भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. नुकतेच चांद्रयान-३ मोहिमेतील लँडर मॉड्युल मुख्य अंतराळयानापासून (प्रोपल्शन मॉड्युल) वेगळेसुद्धा झाले. लवकरच ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम उतरण्याचा विक्रम चांद्रयान-३ करणार असतानाच रशियाचे ‘लुना-२५’ हा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. २००८ साली रशियाने भारताकडे चांद्रयान मोहिमेसाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि भारताने ती मान्यदेखील केली होती. परंतु, २०२३ मध्ये चांद्रयान-३ दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या आधी रशियाचे ‘लुना-२५’ उतरणार आहे. त्यामुळे ‘लुना-२५’ यानाची तेवढीच चर्चा सुरू आहे. ही दोन्ही याने चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहेत. चांद्रयान-३ आणि लुना-२५ मध्ये असणारी ही स्पर्धा नक्की काय आहे? दोन्ही यानांमध्ये कोणते फरक-साम्य आहेत, ते जाणून घेऊया…
रशियाचे लुना-२५ आणि भारताचे चांद्रयान-३ ही दोन्ही याने सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांच्या फरकाने ही दोन्ही याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरणार आहेत. लुना-२५ हे २१ ऑगस्ट; तर भारताचे चांद्रयान-३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आतापर्यंत एकही अंतराळयान उतरू शकलेले नाही. मात्र, लुना-२५ आणि चांद्रायान-३ ही दोन्ही याने याच दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा