महेश सरलष्कर

लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले उत्तर प्रदेश हे राज्य नेहमीच केंद्रातील सत्तेत जाण्याचा मार्ग राहिले आहे. त्यामुळे या राज्याला देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनंतर उत्तर प्रदेशची चर्चा पुन्हा राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची व्यूहरचना, राज्यातील राजकारणावरील पकड आणि भाजपमधील स्थान यांचीही चर्चा होत आहे. यामागील कारणे आणि सद्यस्थितीचा घेतलेला आढावा…

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

महापौरपदाच्या निवडणुकीतील भाजपच्या निर्भेळ यशाचे श्रेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना का दिले जाते?

राज्यातील सर्वच्या सर्व महापालिकांमध्ये भाजपचा महापौर निवडून आला असून एकूण १४२० प्रभागांपैकी भाजपने सर्वाधिक ८१३, समाजवादी पक्षाने १९१, बहुजन समाजवादी पक्षाने ८५, काँग्रेसने ७७, अपक्षांनी २०८ तर अन्य पक्षांनी ४८ प्रभाग जिंकले. भाजपच्या या यशामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची शहरी भागांतील पकड अधिक घट्ट झाली आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योगींनी १३ दिवसांमध्ये झंझावाती ५० जाहीरसभा घेतल्या. राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपसाठी प्रचारातील हुकमी एक्का असतात, त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशमधील प्रत्येक निवडणुकीत आता योगी हाच भाजपचा एकमेव चेहरा झाल्याचे दिसत आहे. छत्तीसगढ, झारखंड, ओदिशा, तेलंगणा, बिहार, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये थेट निवडणुकीतून महापौर नियुक्त केले जातात. २०१७ मध्ये १६ पैकी भाजपचे १४ महापौर निवडून आले होते. २०१२ मध्ये राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता असताना १३ पैकी भाजपचे ११ महापौर निवडून आले होते.

योगींचे कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले?

उत्तर प्रदेशामध्ये विकासाला गती द्यायची असेल तर ट्रिपल इंजिन अधिक प्रभावी ठरेल, असा नारा योगींनी दिला. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. पण, कल्याणकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर स्थानिक प्रशासनाचा कारभारही भाजपच्या हाती द्या, असे आवाहन योगींनी भाषणांमधून केले. कर्नाटक व अन्य भाजपशासित राज्यांतील नेत्यांना योगींनी अप्रत्यक्षपणे स्थानिक स्तरावरील भक्कम नेतृत्वाचे महत्त्व उलगडून दाखवले. कर्नाटकमध्ये ‘डबल इंजिन’ सरकार असताना देखील भाजपचा दारुण पराभव झाला आहे.

द केरला स्टोरी : एखादी कलाकृती द्वेषमूलक ठरू शकते का? जाणून घ्या…

योगींच्या प्रचाराची त्रिसूत्री काय होती?

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या तीनही निवडणुकांमध्ये योगींनी शासन-प्रशासन, विकास आणि सुरक्षा असा त्रिसूत्री अजेंडा राबवला. केंद्राच्या व राज्याच्या योजना तळागळापर्यंत पोहोचवल्या जातील, पायाभूत विकासाचे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत, त्यातून स्थानिक स्तरावरही रोजगार मिळेल, गुंडांच्या मुसक्या आवळल्या जातील, राज्यात शांतता प्रस्थापित केली जाईल, हे सूत्र मतदारांपर्यंत पोहोचवण्यात योगी यशस्वी झाले. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न योगी सातत्याने करत असून हा अजेंडा प्रामुख्याने उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी असल्याचे मानले जात आहे.

अतिफ इक्बालसारख्या कुख्यात गुंडांचा खात्मा करून दिलेला संदेश योगींसाठी अनुकूल ठरला का?

गुंडांविरोधात दंडुका हे धोरण योगींनी गेली सहा वर्षे राबवले आहे. अतिफ इक्बाल अनेक कुख्यात गुंडांना अटक झाली. काही पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले. अतिफ इक्बाललाही अटक केली होती, त्यानंतर त्याची हत्या झाली. माफिया मुख्तार अन्सारी, विजय मिश्रा यांना तुरुंगात टाकले आहे. अनिल दुजानसारख्या गुंडांचा खात्मा करण्यात आला आहे. या पोलिसी कडक कारवायांमधून शहरी मध्यमवर्गामध्ये आपुलकी आणि विश्वास निर्माण करण्याचा योगींचा प्रयत्न दिसतो.

पसमांदा मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न योगी करत आहेत?

नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने ५९५ मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरवले होते. त्यातील बहुतांश पसमांदा असून ६० टक्के उमेदवार विजयी झाले आहेत. हिंदूमधील ओबीसींप्रमाणे मुस्लिमांमधील ओबीसी-गरीब समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशात भाजप करत आहेत. ही रणनीती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे भाजपला वाटते. गेल्या वर्षी हैदराबादमधील राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मोदींनी पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले होते. उत्तर प्रदेशात ते आता अमलात आले आहे. विजयी मुस्लीम उमेदवारांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरवले जाऊ शकते.

कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार; दोघांचा राजकीय इतिहास जाणून घ्या

मुस्लीमबहुल मतदारसंघांत नवे ‘एम-वाय’ समीकरण काय आहे?

गरीब मुस्लिमांचा विकास भाजपच करू शकतो. ज्या मुस्लिमांना नवे ‘एम-वाय’ समीकरण मान्य असेल त्यांनी भाजपला मते द्यावीत, असे आवाहन केले जात आहे. समाजवादी पक्षाचे ‘एम-वाय’ समीकरण म्हणजे मुस्लीम-यादव. पण, भाजपसाठी ‘एम-वाय’ म्हणजे ‘मोदी-योगी’! हे दोन नेते लोकसभा निवडणुकीत गरीब मुस्लिमांची मते मिळवून देऊ शकतात असे भाजपचे म्हणणे आहे.

समाजवादी पक्षाने बसपवर मुस्लिमांमध्ये फूट पाडल्याचा आरोप का केला आहे?

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीत १७ पैकी ११ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. मायावतींनी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुस्लीम उमेदवार देण्यावर भर दिला होता. मुस्लीम मतांमध्ये विभागणी झाल्यामुळे पराभव झाल्याचे समाजवादी पक्षाचे म्हणणे असून भाजप व बसपने जाणीवपूर्वक मुस्लीम मतांमध्ये फूट पाडल्याचा आरोपही केला आहे.