दिल्लीत लोकसभेच्या केवळ सात जागा असल्या तरी येथील निकालांची चर्चा देशभर होते. देशभरातून नागरिक येथे वास्तव्यास असल्याने दिल्लीतील निकालाला महत्त्व असते. गेल्या दोन म्हणजेच २०१४ तसेच २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्व सात जागा जिंकल्या. गेल्या वेळी तर भाजपने सर्व सातही जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून यश प्राप्त केले. विधानसभेत आपने यश मिळवले तरी, लोकसभेला भाजपनेच बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाने (आप) आघाडी करत भाजपला आव्हान दिले. त्यामुळे दिल्लीतील निकालाबाबत उत्सुकता आहे. 

केजरीवाल विरुद्ध भाजप

दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजप असाच सामना गेल्या काही महिन्यांपासून रंगला आहे. दिल्लीतील मद्य धोरणावरून आम आदमी पक्षाचे बडे नेते कारागृहात आहेत. केजरीवाल यांनाही प्रचारासाठी जामीन मिळाला. त्यातच पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सहकाऱ्याकडून मारहाणीच्या आरोपाचा मुद्दा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गाजला. केजरीवाल यांनी या प्रकरणावर मौन बाळगल्याने भाजपला आयती संधी मिळाली. तरीही दिल्लीत केजरीवाल यांना टक्कर देईल असा स्थानिक नेता भाजपकडे नाही. वीरेंद्र सचदेवा, मनोज तिवारी यांचे नेतृत्त्व दिल्लीतील ठरावीक भागापुरते आहे. बृहत दिल्लीत जनाधार असलेल्या नेतृत्वाची उणीव पक्षाला भासते. मदनलाल खुराना, साहिबसिंह वर्मा, विजयकुमार मल्होत्रा असे नेते भाजपने दिल्लीतून राष्ट्रीय राजकारणात दिले. मात्र आता पक्ष दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून आहे. या लोकसभा निवडणुकीत अटकेमुळे केजरीवाल यांना सहानुभूती मिळणार काय, हा प्रश्नच आहे. त्यामुळे भाजप धास्तावलेला आहे. भाजपचे प्रमुख नेते दररोज पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्यावर टीकेची संधी सोडत नाहीत. केजरीवाल हेदेखील पंतप्रधान मोदींना सातत्याने लक्ष्य करतात. स्थानिक नेत्यांचे ते फारसे नावही घेत नाहीत. थोडक्यात मोदींबरोबरच आपलाच सामना आहे हे त्यांना ठसवायचे आहे. यातून प्रचारात कटुता वाढली.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Image of protesters at the MCG
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटीत खलिस्तान्यांचा राडा, भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

हेही वाचा >>>विश्लेषण: रेल्वेचे मालवाहतुकीच्या खासगीकरणाचे धोरण काय?

भाजपकडून उमेदवार बदल

भाजपने पूर्वीच्या सात खासदारांपैकी केवळ मनोज तिवारी यांनाच पुन्हा संधी दिली. उर्वरित सहा जागांवर नवे उमेदवार दिले. विद्यमान खासदारांबाबत नाराजीचा फटका बसू नये म्हणून पक्षाने हे बदल केले.  पूर्व दिल्लीत पक्ष संघटनेत कार्यरत असलेले हर्ष मल्होत्रा यांना संधी दिली. त्यांचा सामना येथे आपचे कुलदीप कुमार यांच्याशी आहे. या मतदारसंघाचे स्वरूप पाहता भाजप ही जागा राखेल असे चित्र आहे. दक्षिण दिल्लीत भाजपने ७१ वर्षीय रामवीर सिंह बिधुरी यांना संधी दिली. त्यांची लढत आपचे सहीराम पेहेलवान यांच्याशी आहे. हे दोन्ही उमेदवार गुर्जर समुदायातील आहेत. हे दोघेही आमदार आहेत. दाट लोकसंख्या हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य. एकीकडे श्रीमंतांच्या वसाहती, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची वस्ती तसेच झोपडपट्टीचा भागही येथे मोठ्या संख्येने येतो. त्यामुळे येथील नेमका अंदाज वर्तवता येत नाही. 

विरोधकांना विजयाची आशा

पश्चिम दिल्ली मतदारसंघात आम आदमी पक्षाचे नेते महाबळ मिश्रा हे निवडणूक लढवत आहेत.  त्यांच्या विरोधात भाजपने कमलजीत सेहरावत यांना उमेदवारी दिली. मिश्रा हे दिल्लीच्या राजकारणात मुरब्बी मानले जातात. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्या तुलनेत भाजपच्या उमेदवार या नगरसेविका आहेत. दिल्ली महापालिकेतीलच कामाचा त्यांना अनुभव आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ७० वर्षीय मिश्रा यांनी २००९ मध्ये येथून विजय मिळवला असून, प्रामुख्याने या मतदारसंघात पारंपरिक शेती तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत. मिश्रा हे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील आहेत. या मतदारसंघातील सर्व दहा आमदार आम आदमी पक्षाचे आहेत. त्यामुळेच विरोधकांना या मतदारसंघात अपेक्षा आहेत.

हेही वाचा >>>Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवता येईल का?

लक्ष्यवेधी लढती

राजधानी दिल्लीतील सर्वात कमी मतदार असलेल्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या बांसुरी स्वराज यांच्या विरोधात सोमनाथ भारती हे आपचे ज्येष्ठ नेते रिंगणात आहेत. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ दिल्लीतील अन्य सहा जागांच्या तुलनेत नियोजनबद्ध विकास झालेला भाग म्हणून ओळखला जातो. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी या राजकारणात या लोकसभा निवडणुकीद्वारे प्रवेश करत आहेत. मालवीय नगर विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार झालेला सोमनाथ भारती यांच्यासारखा अनुभवी नेता त्यांच्या समोर आहे. मतदारसंघाचे स्वरूप पाहता गेल्या दोन निवडणुकीत भाजपने मोठा विजय येथून मिळवला आहे. 

दिल्लीत सर्वाधिक प्रतिष्ठेची झुंज ईशान्य दिल्ली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. हा राजधानीतील सर्वात मोठा मतदारसंघ. खासदार मनोज तिवारी यांना भाजपने पुन्हा संधी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रसचे कन्हैयाकुमार हे निवडणूक लढवत आहेत. दोघेही पूर्वांचली असून, त्यांच्यातील ही लढत दोन्ही पक्षासाठी तितकीच महत्त्वाची आहे. कन्हैयाकुमार हे काँग्रेस श्रेष्ठींचे उमेदवार मानले जातात. तर तिवारी हे दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष असून, अरविंद केजरीवाल यांचे कडवे विरोधक मानले जातात. विद्यार्थी नेते अशी कन्हैयाकुमार यांची ओळख. भारतीय कम्युनिस्ट पक्षातून ते काँग्रेसमध्ये आले. त्यांच्या उमेदवारीला पक्षाच्या काही नेत्यांनी विरोध केला. त्यातूनच दिल्लीचे माजी अध्यक्ष अरविंदसिंग लवली यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मानले जाते. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या मतदारसंघात ठाण मांडून आहेत. त्यावरून येथील लढतीचे महत्त्व ध्यानात येते.

व्यापाऱ्यांच्या नेत्यांची कसोटी

क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान मतदारसंघ असलेल्या चांदनी चौक या मतदारसंघात भाजपने व्यापाऱ्यांचे नेते प्रवीण खंडेलवाल यांना संधी दिली. येथून ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांना पक्षाने डावलले. खंडेलवाल यांचा सामना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ७९ वर्षीय जे. पी. अग्रवाल यांच्याशी आहे. अग्रवाल यांची ही दहावी लोकसभा निवडणूक. यापूर्वी १९८४ तसेच १९८९ तसेच १९९६ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचाही येथील व्यापारी समुदायावर पगडा आहे. भाजपने या मतदारसंघात हिंदुत्वावर भर दिलाय. तर काँग्रेस-आपने वस्तू व सेवा कराच्या मुद्द्यावर व्यापाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवलाय. येथे व्यापारी समुदायातील मतांचे महत्त्व लक्षात घेता, त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये ही झुंज चुरशीची आहे. अनुभवाच्या जोरावर ही जागा कदाचित काँग्रेस मिळवू शकेल.

दिल्लीतील उत्तर पश्चिम राखीव मतदारसंघात भाजपचे योगेंदर चंडोलिया यांचा सामना काँग्रेसच्या उदीत राज यांच्याशी आहे. चंडोलिया यापूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत.  काँग्रेसमध्ये उदीत राज यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळली. ते पूर्वी भाजपमध्ये होते. गेल्या वेळी भाजपचे हंसराज हंस यांनी या मतदारसंघातून ६० टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. त्यामुळे काँग्रेस-आपपुढे हे मतांचे अंतर कापणे हे मोठे आव्हान आहे. एकूणच दिल्लीत भाजपविरोधात काँग्रेस तसेच आप एकत्र आले असल्याने राजधानीतील चित्र पाहता विरोधकांना एक ते दोन जागा जिंकता येतील अशी चिन्हे आहेत. 

hrishikesh.deshpande@expressindia.com

Story img Loader