यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार इराणमधील सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. महिलांवर होणाऱ्या दडपशाहीविरोधात त्या गेल्या ३२ वर्षांपासून लढा देत आहेत. त्यासाठी चाबकाचे फटके आणि वारंवार तुरुंगवास अशी मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे आणि चुकवत आहेत. आताही त्या तेहरानमधील एव्हिन तुरुंगात १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत, त्यामुळे नर्गिस यांना हा पुरस्कार स्वीकारू शकणार नाहीत, असा खडतर प्रवास करणाऱ्या नर्गिस आणि इराणमधील महिला करत असलेला संघर्ष जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कार जाहीर होतात. या वर्षीचं शांततेचं नोबेल नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात येणार आहे. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. इराणमधील महिलांसाठी कार्य करणाऱ्या नर्गिस या माहसा हिच्या मृत्यूप्रकरणामुळे जागतिक पटलावर आल्या. माहसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीने व्यवस्थित डोके-चेहरा न झाकल्यामुळे तिला पोलिसांनी मारहाण केली आणि त्यांच्या कोठडीतच तिचा मृत्यू झाला. १६ सप्टेंबर, २०२२ ला घडलेल्या या घटनेमुळे इराणमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, मानवी हक्क हे विषय चर्चेत आले. इराणमध्ये धर्म, परंपरा आणि सामाजिक चालीरितींखाली महिलांवर केला जाणारा अत्याचार थांबावा यासाठी नर्गिस मोहम्मद लहानणापासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी गेल्या २५ वर्षांमध्ये १३ वेळा तुरुंगवास, एकूण ३१ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि चाबकाचे १५४ फटके खावे लागले.
इराणसारख्या चालीरीतींना, धर्माला उच्च स्थान असणाऱ्या देशामध्ये राहून लढा देणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर बंदी घालण्यात आली. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. वारंवार शिक्षा करण्यात आली. तरीही त्यांनी कायम “Women will not give up. We are fuelled by a will to survive, whether we are inside prison or outside” ही भूमिका घेतली.

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

नर्गिस यांची भूमिका

नर्गिस यांना शांततेचं नोबेल जाहीर झाल्यावर त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांना मिळाल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा “Women will not give up. We are fuelled by a will to survive, whether we are inside prison or outside” हे वाक्य पोस्ट करण्यात आले. महिला कधीच हार मानणार नाहीत. तुरुंगात असो किंवा तुरुंगाच्या बाहेर जगण्याची इच्छा लढण्याची ताकद देते, असा या वाक्याचा अर्थ आहे. नर्गिस यांनी आयुष्यभर इराणमधील महिलांसाठी घेतलेली भूमिका या वाक्यातून दिसते. इराणमधील पुरुषसत्ताक पद्धतीविरुद्ध ठामपणे लढा देण्याची ताकद या वाक्यामध्ये आहे. हे वाक्य इराणमधील महिलांना प्रेरणा देणारं तसंच नर्गिस यांनी आजवर अविरत केलेलं कार्य स्पष्ट करणारं आहे.

कोण आहेत नर्गिस मोहम्मदी ?

नर्गिस यांचा जन्म १९७२ मध्ये राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या कुटुंबामध्ये झाला. धार्मिक वादावर इराणमध्ये झालेल्या क्रांतीमध्ये नर्गिस यांच्या कुटुंबीयांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. २०२३ मध्ये न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये सहभाग का घेतला, याची कारणे सांगितली. त्या लहान असताना त्यांच्या आई आणि भावाला अटक करण्यात आली होती. नर्गिस यांना एक दिवस त्यांना तुरुंगामध्ये भेटण्यास परवानगी देण्यात आली. त्या भेटीनंतर काही दिवसात त्यांच्या आई-भावाला फाशी झाल्याची बातमी त्यांनी पाहिली. या आठवणींमुळे त्या अस्वस्थ झाल्या होत्या. १९९० च्या काळात अभियंता म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी वृत्तपत्रातून लिखाण सुरू केले. २००३ मध्ये तेहरानमधील मानवी हक्कांशी संदर्भित कार्य करणाऱ्या लोकांशी त्या जोडल्या गेल्या. नर्गिस मोहम्मदी या इराणमधील डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर या एनजीओच्या उपाध्यक्ष आहेत. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या इराणमधील पहिल्या महिला शिरीन इबादी यांनी ही एनजीओ स्थापन केली आहे. मानवाधिकार आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या एनजीओवर सध्या इराणने बंदी घातली आहे.

नर्गिस यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची ही पहिली वेळ नाही. २०११ मध्येही त्यांना तुरुंगवास झालेला होता. नोबेल समितीने म्हटल्यानुसार, नर्गिस यांना २५ वर्षांत १३ वेळा अटक करण्यात आली, पाच वेळा दोषी ठरवण्यात आले, एकूण ३१ वर्षांचा तुरुंगवास सहन करावा लागला आणि १५४ चाबकाचे फटकेही खावे लागले.
माहसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीने व्यवस्थित डोके-चेहरा न झाकल्यामुळे तिला पोलिसांनी मारहाण केली आणि त्यांच्या कोठडीतच तिचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला घडली होती. त्यानंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने उसळली. ही निदर्शने चिरडून टाकण्यासाठी हुकुमशाही राजवटीने ताकदीचा क्रूर वापर केला. त्यामध्ये ५०० हून अधिक लोकांनी जीव गमावला, तर २२ हजारांपेक्षा जास्त लोकांना विविध तुरुंगांमध्ये डांबले. या निदर्शनांमध्ये हौतात्म्य पत्करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींचा समावेश होता. यावरच आधारित ‘व्हाइट टॉर्चर’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

इराणमधील हक्कांसाठी महिलांना करावा लागलेला संघर्ष

१६ सप्टेंबर, २०२२ मध्ये माहसा अमिनी हिच्या मृत्यूमुळे इराणमधील महिलांचा संघर्ष जागतिक पातळीवर आला. या मृत्यूनंतर अनेक आंदोलनं झाली, हिंसाचार झाले. या सर्व निदर्शनांचे नेतृत्व नर्गिस करत होत्या. अनेक महिलांनी बुरखे काढून टाकले.
इराणमधील नियमांनुसार इस्लाम धर्मीय स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना हिजाब परिधान करणे अनिवार्य आहे. हिजाब घालताना सर्व केस, चेहरा पूर्णपणे झाकला गेला पाहिजे, असा नियम आहे. परंतु, आताच्या काळात महिलांना हे निराधार नियम मान्य नाहीत. सैलसर हिजाब किंवा हिजाब न घालणे ही जीवनपद्धती त्यांनी स्वीकारलेली आहे. आधुनिकतेचा स्वीकार केल्यामुळे पुराणमतावाद्यांच्या अहंकाराला धक्का पोहोचला. याचेच परिवर्तन माहसा अमिनी हिला झालेल्या शिक्षेत दिसते. त्यात तिचा मृत्यही झाला. या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये महिलांनी ‘आमच्या बहिणींना मारले, तर आम्हीही तुम्हाला मारू’ अशा घोषणा दिल्या .

डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटरची स्थापना करणाऱ्या शिरीन एबादी यांनीदेखील या धार्मिक चालीरीतींविरोधात युक्तिवाद केला होता. त्या म्हणाल्या की, इराणमध्ये स्त्रीवादी चळवळ अधिक मजबूत होत आहे. कारण, महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. विद्यापीठांमध्येही ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी या महिला आहेत. महिलांनी अनेक वेळा हिजाब आणि तत्सम प्रथांना विरोध केला. अयातुल्ला खोमेनी यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याच वर्षी ७ मार्च रोजी महिलांसाठी हिजाब अनिवार्य असेल, अशी घोषणा केली. दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाविरोधात आंदोलने करण्यात आली. पुढे सप्टेंबर महिन्यात माहसा अमिनी त्याचा प्रमुख बळी ठरली.
सुसान मेयबुद यांने २०२२ मध्ये सादर केलेल्या प्रेस रिपोर्टमध्ये हिजाबविरोधातील ही मोठी चळवळ असल्याचे म्हटले. ही चळवळ केवळ हिजाबपुरती मर्यादित नसून मानवी हक्कांसाठी आहे, असेही त्याने नमूद केले. परंतु, नर्गिस यांनी इराणला महिला चळवळींचा इतिहास असल्याचे स्पष्ट केले. आजवर अनेक वेळा हक्कांसाठी लढा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या कार्यासाठी नर्गिस अविरत लढत आहेत. आपले स्वातंत्र्य, आरोग्य आणि अगदी जीवनसुद्धा धोक्यात टाकून स्वतःच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सर्व महिलांना हा सन्मान आहे, अशा प्रतिक्रिया नर्गिस यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कारावर उमटल्या आहेत.