भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. नुकतेच चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर मॉड्युल मुख्य अंतराळयानापासून (प्रोपल्शन मॉड्युल) वेगळेसुद्धा झाले. लवकरच ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम उतरण्याचा विक्रम चांद्रयान-३ करणार असतानाच रशियाचे ‘लुना-२५’ हा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. २००८ साली रशियाने भारताकडे चांद्रयान मोहिमेसाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि भारताने ती मान्यदेखील केली होती. परंतु, २०२३ मध्ये चांद्रयान-३ दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या आधी रशियाचे ‘लुना-२५’ उतरणार आहे. त्यामुळे ‘लुना-२५’ यानाची तेवढीच चर्चा सुरू आहे. ही दोन्ही याने चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहेत. चांद्रयान-३ आणि लुना-२५ मध्ये असणारी ही स्पर्धा नक्की काय आहे? दोन्ही यानांमध्ये कोणते फरक-साम्य आहेत, ते जाणून घेऊया…
रशियाचे लुना-२५ आणि भारताचे चांद्रयान-३ ही दोन्ही याने सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांच्या फरकाने ही दोन्ही याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरणार आहेत. लुना-२५ हे २१ ऑगस्ट; तर भारताचे चांद्रयान-३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आतापर्यंत एकही अंतराळयान उतरू शकलेले नाही. मात्र, लुना-२५ आणि चांद्रायान-३ ही दोन्ही याने याच दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत.

चांद्रयान-३ आणि लुना-२५ ची प्रगती

१९ ऑगस्टपर्यंत, चांद्रयान-३चे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्रापासून १५७ किमी दूर आहे. दुसरीकडे, १६ ऑगस्टच्या आसपास चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी लुना-२५ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची तयारी करत आहे. १९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार लुना-२५ ला चंद्रावर उतरण्यासाठी काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. शुक्रवार, दि. १८ ऑगस्ट रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सांगितले की, नियोजित ‘डीबूस्टिंग’ शेड्यूलनुसार चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल यशस्वीरित्या उतरले आहे. तसेच, रशियाचे ‘लुना-२५’ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे.
२३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, तर दोन दिवस आधी लुना-२५ दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यामुळे या दोन्ही यानांमध्ये एकप्रकारे शर्यत आहे. शुक्रवारी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने सांगितले की, चांद्रयान -३ चे लँडर मॉड्यूल नियोजित ‘डीबूस्टिंग’ शेड्यूलनुसार यशस्वीरित्या उतरले.१७ ऑगस्ट रोजी, विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले, असे इस्रोने म्हटले आहे. त्या तुलनेत, रशियाची चंद्र मोहीम, लुना-२५, १६ ऑगस्ट रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचली, असे रशियन अंतराळ एजन्सी (Roscosmos) च्या निवेदनात म्हटले आहे. रशियन अंतराळ एजन्सी (Roscosmos) च्या मते, रशियन अंतराळयान सोमवार, दि. २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे, म्हणजेच चांद्रयान-३ च्या दोन दिवस आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरेल.

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन


चांद्रयान-३ आणि लुना-२५ विषयी थोडक्यात…

चांद्रयान-३ दि. १४ जुलै रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते, तर रशियाने ११ ऑगस्ट रोजी सोयुझ 2.1v रॉकेटवर रशियाच्या व्होस्टोचनी स्पेसपोर्टवरून आपले अंतराळ यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.चांद्रयान-३ च्या ३८ दिवसांच्या तुलनेत लुना-२५ सोमवारी १० दिवसांत प्रवास पूर्ण करेल.याचे कारण म्हणजे लुना-२५ हे चांद्रयान-३ पेक्षा चंद्राकडे अधिक थेट प्रक्षेपण घेत आहे. लुना-२५ चे वजन फक्त १,७५० किलोग्रॅम आहे, जे चांद्रयान-३ च्या ३,८०० किलोग्रॅमपेक्षा लक्षणीयरित्या हलके आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, हे कमी वस्तुमान ‘लुना-२५’ अधिक प्रभावीपणे गती देत आहे. १८ ऑगस्ट रोजी, रशियाच्या लुना-२५ अंतराळयानाने आपली कक्षा समायोजित केली. कारण, ते २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ प्रथम लँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, असे रोसकॉसमॉसने सांगितले.

चांद्रयान-३ आणि लुना-२५ यांचे ‘लँडिंग स्पॉट्स’

भारताचे चांद्रयान-३ आणि रशियाचे लुना-२५ ही दोन्ही याने चंद्राच्या दक्षिण भागावर उतरण्याची तयारी करत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत एकदाही एकही यान गेलेले नाही. चांद्रयान-३ साठी निवडलेले ठिकाण सुमारे ८६ अंश दक्षिण अक्षांश आहे, तर लुना २५ ची जागा ७०-अंश दक्षिणेच्या जवळ आहे. चांद्रयान-३ आणि लुना-२५ ही दोन अंतराळयाने दोन दिवसांच्या फरकाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहेत. मात्र, या दोन्ही यानांचे उतरण्याचे नेमके ठिकाण सारखे नाही. चांद्रयान-३ चे उतरण्याचे ठिकाण हे ८६ अंश दक्षिण अक्षांश आहे; तर लुना-२५ हे दक्षिणेच्या ७० अंशावर उतरणार आहे. ही दोन्ही याने एकमेकांपासून खूप दूर असतील. आतापर्यंतची याने चंद्रावरील विषृवत्तीय प्रदेशात उतरलेली आहेत. या दोन्ही यानांमध्ये प्रत्यक्ष शेकडो किलोमीटरचे अंतर असणार आहे.

‘स्पेस रेस’

चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान असणार होते किंवा अजूनही शक्यता आहे. तथापि, लूना-२५ च्या वेगवान प्रक्षेपणामुळे ते चांद्रयान-३ च्या आधी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकेल, अशी अटकळ पसरली आहे. त्यांच्या लँडिंग तारखांमध्ये खूप समीपता आहे. लुना २५ साठी २१-२३ ऑगस्ट आणि चांद्रयान -३ साठी २३-२४ ऑगस्ट या अपेक्षित तारखा आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवामध्ये वाढलेले स्वारस्य तेथील संभाव्य जलस्रोतांमुळे आणि भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांमुळे आहे. तुलनेने न शोधलेला प्रदेश हा भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी महत्त्वाचे आहेत. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या आगामी आर्टेमिस-III मिशनचेही उद्दिष्ट चंद्राच्या अप्रकाशित भागावरील संशोधन हेच आहे, तसेच त्यांचे लक्ष्य पाच दशकांच्या अंतरानंतर मानवांना चंद्रावर नेण्याचे आहे.अंतिमतः
भारत किंवा रशिया या दोहोंपैकी जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करतील ते ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असे करणारे पहिले देश बनतील. त्यामुळे जगाचे लक्ष या दोन्ही चांद्रमोहिमांकडे आहे.

Story img Loader