चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारपासून (२० मार्च) हा दौरा सुरू झाला असून जिनपिंग यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वागत केले आहे. आपल्या या दौऱ्यात शी जिनपिंग रशिया-युक्रेन युद्धावर रचनात्मक आणि शांततापूर्ण चर्चेसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र एकीकडे या युद्धामुळे पाश्चिमात्त्य देशांकडून रशियाला विरोध होत आहे. अनेक देशांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लादलेले आहेत. तर दुसरीकडे शी जिनपिंग रशिया दौऱ्यावर असल्यामुळे जागतिक राजकारणात वेगवेगळ्या वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या दौऱ्यामुळे जागतिक पटलावर युक्रेनच्या पाठीशी उभे असलेल्या पाश्चिमात्त्य देशांना चीनने संदेश दिल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिनपिंग-पुतीन यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय आहे? या भेटीच्या माध्यमातून चीनला नेमकं काय साध्य करायचं आहे? या सर्व बाबी जाणून घेऊ या.

हेही वाचा >>> विश्लेषण : डोनाल्ड ट्रम्प यांना अटकेची भीती का सतावतेय? पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलचा नेमका आरोप काय आहे?

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

चीन-रशियामध्ये निर्माण झाली जवळीक

रशिया-युक्रेन युद्धात चीन मध्यस्थ म्हणून नेमकी काय भूमिका पार पाडणार याकडे पाश्चिमात्य देशांचे विशेष लक्ष आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर साधारण वर्षभरानंतर शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांची मॉस्को येथे भेट झाली होती. चीन आणि रशिया औपचारिक मित्र नाहीत. म्हणजेच शस्त्र आणि शस्त्रास्त्र पुरवठ्याच्या बाबतीत ते एकमेकांप्रति वचनबद्ध नाहीत. मात्र या दोन्ही देशांमध्ये मागील काही वर्षांपासून जवळीक निर्माण झाली आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर एकीकडे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादलेले आहेत. असे असतानाच दुसरीकडे चीन आणि रशिया यांच्यात ही जवळीक वाढलेली आहे. या वाढत्या मैत्रीच्या मदतीने अमेरिकेचा प्रभाव आणि शक्ती कमी करण्याचा या दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांना खरेच अटक होणार?

मध्य आशियावर प्रभुत्व मिळवण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये कायम स्पर्धा

रशिया आणि चीन यांच्यात पहिल्यापासूनच सलोख्याचे संबंध नाहीत. १९६० च्या दशकात हे दोन्ही देश एकमेकांचे शत्रू होते. १९६९ सालात या दोन्ही देशांतील सीमावादामुळे अणुयुद्धाची स्थिती निर्माण झाली होती. मध्य आशिया हा प्रदेश रशियासाठी पूर्वीपासूनच महत्त्वाचा राहिलेला आहे. मात्र हा प्रदेश पुढे चीनसाठी भू-राजकीय आणि आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा ठरत गेला. याच कारणामुळे मध्य आशियावर प्रभुत्व मिळवण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये कायम स्पर्धा राहिलेली आहे. कधीकाळी सोव्हियत युनियनचा भाग असलेल्या उझबेकिस्तान, कझाकस्तान हे देश सुरक्षेच्या दृष्टीने रशियावर अवलंबून आहेत. तर दुसरीकडे या देशांत चीन रेल्वेमार्ग, महामार्ग, उर्जावहनासाठी पाईपलाईन्स उभारत आहे. मध्य आशियावर प्रभुत्व मिळवण्यासाठी या दोन्ही देशांत अशा प्रकारे स्पर्धा लागलेली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : Gudhipadwa 2023: कोण होता चष्टन क्षत्रप आणि काय आहे शालिवाहन शक?

शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांचे संबंध कसे आहेत?

युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जिनपिंग आणि पुतिन यांनी आपल्या मैत्रीबद्दल अनेकवेळा उघड प्रतिक्रिया दिलेली आहे. आमच्या मैत्रीला मर्यादा नाही, असे हे द्वयी अनेकवेळा म्हणालेले आहेत. व्लादिमीर पुतीन हे माझे सर्वांत चांगले मित्र आहेत, असे उद्गार शी जिनपिंग यांनी काढलेले आहेत. तर २०१८ साली रशियामधील इकोनॉमिक फोरमदरम्यान हे द्वयी सोबत चहापान करताना दिसले होते. २०१९ साली शी जिनपिंग यांच्या वाढदिवसानिमित्त पुतीन यांनी त्यांना खास केक आणि आईसक्रीमचा मोठा बॉक्स भेट म्हणून दिला होता. या भेटवस्तू आणि एकमेकांप्रति दाखवलेल्या स्नेहामुळे आमच्यातील मैत्री वृद्धींगत होत आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न या द्वयींकडून करण्यात आला. चीमधील स्थानिक वृत्तपत्रानुसार आमच्यात चांगले संबंध आहेत. मागील काही वर्षांमध्ये आम्ही आतापर्यंत ४० वेळा भेटलेलो आहोत, असे उद्गार पुतीन काढलेले आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘आयसिस’चे ‘फायटर ड्रग’ काय आहे? या अमली पदार्थाची भारतातून तस्करी कशी केली जाते?

चीन आणि रशियामध्ये आर्थिक संबंध कसे आहेत?

रशियाने २०१४ साली युक्रेनवर पहिल्यांदा आक्रमण केले होते. तेव्हापासून चीन आणि रशिया यांच्यातील आर्थिक संबंध वृद्धिगंत होत गेले आहेत. २०१४ साली रशियाने जेव्हा क्रिमियावर ताबा मिळवला होता, तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. या निर्बंधांदरम्यान चीनने रशियाची मदत केली होती. मागील वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर अनेक पाश्चिमात्त्य देशांनी रशियावर वेगवेगळे आर्थिक निर्बंध लादले. या काळात रशिया ज्या वस्तू पाश्चिमात्त्य देशांकडून खरेदी करायचा, त्या वस्तू चीनने रशियाला पुरवल्या. यामध्ये स्मार्टफोन, कॉम्प्यूटर चीप्स, लष्करासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तूंसाठी कच्चा माल चीनने या काळात रशियाला पुरवला. एकूणात रशिया-युक्रेन युद्धानंतर चीन आणि रशिया यांतील व्यापारात वृद्धी झाली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : खलिस्तानवाद्यांकडून तिरंग्याचा अवमान; भारताने आठवण करून दिलेले ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’ काय आहे?

व्लादीमीर पुतीन यांना चीनकडून काय अपेक्षा आहेत?

युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. त्यामुळे चीन-रशिया मैत्रीच्या माध्यमातून रशियन अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, हा मुख्य उद्देश पुतीन यांचा आहे. रशियासाठी चीन हा वाढती गुंतवणूक आणि व्यापारासाठी योग्य पर्याय आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्त्य देशांनी रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायुची खरेदी करण्यावर मर्यादा आणली. या पडत्या काळात उर्जेची खरेदी करत चीनने रशियाला एका प्रकारे मदतच केली आहे. या युद्धादरम्यान चीनने रशियाला काही युद्धसामुग्री तसेच शस्त्रे दिल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातो. मात्र चीनने हा दावा फेटाळलेला आहे. असे असले तरी संरक्षण क्षेत्रातही रशियाला चीनकडून अपेक्षा आहेत.

रशिया-युक्रेन युद्धावर चीनची भूमिका

रशिया-युक्रेन युद्धाबाबबत चीनने कायम तटस्थ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र चीनने रशियाच्या भूमिकेचे समर्थन करत या युद्धासाठी अमेरिका आणि नाटो देशांना जबाबदार ठरवलेले आहे. चीनने रशियाला जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण : बंद लिफाफ्यावरून सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड का संतापले? बंद लिफाफ्याची प्रथा वैध आहे?

शी जिनपिंग यांना रशियाकडून काय हवे आहे?

पाश्चिमात्त्य देश तसेच अमेरिकेचा सामना करण्यासाठी रशियाने आमची साथ द्यावी, अशी चीनची इच्छा आहे. अमेरिकेकडून चीनच्या वाढत्या वर्चस्वाला विरोध केला जातो, अशी चीनची भूमिका आहे. अमेरिकेच्या या कथित प्रयत्नांवविरोधात शी जिनपिंग यांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतलेली आहे. याचाच एक भाग म्हणून जिनपिंग चीनी कंपन्यांना पाश्चिमात्त्य देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन करतात.

हेही वाचा >>>विश्लेषण : ॲमेझॉन आणखी नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; या कपातीचा भारतावर काय परिणाम होणार?

दरम्यान, रशिया आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांच्या या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या भेटीमुळे जागतिक राजकारणात काय बदल होणार? रशिया आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.