मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्राप्तिकर विभागाने चौकशी केली आणि या चौकशीत आढळली एक डायरी. या डायरीत ५० लाखांचं घड्याळ, दोन कोटी रुपयांची भेटवस्तू अशा महागड्या नोंदी आढळून आल्या आहेत. ‘मातोश्री’ला २ कोटींच्या भेटवस्तू दिल्याचं या डायरीत नमूद करण्यात आलं आहे. यावरूनच आता राज्यातल्या राजकारणातल्या निखाऱ्याला हवा मिळाली आहे. पुन्हा एकदा एका नव्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांना आरोप-प्रत्यारोपांच्या, टीकाटिपण्ण्यांच्या फैरी झाडण्याची संधी मिळाली आहे.


‘मातोश्री’ला २ कोटींच्या भेटवस्तू? याचा अर्थ काय?


यशवंत जाधवांनी दिलं स्पष्टीकरण

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली


यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली डायरी सापडली आहे. अधिकार्‍यांना या डायरीत ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची आणखी भेटवस्तू दिलेल्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, यशवंत जाधव यांनी डायरीतील नोंदींमध्ये ‘मातोश्री’ हा आपल्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, डायरीतील पहिली नोंद त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त घड्याळ वाटपाची होती आणि दुसरी नोंद गुढीपाडव्याला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू वाटपाची होती, असं स्पष्टीकरण जाधवांनी दिलं आहे.


किरीट सोमय्या कडाडले…


‘मातोश्री’ हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यानतंर महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे. “हद्द कर दी…यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे….वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख…जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??,” असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.


भाजपा नेत्यांची टोलेबाजी…


यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची अंमलबजावणी संचालया मार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौकशीतून कोणी सुटू शकणार नाही. आता खूप काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत की, “या डायरीत कोणत्या ‘मातोश्री’ची नोंद आहे, हे मला माहीत नाही. पण आता चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले, तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत”.

हेही वाचा – जाधवांच्या ‘मातोश्री’ची ईडी चौकशी करा! भाजपची मागणी


हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. हा उल्लेख ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाबत आहे की अन्य कोणाविषयी आहे, हा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँडिरग) प्रकार असून त्याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत पुढील आठवडय़ापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय राऊतांनी केली जाधवांची पाठराखण..


“मातोश्रीला म्हणजे आईला असू शकत नाही का? महाराष्ट्रात दान, धर्म करण्याची परंपरा आहे. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील. शिवसेनेत डायरी लिहिण्याची परंपरा नाही. ऐकून आम्हाला गंमत वाटली,” असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रोख आणि ५० लाखांचं घड्याळ दिल्याची नोंद; राऊत म्हणाले “ही परंपरा…”


“डायरी हा पुरावा असू शकत नाही. खोट्या डायऱ्या तयार केल्या जाऊ शकतात. जर भाजपाच्या प्रेरणेने तपास यंत्रणा खोटे पुरावे, गुन्हे, खटले तयार करत असतील तर कशावरुन खोट्या डायऱ्या केल्या नाहीत. महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे, धमक्या दिल्या जात आहेत की महाग पडेल म्हणजेच खोट्या डायऱ्या तयार करु,” असा आरोप संजय राऊतांनी केला.


अजित पवारांनी खडसावलं, म्हणाले…


“तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करेल. अशा प्रकारच्या चौकशा ज्यावेळी होतात त्यावेळी तुम्ही विचारता. पण यामध्ये यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना तुम्हा त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात,” असे अजित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा – “बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात”; यशवंत जाधव यांच्या डायरीवरुन अजित पवारांचे स्पष्टीकरण


राज्यातल्या महाविकास आघाडी नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी आणि त्यावरून भाजपाच्या विजयी आविर्भावातल्या प्रतिक्रिया ही गोष्ट आता काही नवी राहिलेली नाही. मात्र हे ‘मातोश्री’ आणि डायरी प्रकरण आता कुठपर्यंत जातंय, त्याचे सुगावे कोणापर्यंत पोहोचवतील, यशवंत जाधव प्रकरणाची मुळं कुठे असतील या सगळ्याविषयी जनतेसोबत राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र खरंखोटं तपासण्यासाठी काळ जाऊ द्यावा लागेल, असं दिसतंय.

Story img Loader