The Role of Japan in WWII- Unit 731: १ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ दरम्यान झालेले जागतिक स्तरावरील युद्ध हे दुसरे महायुद्ध म्हणून ओळखले जाते. मानवी इतिहासातील सर्वांत मोठ्या आणि विध्वंसक संघर्षांपैकी ते सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाते. या महायुद्धाच्या काळात जपानची भूमिका महत्त्वाची ठरली होती. जपान, जर्मनी आणि इटली हे एका बाजूला तर ब्रिटन, अमेरिका, सोविएत संघ, फ्रान्स, चीन हे दुसऱ्या बाजूला होते. दुसऱ्या महायुद्धातील जपानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि विवादास्पद होती. त्यात जपानी लष्कराने जैविक आणि रासायनिक शस्त्रांवर प्रयोग केले, त्याचे पुरावे आता सापडल्याचा दावा केला जात असून तो मानवतेविरोधीतील मोठा अपराध होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे, त्याच संदर्भात नवीन संशोधन काय सांगते याचा घेतलेला आढावा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जपानने या युद्धात अॅक्सिस पॉवर्सचा (Axis Powers) भाग म्हणून सहभाग घेतला आणि पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्तारवादी धोरणे राबवली. जपानने १९३१ साली मंचुरिया आणि १९३७ साली चीनवर आक्रमण केले. त्यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील ताणतणाव वाढले. जपानने आपल्या ‘ग्रेटर ईस्ट एशिया को-प्रॉस्पेरिटी स्पिअर’ या धोरणाद्वारे आशियामध्ये वसाहती निर्माण करण्याचा आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता.
जपानने याचयुद्धात अमेरिकेच्या पर्ल हार्बर नौदल तळावर अचानक हल्ला केला. यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात मित्रपक्षांच्या बाजूने सामील झाली. हा हल्ला जपानची लष्करी ताकद आणि धाडसी धोरणे दर्शवतो, परंतु त्याचा दीर्घकालीन फटका बसला. जपानने फिलिपाइन्स, मलाया, बर्मा, इंडोनेशिया आणि पॅसिफिकमधील अनेक बेटांवर नियंत्रण मिळवले. परंतु १९४२ मधील मिडवेच्या लढाईत (Battle of Midway) अमेरिकेच्या निर्णायक विजयाने जपानची आक्रमक मोहीम अयशस्वी ठरली.
अणुबॉम्बचा वापर
ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकी येथे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी शरणागती पत्करली. या युद्धादरम्यान युनिट ७३१ सारख्या प्रयोगशाळांमध्ये जपानी लष्कराने जैविक आणि रासायनिक शस्त्रांवर प्रयोग केले, त्यामध्ये मानवतेविरोधी अपराध घडल्याचे पुरावे आता सापडले आहेत.
Emerging Infectious Diseases
चिनी संशोधकांनी असा दावा केला आहे की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने विषाणूंचा वापर अस्र म्हणून केला आणि कैद्यांवर भयानक वैद्यकीय चाचण्या केल्या. या अंधाऱ्या कालखंडाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशोधकांनी असाही दावा केला आहे की, चीनच्या ईशान्य भागातील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जपानी प्रयोगशाळेत त्यांना ‘Bacillus anthracis’ (ज्यामुळे ऍन्थ्रॅक्स होतो) आढळला आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार ‘युनिट ७३१’ नावाच्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी कैद्यांना जाणीवपूर्वक रोगजंतुंनी संक्रमित करून विषाणू अस्त्र तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी झालेल्या दुसऱ्या अभ्यासात तीन मातीच्या नमुन्यांमध्ये ‘B. anthracis’ आढळल्याचे गिझमोदोने नोंदवले आहे.
बीजिंग येथील अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी या ठिकाणाचे विश्लेषण केले आणि युनिट ७३१ मध्ये झालेल्या अत्याचारांविषयीचे निष्कर्ष २० नोव्हेंबर रोजी ‘Emerging Infectious Diseases’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन निबंधात मांडले आहेत. “Bacillus anthracis (अॅन्थ्रॅक्स) हा विषाणू जैवयुद्ध किंवा जैवदहशतवादाच्या (बायोटेररिझम) दृष्टीने सर्वात गंभीर आणि धोकादायक घटकांपैकी एक मानला जातो,” असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान जैवयुद्धासाठी ‘Bacillus anthracis’ चा वापर झाल्याच्या नोंदी असल्या तरी त्यासाठीचे पुरावे मर्यादित राहिले आहेत.
अधिक वाचा: Moinuddin Chishti: अजमेर दर्ग्याचा पाया रोवणारे सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती कोण होते?
जीवाणू अस्त्र (Biological Weapons) म्हणजे जीवाणू, विषाणू किंवा इतर सूक्ष्मजंतूंचा उपयोग करून शत्रूच्या मनुष्यबळ, प्राणी, अथवा पायाभूत सुविधांवर परिणाम घडविण्यासाठी तयार केलेली शस्त्रे. ही शस्त्रे नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या किंवा जनुकीयदृष्ट्या सुधारित सूक्ष्मजीवांवर आधारित असतात. जीवाणुस्त्रात ‘Bacillus anthracis’ (अॅन्थ्रॅक्स), ‘Yersinia pestis’ (प्लेग), आणि ‘Clostridium botulinum’ (बोटुलिझम) यासारखे विषाणू वापरले जातात. याचा परिणाम संसर्गजन्य आजार, मोठ्या प्रमाणावर मृत्यू किंवा दीर्घकालीन पर्यावरणीय नुकसान अशा स्वरूपात होतो. जैवशास्त्राचा उपयोग युद्धात प्राचीन काळापासून होत आला आहे. आधुनिक काळात दुसऱ्या महायुद्धात आणि शीतयुद्धाच्या काळात जीवाणुस्त्रांचा वापर किंवा संशोधन प्रचलित होते. जीवाणुस्त्राचा अतिरेकी किंवा अनियंत्रित वापर गंभीर जागतिक आरोग्य संकटांना कारणीभूत ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय करार जसे की ‘Biological Weapons Convention (BWC)’, जीवाणुस्त्रांच्या उत्पादनावर आणि वापरावर बंदी घालतात. जीवाणुस्त्रांच्या वापराची नैतिक, वैद्यकीय आणि पर्यावरणीय परिणामांची दखल घेत जगभरात त्यांच्याविरुद्ध कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
शास्त्रज्ञ इतर WW-II साइट्सवर अशाच अवशेषांचा इशारा देतात
अॅन्थ्रॅक्स हा प्राणघातक ठरू शकतो, ज्यामध्ये संक्रमित व्यक्तीला काळे व्रण, गळा सुजणे, ताप, मळमळ आणि श्वास घेण्यात अडचण येते. शास्त्रज्ञांनी नमुन्यांमधून या रोगाला कारणीभूत असलेल्या जीवाणूचे आनुवंशिक घटक वेगळे करून त्याची उपस्थिती निश्चित केली. त्यानंतर त्याच्या भौतिक, जैवरासायनिक आणि आनुवंशिक गुणधर्मांचे विश्लेषण करण्यात आले. संशोधकांनी वेगळ्या केलेल्या जीवाणूच्या प्रकाराचा जीनोम क्रमदेखील शोधून महत्त्वाचे जीन ओळखले. “सकारात्मक नमुन्यांचे वितरण, वेगळ्या केलेल्या प्रकाराचे गुणधर्म आणि ऐतिहासिक दस्तऐवज यांचे विश्लेषण करून आम्ही पुराव्यांची साखळी तयार केली, जी सिद्ध करते की ‘B. anthracisचा अमानवीय वैद्यकीय प्रयोगांमध्ये आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जैविक शस्त्र विकसित करण्यासाठी वापर करण्यात आला होता,” असे संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले. प्रयोगशाळेच्या जवळील इतर १२ ठिकाणांहूनही नमुने घेतले गेले, परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी ‘B. anthracis’चे कोणतेही अंश आढळले नाहीत. यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की सकारात्मक नमुन्यांमध्ये आढळलेले जीवाणू स्थानिक वातावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात नव्हते. त्यांनी इशारा दिला आहे की, योग्यप्रकारे उपाययोजना न केल्यास दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित इतर ठिकाणांवर सापडणाऱ्या अशाच अंशांमुळे केवळ मानवच नाही, तर प्राणी आणि निसर्गही संक्रमित होण्याचा धोका आहे