कोव्हिशिल्ड लस तयार करणारी ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने असे म्हटले की, करोना लसीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होऊ शकतो, यात शरीरात रक्ताच्या गुठळया तयार होतात आणि प्लेटलेट्स कमी होतात. ही माहिती पुढे येताच कोव्हिशिल्ड लस घेणार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, यात घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. हा धोका अतिशय दुर्मीळ असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परंतु, आता कोव्हिशिल्डमुळे आपल्या मुलींचा मृत्यू झाल्याचा दावा करत दोन भारतीय मुलींच्या पालकांनी ॲस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. नेमके हे प्रकरण काय? खरंच या मुलींचा मृत्यू कोव्हिशिल्ड लस घेतल्यामुळे झाला का? पालकांचे म्हणणे काय? याबद्दल जाणून घेऊ या.
नेमके प्रकरण काय?
जुलै २०२१ मध्ये २० वर्षीय डेटा सायन्सची विद्यार्थी कारुण्या वेणुगोपाल हिचा लसीकरणाच्या एका महिन्यानंतर मृत्यू झाला होता. रुग्णालयात दाखल केल्याच्या काही आठवड्यानंतर मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोममुळे तिचे निधन झाले. “लस घेतल्यानंतर आठ दिवसांनी तिला अस्वस्थ वाटू लागले. तीन आठवडे रुग्णालयात दाखल केल्यानंतरही डॉक्टर तिला वाचवू शकले नाही”, असे तिचे वडील वेणुगोपालन गोविंदन यांनी २०२२ च्या उत्तरार्धात ‘इकॉनॉमिक टाइम्स (ईटी)’ ला सांगितले. लस घेण्यापूर्वी पूर्णपणे निरोगी असल्याचेही तिच्या वडिलांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने ओसामा बिन लादेनला कसं केलं ठार; ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते?
कुटुंबाच्या तक्रारीवरून नोव्हेंबर २०२१ मध्ये आरोग्य मंत्रालयाच्या लसीकरण विभागाने चौकशी समिती स्थापन केली. त्यात कारुण्याचा मृत्यू ‘बी१’ म्हणून वर्गीकृत करण्यात आला. समितीने असा निष्कर्ष काढला की, तिचा मृत्यू लस घेतल्यामुळे झाला याचा पुरेसा पुरावा नाही. त्यानंतर वेणुगोपालन गोविंदन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सरकारकडून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली. त्यासह स्वतंत्र वैद्यकीय मंडळ नेमण्याची आणि मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, कोविड-१९ लसींच्या परिणामामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई देण्यास सरकारला जबाबदार धरता येणार नाही. आता कारुण्याचे पालक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियावर गुन्हा दाखल करणार आहेत.
आता ॲस्ट्राझेनेकाने प्रथमच स्वीकारले की, त्यांच्या कंपनीत तयार करण्यात आलेल्या करोनाच्या लसीमुळे दुर्मीळ प्रकरणांमध्ये टीटीएस होऊ शकते. ही माहिती पुढे येताच कारुण्याचे पालक ॲस्ट्राझेनेका कंपनीसह सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती, ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिली आहे. गोविंदन म्हणाले की, फार्मास्युटिकल कंपनीने हे ओळखायला फार उशीर केला आहे. अनेकांचा जीव गेल्यानंतर त्यांनी हे स्वीकार केले आहे.
मार्च २०२१ मध्ये रक्ताच्या गुठळ्यांमुळे झालेल्या मृत्यूमुळे १५ युरोपिय देशांनी या लसींचे उत्पादन आणि पुरवठा बंद केला होता. तेव्हा ॲस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लसींचे उत्पादन आणि पुरवठा थांबवायला हवा होता, असे त्यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले. गोविंदन यांनी जगभरातून या लसीच्या प्रतिकूल परिणामांबद्दलचा डेटा समोर आल्यानंतर लसीचा पुरवठा न थांबवल्याबद्दल कोविशिल्ड निर्मात्या कंपनीसह सरकारलादेखील प्रश्न केला. “आमच्या मुलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या सर्व गुन्हेगारांवर आम्ही नवीन खटले दाखल करू,” असेही ते म्हणाले.
