एका वर्षाच्या कालावधीत एक माणूस सरासरी किती मलमूत्र बाहेर टाकतो माहितीये का? एक माणूस वर्षाला जवळपास ५०० किलो वजनाची लघुशंका आणि ५० किलोच्या आसपासची विष्ठा निर्माण करतो. हेच गणित आठ अब्ज लोकसंख्येच्या बाबत लावायचे झाल्यास, विष्ठेचा डोंगर उभा राहील आणि लघुशंकेची नदी वाहू लागेल. जगातील बऱ्याच ठिकाणी मलमूत्रावर प्रक्रिया होत नाही. कमी लोकसंख्या असलेल्या गावात किंवा छोट्या शहरात मलमूत्र जवळच्या जलस्रोतांत सोडले जाते. त्यातून पाणी दूषित होते. प्राचीन काळात मानवी मलमूत्राचा वापर शेतीसाठी होत असल्याची अनेक उदाहरणे आढळली आहेत. जगभरात सध्या मलमूत्रावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणारे प्रकल्प सुरू झाले आहेत.

पॅरीसमध्ये मानवी मलमूत्राचा शेतीसाठी वापर करण्याचा एक प्रयोग करण्यात आला आहे. पर्यावरणासंबंधी संशोधन करणाऱ्या लिसू (leesu) नावाच्या प्रयोगशाळेत लघुशंकेवर आधारित खत तयार करण्याचा सकारात्मक प्रयोग करण्यात आला. हे खत गहू पिकासाठी वापरण्यात आले. कृत्रिम खते वापरून जेवढे उत्पादन घेता येते, तेवढेच उत्पादन अशा प्रकारचे खत वापरल्यानंतर झाल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. कृत्रिम खते ही फॉस्फेट किंवा नैसर्गिक वायूचा वापर करून तयार केली जातात. दुसऱ्या बाजूला मानवी मलमूत्राचा खत म्हणून वापर केल्यास त्यात कार्बनचे प्रमाण अतिशय कमी असतेच, त्याशिवाय सेंद्रिय पद्धतीने मातीचा पोत सुधारण्यासही मदत होते.

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज

आपण रोज निर्माण करत असलेले मलमूत्र पर्यावरणासाठी किती फायदेशीर ठरेल, हे आताच सांगणे कठीण आहे. तसेच मानवी मलमूत्राच्या खताचा वापर करून उत्पादित केलेला शेतमाल विकला जाईल का? हादेखील एक प्रश्न आहेच. याबाबतीत आपण अतिसंवेदनशील आहोत का?

हे वाचा >> सेंद्रिय शेती का ढेपाळते आहे?

शेतीसाठी मानवी विष्ठेचा वापर नवीन नाही

प्राचीन काळात मानवी मलमूत्राचे महत्त्व त्या वेळच्या लोकांना माहीत होते. मानवी लघुशंका आणि विष्ठेत अनेक पोषक घटक असल्याची माहिती त्या काळच्या लोकांना होती. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअमसारखे घटक होते, जे पिकांच्या वाढीस पोषक होते.

विज्ञान पत्रकार लीना झेल्डोविक यांनी सोळा ते अठराव्या शतकातील जपानमधील जीवनाचे संशोधन करून ‘द अदर डार्क मॅटर’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी ‘नाईट सॉईल’ प्रकारच्या मातीचा व्यापार होत असल्याचा उल्लेख केला आहे. खडकाळ आणि नापीक जमिनीवर ही माती पसरवली जात असे. चीनमध्ये तर अजबच गोष्ट होत होती. मलमूत्र खत वापरून उत्पादित केलेल्या शेतमालाची श्रीमंतांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असे. उच्च पोषक द्रव्ये देऊन उत्पादित केलेला माल चांगला असल्याची त्यांची समजूत होती. पण १९ व्या शतकात गोष्टी बदलत गेल्या. झेल्डोविक म्हणाल्या की, सांडपाण्याच्या व्यवस्थेत झालेला आधुनिक बदल आणि कृत्रिम खतांच्या शोधामुळे निसर्गचक्र बिघडले.

