संदीप कदम

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला स्थान देण्यात आले आहे. अंतिम ११ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळते का, हा उत्सुकतेचा विषय ठरेल. यशस्वीची कामगिरी नजीकच्या काळात कशी राहिली, निवड समितीने त्याचा कसोटी संघात का समावेश केला, त्याला येणाऱ्या सामन्यांमध्येही संधी मिळेल का, याचा हा आढावा.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Tamil Nadu, Governor Ravi, Governor Ravi address,
विश्लेषण : तमिळनाडूत सलग तिसऱ्या वर्षी राज्यपाल रवी यांचा अभिभाषणापूर्वीच सभात्याग, राज्यपालांचे अभिभाषण बंधनकारक असते का?

‘आयपीएल’मधील यशस्वीची कामगिरी कशी होती?

यशस्वीने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (आयपीएल) त्याने चुणूक दाखवली. राजस्थान रॉयल्सकडून २०२२च्या हंगामात यशस्वीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. १० सामन्यांत त्याला २५८ धावाच करता आल्या. मात्र, एका महिन्यापूर्वी पार पडलेल्या २०२३च्या हंगामात यशस्वीने १४ सामन्यांत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. १२४ ही त्याची ‘आयपीएल’मधील सर्वोत्तम खेळी ठरली. त्याच्या या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधले. अनेक आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध हा डावखुरा फलंदाज लिलया खेळताना दिसला. विशेष म्हणजे ‘आयपीएल’मधील त्याची सर्वोत्तम खेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आली.

१९ वर्षांखालील विश्वचषक व स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वीने कशी छाप पाडली?

यशस्वीला भारताच्या कसोटी संघात आता संधी मिळाली असली, तरी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर तो खेळला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यशस्वी भारतीय संघात होता. या स्पर्धेत यशस्वी सर्वोत्तम खेळाडू म्हणून ठरला होता. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक ४०० धावा केल्या. या स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यातील त्याची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ११३ चेंडूंत नाबाद १०५ धावांची खेळी केली. अंतिम सामन्यातही त्याने ८८ धावांची निर्णायक कामगिरी केली. यशस्वीने मुंबईकडून खेळताना प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही छाप पाडली आहे. त्याने प्रथमश्रेणीतील १५ सामन्यांत १८४५ धावा केल्या. त्यामध्ये २६५ ही त्याची सर्वोत्तम खेळी केली. स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्येमध्ये त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा तर, ट्वेन्टी-२०च्या ५५ सामन्यांत १५२८ धावा केल्या आहेत.

विश्लेषण : जनरल इलेक्ट्रिक आणि हिंदुस्तान एरॉनॉटिक्स यांच्यातील जेट इंजिन करार काय आहे?

यशस्वीला भारतीय संघात का स्थान देण्यात आले?

यशस्वी हा सलामीवीर आहे. भारतीय संघ गेल्या काही काळापासून चांगल्या सलामीच्या जोडीच्या शोधात आहे. सुरुवातीला रोहितसोबत मयांक अगरवालला संधी देण्यात आली. त्यानंतर केएल राहुल आणि आता शुभमन गिलला संधी मिळाली. गेल्या काही सामन्यांत गिल आणि रोहित सलामीला येत आहेत. मात्र, या जोडीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यशस्वी हा डावखुरा फलंदाज असून सलामीला नव्या चेंडूचा सामना करण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तसेच संयमी फलंदाजीशिवाय तो आक्रमक खेळी करण्यासही सक्षम आहे. ‘आयपीएल’च्या निमित्ताने त्याला अनेक आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा सामना करण्याचा अनुभव आहे. रोहित व गिल सलामीला आल्यास यशस्वी तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकेल.

यशस्वीची क्रिकेटमधील वाटचाल कशी राहिली?

उत्तर प्रदेशहून क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या यशस्वीचा प्रवास हा आव्हानांनी भरलेला आहे. राहण्याची सोय नसल्याने तो अनेकदा मैदानातील तंबूत राहिला आहे. स्वत:कडे पैसे नसल्याने त्याला इतर ठिकाणी सुविधा करणेही कठीण होते. २०१३ मध्ये त्याचा परिचय प्रशिक्षक ज्वाला सिंह यांच्याशी झाला. त्यानंतर यशस्वीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्वाला यांनी त्याला आपल्या घरात राहण्यास दिले. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा खेळण्यापूर्वी त्याने मुंबईकडून छत्तीसगडविरुद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक लक्षवेधी खेळी केल्या. तसेच ज्या ‘आयपीएल’मध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे, तीच ‘आयपीएल’ पडद्यावर पाहण्यासाठी तो एकवेळ झाडावर चढला होता.

विश्लेषण : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची कामगिरी विशेष का?

‘‘मी जे स्वप्न पाहिले, ते हेच आहे,’’असे भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर यशस्वी म्हणाला. ‘‘मी नेहमीच क्रिकेट खेळावर मनापासून प्रेम केले. मी क्रिकेटपटू बनण्याच्या निर्णयावर ठाम राहिलो. मला भविष्यात काय होणार याची कल्पना नाही. मी चांगली कामगिरी केली, तर त्या कामगिरीत सातत्य ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मला नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यास आवडते. तसेच, मी जितक्या चुका करेन त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करेन,’’ असे यशस्वीने सांगितले.

Story img Loader