सध्या सर्वांनाच पाळीव प्राण्यांची आवड असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीच्या घरी मांजर, कुत्रे असतातच असतात. परंतु, एक देश असाही आहे की, जिथे हा ट्रेंड इतका वाढला आहे की, तेथील लोकांनी मुलांना जन्माला घालण्याऐवजी पाळीव प्राण्यांना घरात ठेवण्यात रस दाखवला आहे. गोल्डमन सॅक्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, २०३० पर्यंत चीनमध्ये लहान मुलांपेक्षा जास्त पाळीव प्राणी असतील. गोल्डमन सॅक्स विविध देशांच्या ट्रेंड्सचे निरीक्षण करते. त्यांनी अंदाज वर्तवला आहे की, पाळीव प्राण्यांची संख्या यावर्षी लहान मुलांच्या लोकसंख्येला ओलांडू शकेल.

चीनमधील तरुण पिढी मूल जन्माला घालण्यास तयार नसल्यामुळे हे घडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. “चीनमधील घटलेला जन्मदर आणि तरुण पिढीमध्ये पाळीव प्राण्यांची वाढती पसंती, यामुळे पुढील काळात प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे,” असे गोल्डमन सॅक्सने २८ जुलैच्या अहवालात म्हटले आहे. यामागील नेमके कारण काय? इतरत्रही हा ट्रेंड वाढण्याची शक्यता आहे का? सविस्तर जाणून घेऊ.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
Dog Sterilising Centre vasai virar
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले
चीनमधील घटलेला जन्मदर आणि तरुण पिढीमध्ये पाळीव प्राण्यांची वाढती पसंती, यामुळे पुढील काळात प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : सुनीता विल्यम्स २०२५ पर्यंत अंतराळातच राहणार? कारण काय? अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाची योजना काय?

लहान मुलांपेक्षा पाळीव प्राणीच जास्त

गोल्डमन सॅक्सच्या मते, २०३० पर्यंत चीनमध्ये शहरी पाळीव प्राण्यांची संख्या तेथील लहान मुलांपेक्षा जवळपास दुप्पट होईल. दशकाच्या अखेरीस देशात ७० दशलक्ष (सात कोटी) शहरी पाळीव प्राणी असतील, तर चार आणि त्याखालील मुलांची संख्या ४० दशलक्ष (चार कोटी) पेक्षा कमी होईल, असे चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीवरून सांगण्यात आले आहे, असे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. २०१७ साली चीनमधील चार व त्याखालील मुलांची संख्या ९० दशलक्ष (नऊ कोटी) इतकी होती. ‘इन्व्हेस्टमेंट बँके’च्या अहवालानुसार, पाळीव प्राण्यांच्या मालकीच्या वाढीमुळे २०३० पर्यंत पाळीव प्राण्यांच्या खाद्य बाजाराला १२ अब्ज डॉलर्सपर्यंत चालना मिळेल. त्यांनी असाही अंदाज वर्तवला की, देशात मांजरींची संख्या श्वानांपेक्षा जास्त असेल. कारण मांजरीला वाढवण्यासाठी कमी जागेची आवश्यकता असते, असे ‘सीएनबीसी’च्या वृत्तात नमूद करण्यात आले.

गोल्डमन सॅक्सच्या मते, २०३० पर्यंत चीनमध्ये शहरी पाळीव प्राण्यांची संख्या तेथील लहान मुलांपेक्षा जवळपास दुप्पट होईल. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, पाळीव प्राण्यांची संख्या वाढल्याने त्यांचे अन्न, खेळणी, आरोग्यसेवा आणि विविध सेवांमध्येदेखील वाढ होत आहे; ज्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. चायना पेट इंडस्ट्री ऑपरेशन स्टेटस आणि कन्झ्युमर मार्केट मॉनिटरिंग रिपोर्ट २०२३ ते २०२४ मध्ये असे आढळले आहे की, चीनची पाळीव प्राणी अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ८११.४ अब्ज युआन (११३.६ अब्ज डॉलर्स) पर्यंत पोहोचू शकते. जपान आणि अमेरिकेतही पाळीव प्राण्यांना तितकेच प्राधान्य दिले जाते, परंतु चीनच्या तुलनेत हे दोन देश पाळीव प्राण्यांच्या संख्येत अद्याप मागे आहेत. जपानमध्ये पाळीव प्राण्यांची संख्या सुमारे २० दशलक्ष (दोन कोटी) आहे, जी चार आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या संख्येच्या जवळपास चौपट आहे.

अमेरिका, जपानसारख्या अनेक देशांमध्येही हाच ट्रेंड

बिझनेस इनसाइडरशी बोलताना, न्यू हॅम्पशायर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि चीनमध्ये उद्योजकता व डिजिटल अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍या लिन झांग म्हणाल्या, “गोल्डमन सॅक्सच्या अंदाजाविषयी ऐकून मला फारसे आश्चर्य वाटले नाही. युरोप आणि पूर्व आशियातील सुरुवातीच्या विकसित देशांमध्येही हाच ट्रेंड पाहायला मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, पाळीव प्राणी अविवाहित आणि अपत्य नसलेल्या जोडप्यांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ज्यांची मुले त्यांच्यापासून वेगळी राहतात, अशा लोकांचे सोबती होतात. हे प्राणी त्यांच्यासाठी एका मानसिक आधारासारखे असतात.

घटता जन्मदर हा चिंतेचा विषय

चीनचा घटता जन्मदर हा चिंतेचा विषय ठरत आहे. देशाची लोकसंख्या २०२२ च्या तुलनेत २.०८ दशलक्ष कमी झाली असून गेल्या वर्षीच्या अखेरीस लोकसंख्या १.४०९ अब्ज एवढी होती. चीनमध्ये २०२३ मध्ये फक्त ९.०२ दशलक्ष मुलांचा जन्म झाला, हा आकडा रेकॉर्डवरील सर्वात कमी आकडा आहे. २० ते ३५ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये घट झाल्यामुळे २०३० पर्यंत चीनची लोकसंख्या सरासरी ४.२ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. अल्पवयीन लोकसंख्येमध्ये मुले जन्माला घालण्याची इच्छा नसल्यामुळे पुढेही हा जन्मदर घटण्याची दाट शक्यता आहे.

पाळीव प्राणी अविवाहित आणि अपत्य नसलेल्या तरुणांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ज्यांची मुले त्यांच्यापासून वेगळी राहतात, अशा लोकांचे सोबती होतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

जन्मदरातील घट रोखण्यासाठी विविध सवलती

एकेकाळी सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या चीनला गेल्या वर्षी लोकसंख्येच्या बाबतीत भारताने मागे टाकले होते. चीनची तरुण पिढी विवाहासदेखील मोठ्या प्रमाणात नकार देत आहे, हाही चिंतेचा विषय आहे. २०२३ मध्ये नवीन विवाहांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १२.४ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी २५ ते २९ वयोगटातील निम्म्याहून अधिक लोक अजूनही अविवाहित आहेत. २०१३ मध्ये देशात विवाह नोंदणी शिगेला पोहोचली होती आणि साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, गेल्या वर्षीपर्यंतची आकडेवारी पाहता यात हळूहळू घट होत गेली.

हेही वाचा : ‘या’ ठिकाणी पाण्याचे ४०० वर्षांतील सर्वाधिक तापमान; जलसृष्टी संकटात?

नवविवाहित जोडप्यांना रोख भेटवस्तू देणे, प्रजनन उपचार, बाल संगोपनासाठी अनुदान देणे यांसारख्या विविध सवलती देऊन चीन जन्मदरातील घट रोखण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, चिनी तरुण वाढत्या आर्थिक खर्चामुळे विवाह करण्यास नकार देत आहेत. कंटेन्ट क्रिएटर एमिली हुआंग यांनी फेब्रुवारीमध्ये ‘बिझनेस इनसाइडर’ला सांगितले की, हे काम संपवल्यावर म्हणजे यातून निवृत्ती घेतल्यावर तिला निधी कसा मिळेल याची काळजी वाटते. “मी माझ्या उत्पन्नाचा काही भाग मुलांवर खर्च करणे निवडणार नाही, कारण ते अतिशय खर्चिक आहे. माझ्या सध्याच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार मला असे वाटते की, मी लवकर निवृत्त होऊ शकत नाही.”

Story img Loader