-ज्ञानेश भुरे

ऑस्ट्रेलियात २०२६मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती या खेळाला वगळण्यात आले. या स्पर्धेतून कुस्तीला वगळले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दोनदा कुस्तीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीलाच वारंवार का वगळले जाते याचा घेतलेला आढावा…

IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

२०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला का वगळले?

ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जेव्हा घेण्यात येतात तेव्हा ऑलिम्पिक खेळांचा प्राधान्याने समावेश करण्यात येतो. त्यानंतर यजमान देश आपले अधिकार वापरून काही खेळांचा नव्याने समावेश करतो, तर काही खेळांना वगळतो. पुढील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलियात कुस्ती आणि तिरंदाजी हे दोन्ही खेळ प्रचलित नाहीत. अन्य स्पर्धांतही त्यांना या स्पर्धा प्रकारात यश मिळालेले नाही. केवळ याच कारणाने संयोजन समितीने या दोन्ही खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेतला. मुळात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घटनेनुसार केवळ ॲथलेटिक्स आणि जलतरण या दोनच खेळांना स्पर्धेत कायमचे स्थान आहे. बाकी सर्व खेळ हे यजमानांच्या मर्जीवर अवलंबून असतात.

भारतावर या निर्णयाचा किती फरक पडणार?

पदकसंख्येचा विचार केला, तर भारतासाठी या बदलाचा फारसा फरक पडेल असे सध्या तरी दिसून येत नाही. या वर्षी झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून इंग्लंडने अशाच पद्धतीने नेमबाजीला वगळले होते. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत २०१०पासून नेमबाजी प्रकारात भारताने वर्चस्व राखले होते. भारताच्या पदकसंख्येत नेमबाजांनी कायमच भर घातली होती. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारताने नेमबाजीत १६ पदके मिळविली होती. कुस्तीमध्ये भारताने १२ पदके मिळविली होती. बर्मिंगहॅमला नेमबाजीला वगळल्यावर नेमबाजीची पदके कमी झाली. पण, कुस्तीतील १२ पदके कायम राहिली होती. म्हणजे भारताची ही पदके आता २०२६ मध्ये कमी होणार आणि नेमबाजीची वाढणार. थोडक्यात भारतासाठी या निर्णयाचा परिणाम संमिश्र म्हणता येईल. मात्र ज्या स्पर्धेत हे दोन्ही क्रीडा प्रकार खेळवले जातील, त्या स्पर्धेत सध्याच्या गुणवत्तेच्या बळावर भारताची पदके वाढतील आणि पदकतालिकेतील स्थान उंचावेल हेही वास्तव आहे.

कुस्तीला यापूर्वी किती वेळा वगळण्यात आले?

कुस्ती हा ऑलिम्पिक आणि सर्वांत जुना क्रीडा प्रकार असला, तरी राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात या खेळाचा समावेश पर्यायी खेळ म्हणून करण्यात आला. सर्वप्रथम १९३०पासून कुस्ती खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर १९९४ र्यंत या खेळाचा समावेश कायम होता. १९९८ मध्ये यजमान मलेशियाने १०-पिन बोलिंग खेळासाठी कुस्तीला वगळले. त्यानंतर २००२मध्ये पुन्हा कुस्तीचा समावेश करण्यात आला. पण, २००६ म्हणजे पुन्हा कुस्तीला वगळण्यात आले. या वेळी बास्केटबॉलच्या समावेशासाठी कुस्ती खेळावर गदा आली. त्यानंतर २०१०मध्ये पुन्हा कुस्तीचा समावेश करण्यात आला. बदल इतकाच झाला की २०१०पासून फ्री-स्टाईल प्रकाराचा समावेश करण्यात आला. तो २०२२ पर्यंत कायम होता.

कुणाचे किती वर्चस्व?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताचे वर्चस्व राहिले असले, तरी ते अलीकडच्या काळातील आहे. स्पर्धेचा १९३०पासूनचा इतिहास बघितला तर कॅनडाने (६९, ४८, ३०) सर्वाधिक १४७ पदके मिळविली आहेत. भारताच्या नावावर (४९, ३९, २६) ११४ पदके आहेत. ऑस्ट्रेलियाने (१४, २२, १७) ५३ पदके मिळवली आहेत. दरम्यान, नेमबाजीत ऑस्ट्रेलियाने १९६६ ते २०१८ पर्यंत (७०, ५९, ४२) अशी सर्वाधिक १७१ पदके मिळविली आहेत. भारताच्या नावावर (६३, ४४, २८) १३५ पदके असून सहभागी देशांमध्ये या दोन देशांनी नेमबाजीत वर्चस्व राखले आहे.

कुस्तीला सातत्याने का वगळले जाते?

भारताने अलीकडच्याच काळात कुस्ती खेळात कमालीची प्रगती केली आहे. सुशीलकुमारच्या ऑलिम्पिक पदकापासून ही प्रगती सातत्याने दिसू लागली. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीत रशिया, अमेरिका, जॉर्डन, इराण अशा देशांबरोबर चीन आणि जपान या आशियाई देशांचाही दबदबा होता. पण, हे देश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग नसतात. ओशियाना, आफ्रिका आणि ब्रिटिश द्वीपसमूहातील देशांमध्ये फारशी कुस्ती संस्कृती नाही. त्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळाचा पर्यायी खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खेळ वगळायचे झाले की पहिली कुऱ्हाड कुस्तीवर पडते. त्यामुळे कुस्तीत पदक मिळविण्यापेक्षा कुस्तीच्या समावेशाची लढाई अधिक कठीण आहे.

Story img Loader