसाठी मतदानोत्तर चाचण्यांनी आशादायक चित्र निर्माण केले असताना, कर्नाटकमध्ये मात्र गेल्या वेळच्या तुलनेत तीन ते चार जागा गमावाव्या लागतील अशी चिन्हे आहेत. राज्यातील काँग्रेस सरकार तसेच त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपला थोडा फटका बसेल. तरी भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी आघाडी करून काँग्रेस विरोधी मतांची संभाव्य मतफूट टाळली. लिंगायत-वोक्कलिगा मतपेढी भाजप-जनता दल युतीच्या मागे बऱ्यापैकी राहील असे चित्र आहे. हे दोन्ही समाज मिळून राज्यात जवळपास २५ टक्क्यांच्या आसपास आहेत. देवेगौडा हे वोक्कलिगा आहेत. तर भाजपचे राज्यातील जनाधार असलेले नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची लिंगायत समाजावर बऱ्यापैकी पकड मानली जाते. अर्थात निवडणुकीच्या मध्यावरच देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाबाबतचे प्रकरण बाहेर आले. महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून रेवण्णाला अटक झाली. त्यामुळे निवडणुकीवर काही प्रमाणात याचा परिणाम होणार हे स्पष्ट आहे.

आंध्रमध्ये आघाडीचा लाभ, आंध्र प्रदेशात गेल्या वेळी भाजपला लोकसभेत 

जेमतेम एक टक्का मते होती. मात्र यंदा चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पक्ष तसेच अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या आघाडीचा लाभ भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेला भाजप सहा जागांवर लढत आहे. त्यातील पाच उमेदवार हे बाहेरील पक्षातून आले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूकही होत आहे. येथे वायएसआर काँग्रेस सत्तेत असून, जगनमोहन यांच्याकडे राज्याची धुरा आहे. चंद्राबाबू यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असून, राज्यात सत्तांतर अपेक्षित आहे. भाजपलाही त्याचा फायदा होत असून, लोकसभेला येथे खाते उघडले जाईल असे संकेत मतदानोत्तर चाचण्यांमधून मिळत आहेत.

हेही वाचा – पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील चावीचे गूढ; रत्नभांडारात दडलंय तरी काय?

ओडिशात अनुकूल स्थिती

पूर्वेकडील ओडिशात यंदा भाजपला अनुकूल स्थिती मानली जाते. गेल्या वेळी राज्यातील लोकसभेच्या २१ पैकी ८ भाजपला तर बिजु जनता दलाला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा भाजपने प्रमुख नेत्यांना लोकसभेला उतरवत वातावरण निर्मिती केली. त्यातच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या प्रकृतीचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी ठेवला. पटनायक यांचे निकटवर्तीय व्ही. के. पांडियन हे तमिळ आहेत. येथे लोकसभेबरोबरच विधासभा निवडणूकही होत आहे. भाजपने ओडिया अस्मितेच्या मुद्द्याला हात घालत, पांडियन हे तमिळ असल्याचे निर्देशित केले. लोकसभेला भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल. मात्र विधानसभेत नवीन पटनायक यांची २४ वर्षांची सत्ता जाणार का, हा प्रश्न आहे. कारण भाजपकडे नवीनबाबूंच्या लोकप्रियतेच्या जवळपास जाईल असा एकही स्थानिक नेता नाही. पंतप्रधानांच्या करिष्म्यावरच भाजपची सारी भिस्त दिसते. एकूणच पूर्वेपासून उत्तरेपर्यंत सर्वच ठिकाणी भाजपचा विस्तार झाल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसते. ईशान्येकडील एक-दोन छोट्या राज्यांचा अपवाद सोडला तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्व राज्यांतून भाजपचा खासदार लोकसभेत असेल हे निश्चित.

hrishikesh.deshpande@expressindia.com

Story img Loader