आपण शहरात राहायला लागलो. आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलो, त्यानंतर आपण एक रोचक समस्या निर्माण केली असल्याचेही झेल्डोविक यांनी सांगितले. आपण एका ठिकाणी शेतमाल पिकवतो आणि दूरवरच्या ठिकाणी त्याची विक्री करतो, म्हणजे त्याचा उपभोग दूरच्या ठिकाणी घेतला जातो. मानवी मलमूत्रातून बाहेर पडणारी पोषक द्रव्ये शेतात न परतता ती जवळच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात किंवा जलस्रोतात (नदी, तलाव) जातात. ही धोकादायक आणि गंभीर बाब आहे. तलाव किंवा नदीत मलमूत्र सोडले गेल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या अळ्या मासे आणि वनस्पती प्रजातीसाठी घातक असतात. यूएसमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तेथील ६५ टक्के नदीमुख (नदी जिथे समुद्राला मिळते) आणि किनाऱ्यालगतचे पाणी दूषित झालेले आढळते.

कोणत्या ठिकाणी मानवी मलमूत्राचा पुनर्वापर केला जातो?

जगात फक्त पॅरीस येथेच मलमूत्राचा चांगला पुनर्वापर करण्याचा प्रयोग होतोय असे नाही. उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेतही अशाच प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. अमेरिकेच्या व्हेरमाँट येथे रिच अर्थ इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला. ज्यामध्ये, २०२१ साली १८० लोकांनी शेतीसाठी आपले मूत्र दान केले होते.

केनियामध्ये सॅनिव्हेशन या स्टार्टअपने घनकचऱ्यापासून औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी असलेल्या गॅसची निर्मिती केली. झाडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याऐवजी सॅनिव्हेशनने हा एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दुधावर प्रक्रिया करणारे आणि कापड उद्योगातील उत्पादक सॅनिव्हेशनचे क्लायंट आहेत. सॅनिव्हेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१८ पासून आतापर्यंत त्यांनी दोन हजार टन इंधनक्षम गोवऱ्या विकल्या आहेत.

हे वाचा >> विश्लेषण : सेंद्रिय शेतीची झेप कुठवर ?

याचप्रमाणे स्विडिश कंपनी सॅनिटेशन ३६० या कंपनीने मानवी लघुशंकेच्या पॅलेट्स (गोवऱ्या) तयार करून मानवी मलमूत्राची सांगड चक्राकार अर्थव्यवस्थेशी घालून दिली आहे. यूकेमधील डरहम विद्यापीठातील अर्बन सॅनिटेशनचे प्राध्यापक कॉलिन मॅकफार्लेन यांनी सांगितले की, मानवी मलमूत्रावर प्रक्रिया करण्यासाठी जेवढ्या प्रमाणात पायाभूत सुविधा असायला हव्यात, त्याची आपल्याकडे अजूनही कमतरता आहे. मानवी मलमूत्र याचा पुनर्वापर होऊ शकतो आणि त्याच्याकडे संसाधन म्हणून पाहिले जाऊ शकते, या शक्यतेकडे आपण अजूनही पाहिलेले नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

विष्ठा निषिद्ध मानणे ही एक समस्या

मलमूत्राला आपल्याकडे निषिद्ध किंवा वाईट मानले गेले असल्यामुळे त्याचा पुनर्वापरासाठी स्वीकार होत नाही. संशोधन सांगते की, मलमूत्राचा पुनर्वापर करण्यासाठी सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अडचणी आपल्यासमोर उभ्या आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मलमूत्राधारित खत वापरण्यास मोठा अडथळा आहे. लोकांना वाटते, मलमूत्रावर आधारित असलेले खत हे आरोग्यास हितकारक नाही, मानवी विष्ठेत रोगजनक जिवाणू असल्याचा अनेकांचा समज आहे, अशी एक समस्या संशोधकांच्या लक्षात आली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, आपण किती दिवस पिण्याच्या पाण्यात मानवी मलमूत्र सोडणार आहोत? कधीतरी हे बंद करून मलमूत्रासारख्या संसाधनाचा आपल्याला पुनर्वापर करावा लागणार आहे.

Story img Loader