नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० ची शिखर परिषद संपन्न होणार आहे. त्यानंतर लगेचच १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन कोणत्या विषयावर आहे, याबाबतची कोणतीही कल्पना अद्याप तरी देण्यात आलेली नाही. विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० राष्ट्रगटातील पाहुण्यांना आणि मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठविले. या निमंत्रण पत्राच्या वर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ लिहिले होते, त्यामुळे केंद्र सरकार देशाचे नाव ‘भारत’ असे करणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

इंडियाचे नाव भारत होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी जगातील इतर अनेक देशांनी आजवर नावे बदलली आहेत. ही नावे का बदलण्यात आली? याबाबतचा आढावा फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने घेतला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती पुढीलप्रमाणे….

40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Sameer Vidwans on Democracy
“समुहाने निवडून दिलेली राजेशाही…”, निवडणुकीनंतर मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट; म्हणाला, “लोकशाहीच्या नावाखाली…”

तुर्किये – Turkiye

तुर्कियेने नुकतेच आपल्या देशाच्या नावामध्ये बदल केलेला आहे. (याआधी टर्की (Turkey) असे नाव होते) तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री मेवलूत चावोशावलो यांनी जून २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून देशाचे नाव बदलले असल्याचे कळवले होते. टर्की नावाच्या पक्षापासून स्वतःचे नाव वेगळे करण्यासाठी आणि देशाची नवी प्रतिमा तयार करण्यासाठी हे नाव बदलले गेल्याचे सांगण्यात आले.

नेदरलँड – Netherlands

२०१९ मध्ये डच लोकांनी हॉलंड हे नाव बदलून नेदरलँड नाव धारण करण्याचा निर्णय घेतला. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, स्वतःची जागतिक प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. गार्डियन वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, देशातील औषध संस्कृती आणि ॲमस्टरडॅममधील रेड-लाईट जिल्ह्यांपासून इतर गोष्टींकडे लक्ष वळविण्यासाठी नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नेदरलँडच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते, “निर्यात आणि पर्यटन वृद्धिंगत करणे, क्रीडा क्षेत्राला चालना देणे आणि डच संस्कृती, डच नियम आणि मूल्यांचा प्रसार करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यापुढे आमच्या देशाचे अधिकृत नाव नेदरलँड असेल.”

नॉर्थ मसेडोनिया – North Macedonia

मसेडोनियाने २०१९ साली आपल्या नावात बदल करून ‘नॉर्थ मसेडोनिया’ असे केले. १९९१ मध्ये युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाने ‘रिपब्लिक ऑफ मसेडोनिया’ हे नाव स्वीकारले होते. मात्र, ग्रीसने आक्षेप घेतल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो आणि युरोपियन युनियनने या देशाला मान्यता दिली नाही. पण, १३० हून अधिक देशांनी मान्यता दिली.

ग्रीसने दावा केला की, मसेडोनिया या शब्दाचा वापर करून त्यांनी आमचा प्राचीन वारसा हिसकावून घेतला आहे.

श्रीलंका – Sri Lanka

१९७२ साली श्रीलंकेने जुने सिलोन हे नाव बदलले. ब्रिटानिकाच्या म्हणण्यानुसार, नवीन संविधानाच्या आधारे नावात बदल करण्यात आला होता. तसेच द्विसदनी विधानमंडळाला एकसदनी मंडळात बदलले. तसेच ब्रिटिशांच्या वसाहतीमध्ये असलेली गव्हर्नर जनरलची पद्धत बदलून त्याजागी राष्ट्राध्यक्षांना राज्य प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.

इंडिया टुडेनुसार, देशाचा वसाहतवादाचा शिक्का पुसून काढण्यासाठी श्रीलंकेने नाव बदलण्याचा निर्णय घेतला. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, २०११ साली पूर्वीच्या सिलोन नावाने असलेल्या सर्व संस्थांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला.

थायलंड – Thailand

इंडिया टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, थायलंडची ओळख शतकानुशतके सियाम म्हणून ओळखली जात होती. १९३९ साली सियामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, वसाहतवादाचा प्रभाव कमी करणे आणि देशाची एकता आणि अस्मिता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नाव बदलण्यात आले, असे सांगितले गेले.

म्यानमार – Myanmar

बरेच वर्ष बर्मन वांशिक गटाचा प्रभाव असल्यामुळे म्यानमारला पूर्वी बर्मा या नावाने ओळखले जात होते. १९८८ साली जंटा सत्ताधाऱ्यांनी लोकशाही समर्थकांचा उठाव क्रूरपणे दडपला. पुढच्या वर्षी लष्करी नेत्यांनी अचानक देशाचे नाव बदलून म्यानमार केले. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, तत्कालीन सत्ताधारी जंटाला वैध ठरविण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले होते. मात्र, देशातंर्गत फारसा काही बदल झाला नाही. कारण बर्मिज भाषेत म्यानमारचा अर्थ बर्मा असा होतो. फक्त देशाचे नाव इंग्रजीत बदलले गेले.

विशेष म्हणजे, अमेरिकेने अजूनही या देशाचा उल्लेख म्यानमार असा करण्यास विरोध दर्शवलेला आहे.

इराण – Iran

१९३५ साली इराणने जुने पर्शिया हे नाव सोडले. लष्करी अधिकारी रजा शाह यांनी १९९२ साली ब्रिटिशांच्या पाठिंब्यावर सत्तेत बसलेल्या कजर राजघराण्याला जबरदस्तीने बाहेर काढले. त्यानंतर रजा शाह यांनी पर्शिया हे नाव बदलून इराण हे नाव ठेवले. अल मजल्ला या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, पर्शिया हे नाव अतिवसाहतवादी असल्याचे रजा शाह यांनी सांगितले.

संकेतस्थळाने शाह यांच्या विधानाचा दाखला देत सांगितले की, पर्शिया हे नाव सतत युद्धग्रस्त असलेल्या देशाची आठवण करून देते. कजार घराण्याच्या गंभीर गैरव्यवस्थापनामुळे देश कर्जबाजारी झाला. आमच्या मते पर्शिया अंधारमय भूतकाळाची आठवण करून देतो, तर इराण नव्या भविष्याची आस दाखवतो.

कंबोडिया – Cambodia

इकोनॉमिक्स टाइम्सच्यामते, कंबोडियाने अनेक प्रसंगी आपल्या देशाच्या नावात बदल केलेला आहे. १९५३ आणि १९७० दरम्यान कंबोडियाचे नाव किंग्डम ऑफ कंबोडिया म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर नाव बदलून खमेर प्रजासत्ताक असे करण्यात आले. १९७५ ते १९७९ दरम्यानपर्यंत डेमोक्रॅटिक कंपुचेया असे नामकरण करण्यात आले होते.

१९८९ ते १९९३ दरम्यान स्टेट ऑफ कंबोडिया हे नाव देण्यात आले. १९९३ साली जेव्हा राजेशाही पुन्हा पुनरुज्जीवन झाली, त्यानंतर पुन्हा एकदा देशाचे नाव किंग्डम ऑफ कंबोडिया असे करण्यात आले.

आयर्लंड – Ireland

पूर्वी आयरिश फ्री स्टेट म्हणून ओळखले जाणारे आयर्लंडने १९३७ साली आपले नाव बदलले. यावर्षी देशाने नवीन संविधान स्वीकारले.

झिम्बाब्वे – Zimbabwe

झिम्बाब्वे या देशाचे ब्रिटिशांच्या राजवटीतले पूर्वीचे नाव साऊदर्न ऱ्होडेशिया असे होते. १९६४ साली ब्रिटिशांनी साऊदर्न ऱ्होडेशिया हे नाव बदलून फक्त ऱ्होडेशिया असे ठेवले. १९८० साली युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी झिम्बाब्वे हे नाव ठेवले.

Story img Loader