भारतासह इतर देशांत विविध प्रकारच्या गाई आहेत, ज्या आपल्या खास वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या ब्राझीलमध्ये विकण्यात आलेल्या एका गाईची सर्वत्र चर्चा होत आहे. ब्राझीलमध्ये लाखो गाई असल्या तरी तेथे लिलाव करण्यात आलेली एक गाय खास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिएटिना-१९ नावाच्या नेल्लोर प्रजातीच्या गाईने नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडला असून, लिलावात ही गाय ४० कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही गाय जगातील सर्वांत महागडी गाय कशी ठरली? या गाईचे वैशिष्ट्य काय? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील सर्वांत महाग गाय

४० कोटी रुपयांत विकल्या गेलेली व्हिएटिना-१९ ही ब्राझीलमधील मिनास गेराइस येथे लिलावात विकली गेलेली सर्वांत महाग गाय आहे. वृत्तानुसार, या गाईचे वजन १,१०१ किलोग्रॅम आहे. हे वजन याच प्रजातीच्या इतर गाईंच्या सरासरी वजनाच्या दुप्पट आहे. व्हिएटिना-१९ ही नेल्लोर गोवंशाची गाय आहे, जी तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. गाईच्या विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये तिच्या आकर्षक पांढऱ्याशुभ्र आणि सैल त्वचेचा समावेश होतो. ही गाय सौंदर्यदृष्ट्या सुंदर असण्याबरोबरच उष्ण, दमट, कोरड्या वातावरणात तग धरून राहते.

‘व्हिएटिना-१९’ने पुरस्कारावर पुरस्कार जिंकले आहेत. या गाईने टेक्सास येथे आयोजित ‘चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत ‘मिस साऊथ अमेरिका’ हा कितबही जिंकला आहे. उत्तम प्रजो‍त्पादन क्षमतेसह भरल्या अंगाची ही गाय इतरांच्या तुलनेत अनेकदृष्ट्या वेगळी आहे. ब्राझीलमध्ये या प्रजातीची जास्त मागणी दुग्धोत्पादनासाठी नसून मांसाहारासाठी केली जाते. “व्हिएटिना-१९ ही आतापर्यंत ज्ञात झालेल्या सर्व गुणधर्मांनी परिपूर्णतेच्या सर्वांत जवळ जाणारी अशी गाय आहे,” अशी माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञ लॉरेनी मार्टिन्स यांनी यापूर्वी ‘असोसिएटेड प्रेस’ला दिली होती.

नेल्लोर प्रजातीच्या गाईचे वैशिष्ट्य

ब्राझीलमधील ८० टक्के गाई झेबस या भारतात उगम पावलेल्या उपप्रजातीच्या आहेत. कुबड्या मानेमुळे किंवा मानेवरील त्वचेला पडलेल्या घड्यांमुळे ओळखली जाते. व्हिएटिना-१९ हा नेल्लोर जातीचा एक भाग आहे, ज्याला ओंगोल गाय, असेही संबोधले जाते आणि विशेष बाब म्हणजे ही प्रजाती भारतातील आहे. १८०० च्या दशकात ब्राझीलमध्ये या प्रजाती पाठवण्यात आल्या होता. ही गाय मूळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर वंशाची आहे आणि नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून या प्रजातीला हे नाव देण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये या गाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मजबूत स्नायुबांधणी, उष्णता सहन करण्याची क्षमता, रोगप्रतिकार शक्ती व चरण्याच्या सवयी या वैशिष्ट्यांमुळे ही गाय अत्यंत मौल्यवान ठरली आहे. नेल्लोर गाय आता पशुधन क्षेत्राचा मुख्य आधार झाली आहे. ही प्रजाती आर्थिक विस्तार आणि कृषी उत्पादन या दोन्ही बाबींमध्ये भरीव योगदान देत आहे. नेल्लोर प्रजाती एकंदरीत श्रेष्ठ आहे. कारण- त्यांच्याकडे पुनरुत्पादनाची उच्च क्षमता आहे आणि या प्रजातीकडून उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह संतती निर्माण होण्याची अपेक्षा असते.

असंख्य मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगभर व्हिएटिना-१९ भ्रूणांना मोठी मागणी आहे. उत्कृष्ट जनुकीय वैशिष्ट्ये असलेल्या उच्च गुणवत्तेच्या प्राण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अमेरिकेसह ब्राझील गुरांच्या आनुवंशिकतेमध्ये आघाडीवर आहे. हे देश जगातील इतर देशांच्या तुलनेत इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन करतात, असे सरकारच्या कृषी संशोधन महामंडळातील आनुवंशिक संसाधने आणि जैवतंत्रज्ञान संशोधक जोआओ हेन्रिक मोरेरा वियाना यांनी ‘एपी’ला सांगितले.

ओंगोल प्रजाती

आर्य लोकांनी प्रथम भारतीय ओंगोल जातीचा परिचय करून दिला, ज्याचा इतिहास २,००० वर्षांपूर्वीच्या ख्रिस्ती धर्माचा आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ही प्रजाती भारतातील आंध्र प्रदेश जिल्ह्यातून आली आहे. मजबूत शरीर, उष्णता सहन करण्याची क्षमता, निरोगी, काटक शरीर या क्षमतेसाठी ओंगोल गाई प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या प्रजातीला कमी वैद्यकीय खर्च येतो. जाड कातडीमुळे या गोवंशाला रक्तशोषक किड्यांची बाधा होत नाही. त्यांची पचन क्षमताही उत्तम असते आणि त्यामुळे त्यांना विशिष्ट खुराक देण्याची गरज पडत नाही.

गुरांचा बाजार आणि हवामान संकट

२००० च्या दशकात संसाधनांच्या वाढीमुळे ब्राझिलियन शेतीला चालना मिळाली. विशेषत: चीनमध्ये गोमांसाची मागणी वाढल्याने सध्या जगात गाईंची उपज मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अमेरिकेतील कृषी विभागाचा दावा आहे की, सध्या सुमारे २३० दशलक्ष गाई आहेत. ओक्लाहोमा राज्याने स्पष्ट केलेल्या आकडेवारीनुसार देशातून अर्जेंटिना, पॅराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, अमेरिका आणि इतर अनेक राष्ट्रांना गुरांची विशेषतः नेल्लोर गाईंची निर्यात केली जाते.

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या विश्लेषणानुसार, देशातील ८६ टक्के हरितगृह उत्सर्जन हे त्याच्या अन्न उत्पादनाशी संबंधित आहे. गाई मिथेन वायू उत्सर्जित करतात, जो हवामानासाठी घातक आहे. ही समस्या लक्षात घेता, सरकारच्या कृषी संशोधन संस्थेतील गोमांस पशुसंशोधक रॉड्रिगो गोम्स यांच्या मते, गाईंना मारले जाणे हा पशुधन उत्सर्जन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.