World Population Day 2024, 10 Least-Populated Countries in the World: आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. सध्या ज्या गतीने लोकसंख्या वाढत आहे, ती त्याच पद्धतीने वाढत राहिली तर २०५० सालापर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ अब्ज तर २०८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत १०.४ अब्जावर गेलेली असेल, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलेली आहे. थोडक्यात पुढील तीस वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये दोन अब्ज लोकांची भर पडणार आहे. यूएनएफपीएच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार, काही वर्षांपूर्वी जगामध्ये चीनची लोकसंख्या सर्वाधिक होती. मात्र, २०२३ मध्ये चीनला मागे टाकत १.४ अब्ज लोकसंख्येसह भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

हेही वाचा : ‘हिट डोम’मुळे अमेरिकेतील नागरिक त्रस्त; काय असतात हिट डोम आणि ते कसे तयार होतात?

India to remain fastest-growing large economy in FY26, FY27
भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
GDP growth likely to be limited to 6 3 percent ​​State Bank print eco news
जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?

गेल्या काही दशकांतील ‘लोकसंख्या वाढीच्या गती’मुळे ही वाढ झाली असून २०५० सालापर्यंत भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग मंदावेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यूएनएफपीएच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार, हीच बाब जागतिक लोकसंख्येलाही लागू पडते. सध्या जगाची लोकसंख्या आठ अब्जहून अधिक आहे. लोकसंख्या वाढीचा जगावर नेमका काय परिणाम होतो, याची जाणीव ठेवण्यासाठी म्हणून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमने (UNDP) दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या वर्षीची थीम “To leave no one behind, count everyone” म्हणजेच ‘कुणीही वगळले जाऊ नये, यासाठी प्रत्येकाची गणना करा’ अशी आहे. भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश असून दोघांचीही लोकसंख्या एक अब्जच्या पुढे आहे. हे दोन्ही देश जगातील एकूण लोकसंख्येमध्ये १८ टक्क्यांची भर घालतात. मात्र, जगात जसे अधिक लोकसंख्येचे देश आहेत, त्याचप्रमाणे सर्वांत कमी लोकसंख्या असलेले देशही अस्तित्वात आहेत. जगातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक व्हॅटीकन सिटी या देशाचा लागतो. आपण आता जगातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या दहा देशांची यादी पाहणार आहोत. (Source: World Population Review)

१. व्हॅटीकन सिटी

२०२३-२४ च्या आकडेवारीनुसार, व्हॅटीकन सिटीची लोकसंख्या फक्त ७६४ इतकी आहे. हा जगातील सर्वांत लहान देश मानला जातो. हा देश कॅथोलिक चर्चचे आध्यात्मिक आणि प्रशासकीय केंद्र आहे. हा देश फक्त ४९ हेक्टर इतक्या लहान भूभागावर वसलेला आहे. तसेच नागरिकत्व मिळण्यासाठी अनेक कठोर निकष असल्यामुळे या देशात नव्या नागरिकांची भर पडत नाही.

२. टोकलाऊ

टोकलाऊ हा दक्षिण पॅसिफिक महासागरामधील तीन दुर्गम प्रवाळ-खडकांचा समूह आहे. तो भूभागापासून वेगळा पडलेला असल्यानेच त्याची लोकसंख्या कमी आहे. या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस किलोमीटर आहे, तर लोकसंख्या १,९१५ इतकी आहे. या देशामध्ये विमानतळ नाही. सामोआमधून बोटीच्या माध्यमातूनच या देशात जाता येते. तो दूरवर असल्यानेच त्याची लोकसंख्या कमी आहे.

३. नीयू

न्यूझीलंडपासून मुक्त असलेले हे एक सार्वभौम बेट आहे. या बेटाचे क्षेत्रफळ २६० चौरस किलोमीटर आहे. दुर्गम प्रदेश आणि मर्यादित आर्थिक संधी, यामुळे या देशाची लोकसंख्या प्रचंड मर्यादित आहे. या देशात फक्त १,९३५ लोक राहतात.

४. फॉकलंड बेटे

फॉकलंड बेटे हे दक्षिण अटलांटिकमधील ब्रिटीश ओव्हरसीज टेरिटरी आहेत. तिथे हवामान मानवी वस्तीसाठी फारसे अनुकूल नसल्याने लोकसंख्या कमी आहे. त्या देशाची लोकसंख्या फक्त ३,५०० च्या आसपास आहे. त्या देशाची अर्थव्यवस्था मासेमारीवर आधारलेली आहे. तिथे पर्यटनही चांगले चालते.

हेही वाचा : आयआरएस अधिकारी अनुसूया झाली अनुकाथिर सूर्या; महिला आयआरएस अधिकार्‍याने लिंग बदलून कसा रचला इतिहास?

५. मॉन्स्टेराट

हे एक कॅरिबियन बेट असून तिथे फक्त ४,३७२ लोकांची वस्ती आहे. १९९० साली ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अनेकांनी तिथून दुसरीकडे स्थलांतर केले. ज्वालामुखीच्या भीतीमुळेच तिथे फारशी मानवी वस्ती नाही.

६. सेंट पियरे आणि मिकेलॉन

उत्तर अटलांटिकमधील या फ्रेंच प्रादेशिक समूहाची लोकसंख्या सुमारे ५,८१५ इतकी आहे. कॅनडापासून हा देश दूरवर आहे आणि मासेमारी आणि पर्यटनाच्या पलीकडे दुसरे काहीच करता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्याही कमी आहे.

७. सेंट बार्थेलेमी

फक्त २५ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या देशाची लोकसंख्या ११,०१९ इतकी आहे. इथेही पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे.

८. वॉलिस आणि फ्यूचूना

दक्षिण पॅसिफिकमधील या देशाचे फक्त १४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. हा देश म्हणजे तीन लहान ज्वालामुखी बेटांचा समूह आहे. दुर्गम भूप्रदेश असल्याने या देशाची लोकसंख्या फक्त ११,४३९ इतकी आहे.

९. टुवालू

हा देश म्हणजे नऊ पॅसिफिक प्रवाळ-खडकांवर वसलेली मानवी वस्ती आहे. या देशाची लोकसंख्या फक्त ११,४७८ इतकी आहे. हा देश फक्त २६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरला याहे.

१०. नारू

नारू हा देश फक्त २१ चौरस किलोमीटरमध्ये वसला आहे. या देशाची लोकसंख्या फक्त १२,८८४ इतकी आहे. देशासमोर असलेली आर्थिक आव्हाने आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव, यामुळे या देशात लोकसंख्या वाढीस अडथळा निर्माण होत आहे.

Story img Loader