बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्याआधीच भारतासमोर काही पेच निर्माण झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माला काही दिवसांपूर्वीच अपत्यप्राप्ती झाल्यामुळे त्याने आणखी काही काळ मायदेशात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्थ येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे. बुमराला कर्णधारपदाचा कितपत अनुभव आहे, तसेच या अतिरिक्त भाराचा त्याच्या गोलंदाजीवर परिणाम होऊ शकतो का, याचा आढावा.

कर्णधारपदासाठी बुमरा योग्य का?

२०१८ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराने फार कमी कालावधीत आपले वेगळेपण सिद्ध केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज असा लौकिक त्याने मिळवला. त्यामुळे साहजिकच संघातील अन्य खेळाडूंमध्ये त्याच्याविषयी वेगळा आदर निर्माण झाला. खूप विचारी आणि हुशार गोलंदाज म्हणून बुमरा ओळखला जातो. तसेच मैदानावर तो युवा खेळाडूंना, विशेषत: वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळेच तो कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला वाटले.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

हेही वाचा >>>Vir Das post: भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत चालवतोय टॅक्सी? काय नेमकं घडलं?

कर्णधारपदाचा अनुभव…

बुमराने आतापर्यंत केवळ एक कसोटी आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत बुमराला सर्वप्रथम कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो कपिलदेव यांच्यानंतर भारताचे नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला होता. परंतु, आपल्या कर्णधारपदाच्या पदार्पणात बुमराला हार पत्करावी लागली होती. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मात्र बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती. या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

कर्णधारपदाच्या पदार्पणात काय घडले?

भारतीय संघ २०२१ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका नियोजित होती. यापैकी चार सामने ठरल्याप्रमाणे झाले, ज्यात भारताने २-१ अशी आघाडी मिळवली होती. पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघातील काही सदस्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. हा निर्णायक सामना पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये खेळविण्यात आला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहितला करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याला या कसोटीला मुकावे लागले आणि बुमराने नेतृत्वाची धुरा सांभाळली. या सामन्यात इंग्लंडने भारतावर सात गडी राखून मात केली होती. भारताने इंग्लंडसमोर चौथ्या डावात ३७८ धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. मात्र, जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४) यांना रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधता आली. या सामन्यात बुमराचे काही निर्णय प्रश्न उपस्थित करणारे ठरले होते. त्याला गोलंदाजांचा योग्य वापर करता आला नाही, तसेच इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा अवलंबल्यानंतर बुमरा थोडा गोंधळला आणि कर्णधार म्हणून पर्यायी योजना शोधण्यात तो कमी पडल्याचे म्हटले गेले. या अनुभवातून तो कितपत शिकला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>निवडणुकीत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा का गाजतोय? अदानींवरून दावे-प्रतिदावे का?

अतिरिक्त भाराचा गोलंदाजीवर परिणाम?

कर्णधारपदाच्या पदार्पणात बुमराला हार पत्करावी लागली असली, तरी त्याची वैयक्तिक कामगिरी समाधानकारक होती. त्याने दोन डावांत मिळून पाच गडी बाद केले होते. तसेच फलंदाजीत चमक दाखवताना स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा काढत कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला होता. फलंदाजीत बुमराकडून पुन्हा अशी कामगिरी अपेक्षित नाही, पण गोलंदाजीत भारताची भिस्त त्याच्यावरच असणार आहे. विशेषत: मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत बुमरावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायची झाल्यास भारतासाठी बुमराने लौकिकाला साजेशी कामगिरी करणे आवश्यक आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्याला केवळ वैयक्तिक कामगिरीचा नव्हे, तर संपूर्ण संघाचा विचार करावा लागेल. त्यामुळे मानसिकदृष्ट्या त्याचा निश्चितपणे कस लागणार आहे.

बुमरासाठी मोठी संधी…

वेगवान गोलंदाज चांगले कर्णधार होऊ शकत नाहीत असा क्रिकेटविश्वात समज आहे. मात्र, तो चुकीचा असल्याचे कपिल देव, पाकिस्तानचे इम्रान खान आणि अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांनी दाखवून दिले आहे. आता बुमराकडेसुद्धा ही संधी आहे. तसेच ३७ वर्षीय रोहित शर्मा आणखी किती काळ कसोटी क्रिकेट खेळणार, हे निश्चित नाही. या परिस्थितीत भारताला आता भविष्याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे पर्थ कसोटीत यशस्वी कामगिरी करून पुढील पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपणच योग्य उमेदवार असल्याचे दाखवून देण्याचीही बुमराकडे संधी आहे. ती तो साधतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.