न्यूझीलंड संघाला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ विजेतेपदापासून पुन्हा दूरच राहिला. मात्र गेल्या दशकभरात या संघाने ‘आयसीसी’ स्पर्धांमधील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. न्यूझीलंडच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे गमक काय, याचा घेतलेला हा आढावा…

‘आयसीसी’ स्पर्धांमधील न्यूझीलंडची कामगिरी कशी राहिली?

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला १९७५ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून न्यूझीलंड संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित करत असलेल्या स्पर्धांत सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. आजवर न्यूझीलंडने सात वेळा (१९७५, १९७९, १९९२, १९९९, २००७, २०११, २०२३) उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. तर २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेत संघाने अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २००७ पासून सुरू झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने तीन वेळा (२००७, २०१६, २०२२) उपांत्य फेरी गाठली, तर २०२१च्या स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१९-२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी भारताला नमवत जेतेपद पटकावले. ‘आयसीसी’ नॉक-आऊट २०००च्या स्पर्धेत न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारतावर चार गडी राखून विजय मिळवत अजिंक्यपद मिळवले. याच स्पर्धेचे नामकरण नंतर ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक स्पर्धा असे झाले. यामध्ये त्यांनी २००६च्या सत्रात उपांत्य फेरी गाठली, तर २००९च्या स्पर्धेत ते उपविजेते होते.

Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

न्यूझीलंडच्या यशात केन विल्यम्सनची भूमिका निर्णायक का?

गेल्या दशकभरात न्यूझीलंड संघ मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे आणि यामध्ये केन विल्यम्सनने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. २०१६ मध्ये विल्यम्सनला न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. विल्यम्सनला ब्रेंडन मॅककलमकडून ही जबाबदारी मिळाली. २०१९ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मात्र त्यांना यजमान इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जून २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथमच होणाऱ्या ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. त्यामुळे विल्यम्सनचा कर्णधार म्हणून कार्यकाळ हा न्यूझीलंड संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो.

न्यूझीलंडमध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेचे कारण काय?

न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला असलेला छोटेखानी देश. २०२१च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ५२ लाखांच्या जवळपास आहे. हा देश क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतो. मात्र या देशाचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट नसून तो रग्बी आहे. तसेच न्यूझीलंडला ‘आयसीसी’ जेतेपद मिळवता आले नसले, तरीही रग्बी या खेळात त्यांनी तीन विश्वचषक आपल्या नावे केले आहेत. मुळात ब्रिटिशांच्या काळातील एक वसाहत असलेल्या या देशाने इतर खेळांप्रमाणे क्रिकेटलाही आत्मसात केले. भारताप्रमाणे १९३०च्या दशकात न्यूझीलंडने पहिला कसोटी सामना खेळला. यानंतर संघाने सातत्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. स्थानिक क्रिकेटमध्ये न्यूझीलंडमध्ये ऑकलंड, कॅन्टरबरी, सेंट्रल डिस्ट्रिक्स, नॉर्दन डिस्ट्रिक्स, ओटॅगो, वेलिंग्टन असे संघ खेळतात.

हेही वाचा… विश्लेषण: स्मार्टफोनला लवकरच गुडबाय? काय आहे ‘स्मार्ट’पिन?

भारतात राष्ट्रीय संघनिवडीसाठी जशी रणजी क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरली जाते. तशीच न्यूझीलंडमध्ये प्लंकेट ढाल ही स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय एकदिवसीय व ट्वेन्टी-२० प्रारूपांसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय संघनिवड केली जाते. तसेच गेल्या दशकभरातील संघाच्या कामगिरीचे श्रेय प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनाही जाते. २०१८ मध्ये स्टीड यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये गेल्या पाच वर्षांत संघाच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे. त्यातच भारतीय वंशातील लोकसंख्या न्यूझीलंडमध्ये वाढत असल्याने क्रिकेटच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.

भारतीय वंशातील कोणत्या खेळाडूंनी न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले?

नरोत्तम ‘टॉम’ पूना हे न्यूझीलंड संघाकडून खेळणारे पहिले भारतीय वंशाचे खेळाडू होते. त्यांनी १९६६ मध्ये पदार्पण केले. यानंतर दीपक पटेल यांची १९८७ मध्ये न्यूझीलंड संघात वर्णी लागली. त्यांनी न्यूझीलंडकडून ३७ कसोटी आणि ७५ एकदिवसीय सामने खेळले. १९९२च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी पहिले षटक टाकत सर्वांचे लक्ष वेधले होते. जीतन पटेलनेही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना २४ कसोटी व ४३ एकदिवसीय सामने खेळले. रॉनी हिरा हा खेळाडूदेखील न्यूझीलंडकडून १५ ट्वेन्टी-२० सामने खेळला. २०१२ मध्ये तरुण नेथूलाला खेळण्याची संधी मिळाली व त्याने पाच एकदिवसीय सामने खेळले. यानंतर २०१३ मध्ये ईश सोधीला संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत संघाकडून १९ कसोटी, ४९ एकदिवसीय व १०२ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. २०१८ मध्ये तो ट्वेन्टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला होता. २०१६ मध्ये जीत रवालला संघात स्थान मिळाले. त्याने संघाकडून २४ कसोटी सामने खेळले. यानंतर फिरकीपटू एजाझ पटेलला संघात स्थान मिळाले. त्याने भारताविरुद्ध कसोटीत दहा गडी मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. रचिन रवींद्रने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. आदित्य अशोक हा फिरकीपटूही न्यूझीलंडकडून एक ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे.