इंद्रायणी नार्वेकर

मुंबईत अजून मोसमी पाऊस दाखल झाला नसला तरी त्याचे वेध लागले आहेत. जून महिना सरत आला तरी अद्याप मुंबईत पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र दरवर्षी हा पावसाळा मुंबई महापालिका प्रशासनाची परीक्षा घेणारा ठरतो. मुंबईची भौगोलिक रचना, अतिवृष्टी, व्यवस्थापन करणारी अनेक प्राधिकरणे अशा सगळ्यात हे आंतरराष्ट्रीय शहर ठप्प होऊ न देता सुरू ठेवण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पावसाळ्याची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष पावसाळ्यातील कामे यांचे नियोजन दरवर्षी स्वतंत्रपणे करावे लागते. या नियोजनाचा ताण पालिका प्रशासनावर असतोच, पण त्याचबरोबर या नियोजनातील अभावामुळे होणारे राजकीय भांडवल यामुळे पावसाच्या या तयारीला आर्थिक आणि राजकीय पैलूही आहेत. महापालिकेची मुदत संपल्यानंतरचा हा दुसरा पावसाळा आहे, तर शिंदे-फडणवीस सरकारची या पावसाळ्यातली पहिलीच कसोटी. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याची पालिकेची तयारी नेमकी कशी आहे, याचा आढावा…

soybean , soybean registration, soybean guaranteed rate,
सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ, तरीही दर हमीभावापेक्षा कमी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
water connections with outstanding dues
ठाणे : थकबाकी असलेल्या अडीच हजार नळ जोडण्या महापालिकेकडून खंडित
pimpri chinchwad municipal corporation administrative regime
प्रशासकीय राजवटीत विकासकामांना खीळ, पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ९०० कोटी शिल्लक; नऊ महिन्यांत केवळ ३७ टक्के रक्कम खर्च
nagpur municipal corporation launched ambitious plan to waive 80 percent of late fees on water tax bills
नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात
Panvel municipal Corporation, air pollution, year 2024
पनवेलमध्ये यंदा प्रदूषण नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा

पावसाळा हा मुंबई महापालिकेसाठी कसोटीचा का ठरतो?

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून जवळपास सव्वा कोटी लोकसंख्येचे हे शहर आहे. लोकसंख्येची प्रचंड घनता आणि त्यातच रोज कामानिमित्त येणारे लाखो नागरिक यामुळे या शहरावर अधिक ताण असतो. पाणी तुंबल्यामुळे लोकल गाड्या बंद पडल्या की शहर ठप्प होते. लाखो नागरिक एका जागी अडकून पडतात. हातावर पोट असणाऱ्या लाखोंचा रोजगार बुडतो. राज्यातील बहुतांश भागांच्या तुलनेत मुंबई आणि लगतच्या परिसरात अधिक पाऊस पडतो. दरवर्षीच्या हंगामात मुंबईच्या वाट्याला एकदा तरी अतिवृष्टीचा अनुभव येतो. या काळात झाडे पडणे, इमारतींची पडझड, पाणी तुंबणे अशा अनेक घटना घडतात. मुंबई शहर हे चहुबाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. त्यामुळे मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असतील आणि त्याच वेळी अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. मुंबईचा आकार हा अनेक ठिकाणी खोलगट बशीसारखा असल्यामुळे सखल भागांत पाणी साचते. चहुबाजूंनी समुद्र आणि खोलगट बशीसारखा आकार अशा विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे थोडासा पाऊस पडला आणि त्याच वेळी भरती असेल तर मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबते. मुंबईतील नाल्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात सोडले जाते. त्याकरिता असलेल्या १८६ पातमुखांपैकी (समुद्रात पाणी सोडण्यासाठीचे मार्ग) ४५ पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. तर १३५ पातमुख हे भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरते.

तयारी काय केली जाते?

पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते, आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, अतिक्रमण निर्मूलन विभाग, कीटकनाशक विभाग आणि आरोग्य विभाग यांना विशेष तयारी करावी लागते. नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे भरणे, पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे, आपत्कालीन परिस्थिती नागरिकांसाठी संपर्क यंत्रणा तयार ठेवणे, अन्य प्राधिकरणांशी समन्वय साधून मदत यंत्रणा तयार ठेवणे अशी अनेक पातळ्यांवरील तयारी करावी लागते. याशिवाय पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे मोहीम राबवावी लागते.

पालिका प्रशासनासमोरील अन्य आव्हाने कोणती?

मुंबईत म्हाडा, विमानतळ प्राधिकरण, रेल्वे, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी अशी अनेक प्राधिकरणे आहेत. त्यामुळे या प्राधिकरणांच्या जमिनीवरील भागात पालिकेला काम करण्यास मर्यादा आहेत. तसेच एखादी दुर्घटना घडल्यानंतर या संबंधित प्राधिकरणांशी पालिकेला समन्वय साधावा लागतो. मुंबईत अनेक ठिकाणी टेकाड्या, कडे यांच्यावर घरे बांधून लोक राहतात. या जमिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतात. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार मुंबईत २०११ मध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई शहर आणि उपनगरांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आयुक्तांना या सर्व प्राधिकरणांना निर्देश देता येतात. समन्वयापलीकडे प्रत्यक्ष मुसळधार पावसात शहराचा कारभार सुरळीत सुरू ठेवण्याचे आव्हान पालिकेलाच पेलावे लागते. त्याशिवाय एका पावसाने धुऊन निघणारे रस्ते, खड्डे हा पालिकेसाठी आणखी एक आव्हानात्मक मुद्दा ठरतो.

यंदा नवीन काय?

यंदा पालिकेने नेहमीच्या तयारीबरोबरच संपर्क यंत्रणेवर अधिक भर दिला आहे. महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. करोनाकाळात जसे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते तसेच ते यंदा पावसाळ्यासाठी करण्यात आले आहेत. या प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. यासोबतच बिनतारी यंत्रणा व चार हॉट लाइन्सदेखील प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या हॉट लाइन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय साहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी ‘आयफ्लोज’ ही अत्याधुनिक प्रणाली मुंबई महापालिकेने आणली आहे. त्यामुळे ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देता येणार आहे. यंदा पावसाळ्यात नागरिकांना धोक्याचा इशारा देणारे मेसेज पाठवण्यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएच्या ‘सचेत’ या ॲपचा वापर करण्याचे ठरवले आहे.

पावसाळ्याची तयारी खरोखरच पूर्ण झाली आहे का?

शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलेला असला तरी अनेक ठिकाणी नाल्यावर कचरा तरंगत असल्यामुळे नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी यंदाही नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पाहणीनंतर नालेसफाई योग्य रीतीने झाली नसल्याचा आरोप केला आहे. पश्चिम उपनगरांतील दूरगामी पावसाळी कामे अद्याप पूर्ण न झाल्यामुळे तिथेही अनेक ठिकाणी यंदा पाणी भरू शकते अशी शक्यता प्रशासनानेच व्यक्त केली आहे. चौपाट्यांवर जीवरक्षक नेमलेले असले तरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच चार बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत जीवरक्षक कमी असतात. त्यामुळे प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पालिकेच्या पावसाळ्याच्या तयारीबाबत प्रश्नांचा पाऊस सुरू झाला आहे.

Story img Loader