पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ नोव्हेंबर रोजी सूरतमधील सूरत हिरे सराफा बाजाराचे (Surat Diamond Bourse) उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. हे जगातील सर्वात मोठे कार्यालय असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी (१९ जुलै) पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. “सूरत हिरे सराफा बाजारामुळे सूरतमधील हिरे उद्योगाला एक नवी गतीशीलता मिळून त्याचा विकास होईल. भारताच्या उद्योजकीय भावनेचाही दाखला या विशाल कार्यालयातून मिळतो. एसडीबीमध्ये व्यापार, नाविन्य, सहकार्य याला प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूरत हिरे सराफा बाजार कसा आहे?

सध्या सूरत आणि मुंबई या ठिकाणांहून हिरे बाजार सक्रिय आहे. पूर्वी मुंबई हे हिरे बाजाराचे मुख्य केंद्र होते. सूरत हिरे सराफा बाजार अर्थात Surat Diamond Bourse (SDB) या ठिकाणी हिऱ्यांवरील कटिंग, पॉलिशिंग, व्यापार, संशोधन यासारख्या प्रक्रिया एकाच जागी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे मुंबईतील हिरे उद्योग सूरतमध्ये स्थलांतरित होईल असे सांगितले जाते.

सध्या सूरतमधील महिधरर्परा हिरा बाजार आणि वराछा हिरा बाजार या दोन ठिकाणी हिरे व्यापार केला जातो. मात्र, या ठिकाणी सुरक्षेची हमी नाही. रस्त्यालगत असलेल्या दुकानांत व्यापारी तिथेच उभे राहून व्यापार करतात. हिऱ्यांवरील प्रक्रिया करण्याचा मुख्य उद्योग सध्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex – BKC) येथे आहे. बीकेसीमध्ये हिरे व्यापारासाठी आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हिरे उद्योगाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, मुंबईमध्ये सध्या जागेची मोठी कमतरता भासत आहे. तसेच रिअल इस्टेटचे भाडेही महागले आहे. त्याशिवाय मुंबईत व्यापार होणाऱ्या हिऱ्यांचा मोठा भाग सूरतमध्ये उत्पादित केला जातो. तिथून स्थानिग अंगडिया ट्रेनमधून हिरे घेऊन मुंबईत येतात. या प्रवासासाठी किमान साडे चार तासांचा वेळ जातो.

हे वाचा >> विश्लेषण : हिरे व्यापाऱ्यांसाठी कोटी रुपयांची ने- आण करणारे अंगडिया कोण आहेत? जाणून घ्या..

जगातील सर्वात मोठे कार्यालय

सूरतच्या ड्रीम सिटी (Diamond Research and Mercantile – DREAM ) येथे ६६ लाख चौरस फूट क्षेत्रावर हिरे सराफा बाजाराची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. दिल्लीस्थित मोर्फोजेनेसिस या कंपनीने या सराफा बाजार संकुलाच्या रचनेची संकल्पना मांडली. जगातील सर्वात मोठे कार्यालय म्हणून यूएसमधील पेंटागॉनचा उल्लेख होतो, पण याहीपेक्षा एसडीबी संकुल हे सर्वात मोठे कार्यालय आहे, असा दावा मोर्फोजेनेसिसने केला आहे. याच कंपनीने गांधीनगरमध्ये असलेल्या गिफ्ट सिटीमधील (GIFT City) बीएसई टॉवर आणि अहमदाबादमधील झायडस कॉर्पोरेट पार्कची (Zydus Corporate Park) निर्मिती केली आहे.

एकाच छताखाली हिरे व्यापार शक्य

एसडीबीमध्ये १५ मजल्यांच्या नऊ इमारती आहेत. संकुलात एकूण ४,२०० छोटी-मोठी कार्यालये आहेत, ज्याचे क्षेत्रफळ ३०० चौरस फुटांपासून ते ७५ हजार चौरस फूट इथपर्यंत असण्याची शक्यता आहे. हिऱ्यांशी संबंधित अनेक बाबी आणि पायाभूत सोयीसुविधा जसे की, कच्च्या हिऱ्यांची आणि पॉलिश्ड हिऱ्यांची विक्री, हिऱ्यांचे उत्पादन करणाऱ्या प्रयोगशाळा, हिऱ्यांच्या निर्मितीसाठी उपयोगी पडणारे सॉफ्टवेअर, हिरे प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या कंपन्या.. इत्यादी हिरे व्यापारासाठी पूरक असणाऱ्या इतर बाबी एकाच संकुलात उपलब्ध होणार आहेत.

हे वाचा >> विश्लेषण: प्रयोगशाळेत कृत्रीम हिरे कसे बनवले जातात? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी अनुदान का दिले?

याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ग्राहकांसाठी हिरे दागिन्यांचे २७ शोरूम्स उघडण्यात येणार आहेत. एसडीबी संकुलाच्या आत आणि बाहेर ४००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कडेकोट सुरक्षा ठेवणे सोपे जाणार आहे. एसडीबीच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की, इथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल. बायोमेट्रिक माहिती असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या संकुलात प्रवेश करता येणार आहे.

स्थानिक उद्योजकांना याचा लाभ मिळेल?

हिरे व्यापारात गुंतलेल्या सूत्रांनी सांगितले की, मुंबईमधील हिरे व्यापाऱ्यांनी याआधीच एसडीबीमध्ये कार्यालय बुक केले आहे. एसडीबीमध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी सूरत शहरातील दळणवळणांशी निगडीत सुविधांबाबत अनेकांना साशंकता आहे. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तिथून अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळते. सूरत विमानतळावरून सूरत ते शारजाह असे एकच आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. त्याशिवाय सूरतमध्ये सात तारांकित (सेव्हन स्टार) हॉटेल्स नाहीत आणि इतरही अनेक निर्बंध असल्यामुळे मुंबईतील व्यापारी सूरतमध्ये आपला संपूर्ण व्यवसाय हलविण्यास कचरत आहेत.

‘व्हीनस ज्वेल्स ऑफ सूरत’ या कंपनीचे मालक सेवंतीभाई शाह यांनी सांगितले, “बीकेसीमधील भारत हिरे सराफा बाजार या ठिकाणी ज्या मोठ्या हिरे कंपन्यांचे कार्यालय आहेत, ते सर्व सूरतमध्येही कार्यालय उघडतील. या कंपन्या दोन्ही ठिकाणांहून आपला व्यवसाय चालवतील. पण, सूरतमधील जे लहान व्यापारी होते, ज्यांना मुंबईत कार्यालय मिळवणे शक्य नव्हते, तेदेखील आता सूरतमधून त्यांचा व्यवसाय करू शकणार आहेत; त्यांच्यासाठी ही संधी आहे.”

एसडीबीचे नियामक मंडळ

एसडीबीच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये सात सदस्य आहेत. सूरतमधील सर्वात मोठी हिरे कंपनी असलेल्या किरण जेम्सचे मालक वल्लभभाई लखानी हे एसडीबीचे अध्यक्ष आहेत. धनेरा डायमंडचे मालक अरविंद धनेरा, श्री राम क्रिष्णा एक्सपोर्ट्सचे गोविंद ढोलकिया, व्हीनस ज्वेल्सचे सेवंतीभाई शाह, कपू जेम्सचे दीयालभाई वघानी, धर्मानंद डायमंडचे लालजी पटेल आणि सावनी ब्रदर्श डायमंड कंपनीचे मथुराभाई सावनी हे इतर सदस्य या समितीमध्ये आहेत. हे सर्व लोक मोठे हिरे व्यापारी असल्याचे सांगितले जाते. लालजी पटेल यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आद्यक्षरांनी तयार केलेला सूट विकत घेतला आहे. (हे लालजी पटेल आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये कार किंवा घर भेट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांनी मोदींचा सूट ४.३ कोटींना विकत घेतला आहे)

सूरत हिरे सराफा बाजार संकुलाच्या सर्वसाधारण समितीचे सदस्य दिनेश नवादिया यांनी सांगितले की, संकुलातील सर्वच्या सर्व ४,२०० कार्यालय विकले गेले आहेत. एसडीबीमुळे किमान एक लाख लोकांना थेट रोजगार मिळणार आहे.

आणखी वाचा >> यूकेने रशियाच्या हिऱ्यांवर बंदी का घातली? हिऱ्यांच्या व्यापारात भारताची भूमिका महत्त्वाची का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसडीबीच्या समितीने राज्य सरकारकडून सदर जमीन ६२७ कोटींना विकत घेतली आणि मोर्फोजेनेसिस या कंपनीला इमारतीची संकल्पना तयार करण्याचे काम दिले; तर एसडीबीचे बांधकाम अहमदाबाद येथील पीएसपी प्रोजेक्ट्स या बांधकाम करणाऱ्या कंपनीला दिले गेले. डिसेंबर २०१७ साली बांधकामाची सुरुवात झाली आणि फक्त पाच वर्षात याचे संपूर्ण काम पूर्ण करण्यात आले. दरम्यानच्या काळात दोन वर्ष कोरोना महामारीचे होते, तरीही बांधकामाचा वेग थांबला नव्हता. या प्रकल्पाची एकूण किंमत ३,२०० कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते.

एसडीबीच्या संकुलातील इमारतींची रचना ही ‘पंचतत्व’ या संकल्पनेवर आधारित आहे. या पाच तत्त्वांमध्ये “हवा, पाणी, अग्नी, पृथ्वी आणि आकाश” यांचा समावेश होतो, असे एका समिती सदस्याने सांगितले. एसडीबी प्रकल्पाचे भूमिपजून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांनी फेब्रुवारी २०१५ रोजी केले होते.