‘एनडीटीव्ही’नुसार गोविंदन म्हणाले, “पीडित कुटुंबांपैकी आठ कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली आहेत आणि आम्हा सर्वांच्या समान भावना व्यक्त करत आहे.” ॲस्ट्राझेनेकाची करोनावरील लस आणि त्याच्या परिणामाचा पहिला अहवाल २०२१ च्या सुरुवातीला समोर आला. डेन्मार्कसह अनेक युरोपिय देशांनी या चिंतेमुळे लसीचा वापर काही काळासाठी थांबवला होता.
कोविशिल्ड घेतल्यानंतर आणखी एक मृत्यू
१८ वर्षीय रिथायका श्री ओमत्री हिने मे २०२१ मध्ये हैदराबादमध्ये कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ‘स्क्रोल’च्या माहितीनुसार, लसीकरण केल्याच्या पाच दिवसांत तिला बोटांमध्ये संवेदना जाणवल्या आणि नंतर खूप ताप आला. बरेच दिवस तिचा ताप कमी होत नसल्याने, एका डॉक्टरांनी तिला रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यामध्ये दीड लाख ते चार लाख या सामान्य श्रेणीच्या तुलनेत तिचे प्लेटलेट्स ४० हजारापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दहा दिवसांनंतर रिथायकाला उलट्या होऊ लागल्या. तिला चालता येणेही अशक्य झाले.
तिच्या मेंदूच्या एमआरआय स्कॅनमध्ये असे दिसून आले की, तिच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या आहेत आणि उजव्या भागात पुढच्या बाजूला रक्तस्त्राव झाला आहे. अनेक प्रयत्नानंतरही डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. ‘स्क्रोल’च्या माहितीनुसार, रिथायकाला लसीमुळे ‘वैक्सीन इंड्युस्ड थ्रोम्बोटिक थ्रोम्बोसाइटोपेनिया (व्हीआयटीटी)’ आढळून आले; ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात आणि प्लेटलेटसची संख्या कमी होते.
ॲस्ट्राझेनेका वेक्सझेरीया (भारतात कोव्हिशिल्ड म्हणून विकले जाणारे) आणि जॉन्सन अँड जॉन्सन्स शॉटसारख्या एडिनोव्हायरल वेक्टर कोव्हिड-१९ लस घेतलेल्या काही लोकांमध्ये व्हीआयटीटी आढळून आले. रिथायकाची आई रचना गंगू या दुसऱ्या याचिकाकर्त्या होत्या, ज्यांनी गोविंदनसह २०२१ च्या उत्तरार्धात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आरोप केला होता की, कोविड-१९ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांच्या मुलीला त्रास होऊ लागला आणि तिचा मृत्यू झाला. रिथायकाच्या आईनेदेखील स्वतंत्र वैद्यकीय मंडळ नेमण्याची, नुकसान भरपाईची आणि मुलीच्या मृत्युची चौकशी करण्याची मागणी केली. ॲस्ट्राझेनेकाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता मृत मुलींच्या पालकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हेही वाचा : रशियाकडून कच्चे तेल घेऊन भारताने १३ अब्ज डॉलर्सची बचत कशी केली?
ब्रिटनमधील प्रकरणे
ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित केलेल्या कोव्हिड-१९ लसीमुळे ५१ लोकांचा मृत्यू आणि अनेकांना गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले. पीडित नातेवाईक आता नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. गेल्या वर्षी कंपनीविरुद्ध पहिला खटला जेमी स्कॉट यांनी दाखल केला होता. जेमी स्कॉट यांना रक्ताच्या गुठळ्या आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी लस घेतल्यानंतर हा त्रास दिसून आला आणि तेव्हापासून स्कॉट काहीही काम करू शकलेले नाही, असे वृत्त ‘डेली टेलिग्राफने’ दिले. लसीमुळे असे झाल्याचा दावा कंपनीने आधी फेटाळून लावला होता. आता, ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने कबूल केले आहे की, त्यांच्या कोविड-१९ लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात.