– अन्वय सावंत

मुंबईचा तडाखेबंद सलामीवीर पृथ्वी शॉ याने आपल्यातील असाधारण प्रतिभेचा पुन्हा एकदा दाखला देताना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आसामविरुद्धच्या सामन्यात त्रिशतकी खेळी केली. त्याने डावाच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना ३८३ चेंडूंत ३७९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. काही वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात होते. २०१८ साली वयाच्या १८व्या वर्षी पृथ्वीला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती आणि विंडीजविरुद्ध त्याने पहिल्याच डावात शतक साकारले होते. मात्र त्यानंतर कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश, दुखापती आणि मैदानाबाहेरील अन्य काही कारणांमुळे पृथ्वीने भारतीय संघातील स्थान गमावले; परंतु आसामविरुद्धच्या त्रिशतकामुळे पृथ्वीने सर्वांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधले आहे. त्याच्यासाठी आता भारतीय संघाची दारे पुन्हा खुली होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

आसामविरुद्धची खेळी का ठरली महत्त्वाची?

पृथ्वीला यंदाच्या रणजी हंगामाची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. त्याला पहिल्या सात डावांमध्ये २२.८५च्या सरासरीने केवळ १६० धावा करता आल्या होत्या. तसेच त्याच्या नावावर केवळ एक अर्धशतक होते. मात्र, आसामविरुद्धच्या लढतीत पृथ्वीला पुन्हा सूर गवसला. गुवाहाटी येथील अमिनगाव क्रिकेट मैदानाच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर पृथ्वीने आक्रमक शैलीत खेळ करताना आसामच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याने कट, कव्हर ड्राइव्ह आणि पूलचे उत्कृष्ट फटके मारले. सुरुवातीला त्याने मैदानी फटक्यांवर अधिक भर दिला. त्याने पहिल्या दिवशी केलेल्या नाबाद २४० धावांच्या खेळीत केवळ एका षटकाराचा समावेश होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने धावांची गती अधिक वाढवली आणि अधिक मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने चौफेर फटकेबाजी करताना आपल्या ३७९ धावांच्या खेळीत ४९ चाैकार व ४ षटकार मारले. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिलेच त्रिशतक ठरले.

त्रिशतकी खेळीदरम्यान पृथ्वीने कोणते विक्रम रचले?

पृथ्वीने केलेली ३७९ धावांची खेळी ही रणजी करंडक स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. यापूर्वी १९४८-४९च्या हंगामात भाऊसाहेब निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना काठियावाड संघाविरुद्ध नाबाद ४४३ धावांची खेळी साकारली होती. मात्र, मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पृथ्वीने आपल्या नावे केला. त्याने संजय मांजरेकर (३७७ धावा वि. हैदराबाद, १९९१) यांना मागे टाकले. तसेच रणजी करंडकात त्रिशतक, विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत द्विशतक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत शतक साकारणारा पृथ्वी हा पहिलाच फलंदाज ठरला.

पृथ्वीने यंदाच्या हंगामात कशी कामगिरी केली आहे?

पृथ्वीने यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात चांगली कामगिरी केली आहे. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या सात सामन्यांत त्याने २१७ धावा केल्या. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने चमक दाखवली होती. त्याने या स्पर्धेच्या १० सामन्यांत ३६.८८च्या सरासरीने आणि १८१.४२च्या उत्कृष्ट धावगतीने ३३२ धावा केल्या होत्या. यात प्रत्येकी एका शतक व अर्धशतकाचा समावेश होता. त्यापूर्वी ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात पृथ्वीने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना १० सामन्यांत १५२च्या धावगतीने २८३ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे भारताच्या ट्वेन्टी-२० संघासाठी पृथ्वीचे नाव चर्चेत होते. मात्र, त्याला संधी मिळाली नाही.

पृथ्वी भारतीय संघाबाहेर जाण्याची कारणे काय?

पृथ्वीने शालेय क्रिकेट, मुंबईचे विविध वयोगटांतील क्रिकेट, भारताचा १९ वर्षांखालील संघ, मुंबईचा वरिष्ठ संघ, ‘आयपीएल’ आणि भारताचा वरिष्ठ संघ हे टप्पे झटपट पार केले. त्याला वयाच्या १८व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याने भारतीय संघापर्यंतचा प्रवास जितका झटपट पार केला, तितक्याच वेगाने तो भारतीय संघाबाहेरही गेला. आक्रमक शैलीत खेळ करणारा पृथ्वी काही वेळा चुकीचे फटके मारणार, लवकर बाद होणार हे स्वाभाविकच आहे; परंतु पृथ्वी एकच चूक वारंवार करतो, तो आपल्या कारकीर्दीबाबत गंभीर नाही, असे अनेकदा म्हटले जाते. त्याचे फलंदाजीचे तंत्र आणि त्याची मानसिकता यावर बरेचदा टीका झाली आहे. त्यामुळे असाधारण प्रतिभा असूनही पृथ्वी भारतासाठी आतापर्यंत केवळ पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा : आसामविरुद्ध दमदार द्विशतक झळकावून पृथ्वी शॉने बीसीसीआयला लगावली सणसणीत चपराक

पृथ्वीला आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी का वाट पाहावी लागते आहे?

पृथ्वीने कामगिरीत सातत्य राखल्यास त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे खुली होऊ शकतील. डावाच्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्याची पृथ्वीमध्ये क्षमता आहे आणि हीच गोष्ट त्याला इतर सलामीवीरांपेक्षा वेगळा बनवते. मात्र, भारताकडे सध्या कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल (क्रिकेटचे तीनही प्रकार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड (मर्यादित षटकांचे क्रिकेट) आणि अभिमन्यू ईश्वरन (कसोटी) यांसारखे सलामीवीरांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पृथ्वीला भारतीय संघात पुनरागमनासाठी वाट पाहावी लागते आहे.

Story img Loader