पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. सध्या पंजाबामधील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी देखील केली आहे. तर, राज्यातील सद्यस्थितीमधील राजकीय परिस्थितीचा फायदा करून घेत, पंजाबच्या राजकारणात दमदार पदार्पण करण्यासाठी भाजपाकडूनही प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

पंजाबमधील प्रभावी शीख चेहरा आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत स्वत:चा पंजाब लोक काँग्रेस(पीएलसी) पक्ष निर्माण केला. त्यानंतर आता त्यांनी भाजपाशी देखील हातमिळवणी केल्याने, भाजपाच्या अपेक्षा अधिकच वाढलेल्या आहेत.

Indian ammunition Ukraine marathi news
विश्लेषण: भारतीय बनावटीचा दारुगोळा युक्रेनकडे? भारताचा इन्कार, पण रशिया नाराज!
Instagram teen accounts marathi news
विश्लेषण: इन्स्टाग्रामकडून आता ‘टीन अकाउंट्स’… खास किशोरवयीनांसाठी काय…
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
hezbullah israel attack
लेबनॉनमधील पेजर स्फोटांमुळे इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष पेटणार का?
one nation one election, modi government,
विश्लेषण : एक देश, एक निवडणुकीसाठी आव्हाने अधिक! आर्थिक गणितांपेक्षा राजकीय गणितेच अधिक?
Worshipping the Karam tree
Worshipping the Karam tree: करम आदिवासी सणाशी संबंधित दंतकथा आणि शेतीची प्रथा नेमकी काय आहे?
indus water treaty
Indus Water Treaty: भारताने सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानला बजावली नोटीस ; नेमकं प्रकरण काय?
new blood group MLA
५० वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी शोधला नवीन रक्तगट; याचे महत्त्व काय? रुग्णांना याचा कसा फायदा होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे आवश्यक असलेली चालना देखील पक्षाला मिळू शकते, हा दौरा लवकर होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मोदी पंजाबचा दौरा करण्याचा अंदाज आहे. तसेच, या दरम्यान पंतप्रधान मोदी व कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अन्य प्रमुख नेते एकाच मंचावर देखील येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या तरी याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले आहे.

याचबरोबर पंजाब भाजपाचे सरचिटणीस सुभाष शर्मा यांनी देखील सांगिते आहे की, ”आम्हाला याबाबत माहिती नाही. पंजबामधील सर्व ११७ मतदारसंघांमध्ये संमेलन किंवा रॅली आयोजित करण्यासाठी आणि ४ हजार बूथ स्तरीय बैठका आयोजित करण्यासाठी पंजाब भाजपाला काम देण्यात आलेले आहे.”

उत्तर प्रदेशपेक्षा भाजपाची पंजाबसाठी वेगळी रणनिती आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर राज्यातील बहुतांश स्थिती सामान्य झाली आहे, हे भाजपाला कळून चुकले आहे. तरी देखील राज्यातील नेत्यांना असे वाटते की, आणखी दोन आठवड्यांमध्ये वातावरण आणखी थंडावले तर भाजपाच्या रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी जमवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

परंतु मुद्दा असा आहे की, निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधानांनी एकदा तरी राज्याचा दौरा करणे अपेक्षित आहे. शीख समुदायापर्यंत पोहोचण्याबरोबरच पंतप्रधानांनी मोठ्या तिकिटांच्या घोषणा करणेही अपेक्षित आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर पक्षाकडून पुढील कार्यक्रम वाढवला जाण्याची अपेक्षा आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे तीन शेती विषयक कायदे रद्द करणे, निवडणुकीपूर्वी धोरणात्मक माघार, ज्याची पक्षाला आशा आहे की त्यांना केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यातच मदत होणार नाही तर पंजाबमध्ये स्थान मिळविण्यातही मदत होईल. राज्यात पक्ष बॅकफूटवर गेला आहे हे सर्वमान्य सत्य असले, तरी विरोधकांची स्थिती फारशी चांगली नाही हे देखील त्यांच्या लक्षात आलेले आहे. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, “आम्हाला आशा आहे की लवकरच वातावरण शांत होईल.”

दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की, काँग्रेसच्या गोटात मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात टोकाचा वाद निर्माण झालेला आहे. तर अकाली दलाचे नेते ड्रग्ज आणि विटंबना प्रकरणात वादात अडकलेले आहेत. . ‘आप’कडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही.

तर, भाजपाने हिंदू मतांची मोजणी करण्याबरोबरच त्यांच्या व्होटबँकमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते राणा गुरमित सोधी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावर सिद्धू म्हणाले की, “ईडीच्या भीतीने हे लोक पक्ष बदलत आहेत.”

मनजिंदरसिंग सिरसा हे भाजपामध्ये सहभागी होणारा आणखी एक प्रमुख शीख चेहरा होते आणि या हालचालींकडे भाजपा पंजाबची निवडणूक आक्रमकपणे लढणार असल्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. पंजाबमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “भाजपाने पंजाबमधून हार मानलेली नाही. ते भलेही खाली असतील पण ते नाबाद आहेत.”