4,400-year-old discovery in Syria rewrites history: जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी एका महत्त्वाच्या पुरातत्त्वीय शोधामध्ये सिरीयातील एका थडग्यात आढळलेल्या मातीच्या सिलिंडरच्या आकाराच्या मुद्रांवर कोरलेली आजपर्यंतची सर्वात जुनी वर्णमाला सापडल्याचा दावा केला आहे. या मुद्रा सुमारे इ.स.पू. २४०० वर्ष जुन्या असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी ज्ञात वर्णमाला लिपींपेक्षा या नव्याने सापडलेल्या वर्णमालांचा कालखंड सुमारे ५०० वर्षांनी मागे जातो. त्यामुळे वर्णमाला लेखनाच्या उगम आणि प्रसाराविषयीच्या विद्यमान सिद्धांतांना मोठे आव्हान मिळाले आहे. या मातीच्या मुद्रा पश्चिम सिरीयातील टेल उम्म-एल मार्रा या प्राचीन नागरी केंद्रातील एका थडग्यातून उत्खननादरम्यान सापडल्या. या शोधाचा घेतलेला हा आढावा…

अधिक वाचा: Ancient Origins of Writing: ६,००० वर्षांपूर्वीच्या रहस्यमय चिन्हांचा शोध; लेखन प्रणालीचा उगम कसा झाला?

Dr Hartman said Pali is ancient language with valuable knowledge and literature published in Germany
जर्मनीतही पाली साहित्य प्रकाशित; पाली भाषेच्या संवर्धन आणि प्रचारासाठी प्रयत्न गरजेचे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
The helmet
२४५० वर्षे जुन्या अस्सल सोन्याच्या शिरस्त्राणाची चोरी; का आहे हे शिरस्त्राण महत्त्वाचे?
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
Loksatta kutuhal story of the discovery of dinosaurs
कुतूहल: डायनोसॉरच्या शोधाची कथा
AI in archaeology
AI ने शोधले ५००० वर्षांपूर्वीचे वाळवंटाखाली दडलेले प्राचीन संस्कृतीचे रहस्य; का आहे हे तंत्र महत्त्वाचे?

मानवी संवाद अधिक प्राचीन

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील पुरातत्त्वज्ञ प्रा. ग्लेन श्वार्ट्झ यांच्या नेतृत्वाखाली ॲम्स्टरडॅम विद्यापीठाच्या सहकार्याने १६ वर्षांपासून या स्थळावर उत्खनन सुरू आहे. अर्ली ब्राँझ एज म्हणजेच ताम्रपाषाण युगातील सुरुवातीच्या कालखंडातील या थडग्यात सहा सांगाडे, सोन्या-चांदीचे दागिने, स्वयंपाकाची भांडी, एक भाला आणि मातीची भांडी सापडली आहेत. या बोटाच्या लांबीच्या सिलिंडरच्या आकाराच्या मुद्रांवर कोरलेल्या लेखनावरून असे दिसते की, प्राचीन सभ्यता खूप पूर्वीपासून या संवाद पद्धतींचा प्रयोग करत होत्या, हा शोध यापूर्वीच्या कल्पनांपेक्षा प्राचीन आहे.

वर्णमालेने क्रांती घडवली

“वर्णमाला लेखनाने लेखनक्षेत्रात क्रांती घडवली, कारण त्याद्वारे लेखन केवळ राजघराणे आणि सामाजिकदृष्ट्या उच्चवर्गीय लोकांसाठी मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांसाठीही सुलभ झाले,” असे श्वार्ट्झ सांगतात. “हा शोध दर्शवतो की लोक नवीन संवाद तंत्रज्ञानाचा प्रयोग आपल्या कल्पनेपेक्षा खूप आधी आणि भिन्न ठिकाणी करत होते.” या सिलिंडरवर छिद्रे असल्याने संशोधकांचा असा तर्क आहे की, त्यांचा उपयोग लेबल्ससारखा केला गेला असावा. परंतु, या लेखनाचा अर्थ समजावण्याचे साधन नसल्यामुळे हे तर्क केवळ अंदाजावर आधारित आहेत.

अधिक वाचा: Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

प्राचीन समाजही पुढारलेले

कार्बन-14 डेटिंग तंत्रांने थडग्यांचे आणि पुरावशेषांचे वय निश्चित केले असून, ते यापूर्वी ज्ञात वर्णमाला लिपींपेक्षा ते खूप जुने असल्याचे सिद्ध झाले आहे. या शोधातून असे सुचवले जात आहे की, वर्णमालेचा उगम यापूर्वी विचार केलेल्या प्रदेशापेक्षा वेगळ्या प्रदेशात झाला असावा. “यापूर्वी, विद्वानांचा असा विश्वास होता की वर्णमाला इ.स.पू. १९०० च्या नंतर इजिप्तमध्ये किंवा त्याच्या आसपास विकसित झाली,” असे श्वार्ट्झ यांनी स्पष्ट केले. “पण आमचे पुरावशेष यापेक्षा जुने आहेत आणि नकाशावरील पूर्णपणे वेगळ्या भागातून सापडले आहेत, याचा अर्थ वर्णमालेची कथा आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते.” श्वार्ट्झ यांनी हे क्रांतिकारक निष्कर्ष २१ नोव्हेंबर रोजी अमेरिकन सोसायटी ऑफ ओव्हरसीज रिसर्चच्या वार्षिक परिषदेत सादर केले. हा शोध केवळ आरंभिक लेखन प्रणालींविषयीच्या आपल्या समजाला नव्याने आकार देत नाही, तर प्राचीन समाजांच्या सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीबाबतही नवी अंतर्दृष्टी प्रदान करतो. प्राचीन समाज हे पुढारलेले होते, हेच या शोधातून सिद्ध होते.

Story img Loader