झारखंडमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. सध्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील सरकार हेमंत सोरेन चालवत आहेत. यामध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रीय जनता दल हे इंडिया आघाडीतील घटक पक्ष सहभागी आहेत. भारतीय जनता पक्ष यंदा सत्तेसाठी अटोकाट प्रयत्न करतोय. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांनी समाजमाध्यमावर मुख्यमंत्रीपदावरून अपमानास्पद पद्धतीने दूर केल्याची खदखद व्यक्त करत, वेगळ्या राजकारणाचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. चंपाई हे हेमंत सोरेन यांचे वडील शिबू यांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहारमधून झारखंड वेगळे राज्य निर्माण करण्यात आले. या चळवळीत चंपाई सक्रिय होते. आता वयपरत्वे शिबू सक्रिय राजकारणात नाहीत. झारखंड मुक्ती मोर्चाची सूत्रे हेमंत यांच्या हाती आहेत. पक्षाचे नेतृत्व हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा चंपाई यांचा आक्षेप आहे. यातूनच पक्षात फूट अटळ मानली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा