कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ ३.० आणण्याच्या तयारीत आहे. देशभरात सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये / कारखान्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ईपीएफओ ३.० मधील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांना थेट एटीएमद्वारे त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढण्याचा पर्याय मिळेल, असे ‘ईटी नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ईपीएफओ म्हणजे काय? केंद्र सरकार ईपीएफओमध्ये काय सुधारणा करणार आहे? ईपीएफओ ३.० नक्की काय आहे? त्याचा नक्की कसा फायदा होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ईपीएफओ म्हणजे काय?
ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था. देशभरातील सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना आपल्या निवृत्तीनंतरच्या भविष्यासाठी निधी गोळा करता यावा यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ईपीएफओद्वारे ईपीएफ व ईपीएस, या दोन गोष्टींचे व्यवस्थापन केले जाते. ईपीएफ कर्मचारी निर्वाह निधी म्हणजे नोकरीच्या वेळी साठवलेले पैसे, जे निवृत्तीच्या वेळी एकत्रितरीत्या मिळतात आणि ईपीएस म्हणजे कर्मचारी निवृत्ती योजना, ज्यात निवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक निधी निवृत्तिवेतन स्वरूपात मिळतो.
हेही वाचा : ४०,००० हून अधिक भारतीयांना अटक; अमेरिका-कॅनडा सीमेवर बेकायदा मार्गाने घुसखोरी वाढली, कारण काय?
भविष्य निर्वाह निधीचे पैसे एटीएममधून काढता येणार?
ईपीएफओ सदस्यांची सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कामगार मंत्रालय २०२५ मध्ये पीएफ योगदानात बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय घेण्यात आल्यास निवृत्तीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या या नवीन उपक्रमांतर्गत ग्राहकांना त्यांचे पीएफ खात्यातील पैसे थेट एटीएममधून काढता येतील, असे ‘ईटी नाऊ’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. एटीएम कार्ड, डेबिट कार्डप्रमाणेच कामगार मंत्रालयाद्वारे एक कार्ड जारी केले जाईल; ज्याचा वापर करून सदस्यांना पीएफचे पैसे थेट एटीएममधून काढता येतील. असे असले तरी काढता येणारी कमाल रक्कम संपूर्ण ठेवीच्या ५० टक्के इतकीच असेल. हे बदल २०२५ च्या मे ते जूनदरम्यान लागू केले जाऊ शकतात, असेही वृत्तात सांगण्यात आले आहे.
सध्या ईपीएफ खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी सात ते १० दिवस लागतात. तसेच आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ईपीएफओकडे जमा करावी लागतात. इतकेच नव्हे, तर पैसे काढण्यासाठी योग्य ते कारणही द्यावे लागते. तसेच कर्मचारी त्यांचा पीएफ ऑनलाइनदेखील काढू शकतात. ईपीएफओच्या ई-एसईडब्ल्यू पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने पैसे काढता येतात. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर ते त्यांची संपूर्ण बचत पीएफ खात्यातून काढू शकतात. परंतु, सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी काही निकष पूर्ण केल्यास त्यांना आंशिक रक्कम काढता येते. ईपीएफओ ३.० द्वारे सदस्य त्यांच्या पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढण्यास सक्षम होतील आणि त्यामुळे त्यांच्यासाठी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
हेही वाचा : मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
योगदानावरील १२ टक्के मर्यादा काढून टाकण्याचा विचार
पीएफ योगदानातील कर्मचाऱ्यांची ठरावीक मर्यादा काढून टाकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हवी तितकी रक्कम योगदान स्वरूपात देता येईल. सध्याच्या स्थितीत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये प्रत्येकी १२ टक्के योगदान देतात. नियोक्त्याच्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएसअंतर्गत निवृत्तिवेतन म्हणून कपात केली जाते आणि ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारावर नियोक्त्याचे योगदान निश्चित केले जाऊ शकते; जेणेकरून नियोक्त्यावर भार पडणार नाही.