जगभरात अब्जावधी नेटकरी यूट्यूब वापरतात. यूट्यूबच्या मध्यमातून नवनवीन व्हिडीओंची मेजवानी वापरकर्त्यांना मिळते. याच कारणामुळे यूट्यूब वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे यूट्यूबची लोकप्रियता वाढत असल्यामुळे या माध्यमावर क्रिएटर म्हणून व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच कारणामुळे कन्टेंट क्रिएटर्सना चालना देण्यासाठी यूट्यूब नेहमीच नवनवीन फिचर्स लाँन्च करत असते. यावेळी यूट्यूब ‘यूट्यूब हँडल’ (YouTube handle) नावाची नवी संकल्पना राबवत आहे. आगामी काळात सर्वच कन्टेंट क्रिएटर्सना हे यूट्यूब हँडल दिले जाईल. याच पार्श्वभूमीवर हे नेमके काय आहे? ते समजून घेऊया.

हेही वाचा >> विश्लेषण: दिवाळीत हमखास दिली जाणारी ‘सोनपापडी’ नेमकी आली तरी कुठून? काय आहे या मिठाईचा इतिहास?

indian railway viral video
ट्रेनमधून प्रवास करताना ‘ही’ एक चुक पडू शकते महागात, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO 
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Women Singing Mere Humsafar Song During Antakshari
VIRAL VIDEO: जेव्हा अंताक्षरीत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही… ‘म’ अक्षरावरून गायलं गाणं, तरुणीच्या आवाजाने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी

यूट्यूबकडून आगामी काही दिवसांमध्ये यूट्यूब हँडल नावाची नवी संकल्पना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे. यूट्यूबकडून कन्टेंट क्रिएटर्सना त्यांचे यूट्यूब हँडल निवडण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून दिला जात आहे. यूट्यूबवरील पात्र कन्टेंट क्रिएटर्सना हा ऑप्शन दिला जातोय. काही क्रिएटर्सना तसे मेल तसेच यूट्यूब स्टुडिओवर नोटिफिकेशन्स येण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: जयललिता यांच्या मृत्यूचा अहवाल आणि बदलते राजकीय संदर्भ… शशिकला यांच्यावर ठपक्याचा काय अर्थ?

यूट्यूने आपल्या निवेदनात काय सांगितले आहे?

आगामी १४ नोव्हेंबरपर्यंत यूट्यूवरील कन्टेंट क्रिएटर्सनी त्यांच्या पसंदीचे यूट्यूब हँडल निवडले नसेल तर त्यांना यूट्यूबकडून आपोआप एक हँडल दिले जाईल. ते नंतर यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन बदलता येईल.

यूट्यूब हँडल काय आहे?

यूट्यू हँडलच्या माध्यमातून एखाद्या कन्टेंट क्रिएटरला शोधणे सोपे होणार आहे. यूट्यूबवर वेगवेगळ्या कन्टेंट क्रिएटरला वेगवेगळे यूट्यूब हँडल दिले जाईल. त्यामुळे फक्त यूट्यूब हँडलचे नाव सर्च केले तरी कन्टेंट क्रिएटरला शोधता येईल. कन्टेंट क्रिएटरलाही आपले सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी यूट्यूब हँडलची मदत होईल. उदाहरणार्थ एखाद्या कन्टेंट क्रिएटरचे यूट्यूब हँडल @user123 असे असेल तर तर त्याचे यूआरएल हे https://youtube.com/@user123. हे असे असेल. ज्यामुळे त्याला यूट्यूबवर शोधणे आणखी सोपे होईल.

हेही वाचा >> विश्लेषण: संघटना बांधणीसाठी मनसेचे मिशन-नागपूर, मिशन-बारामती? पण हा पक्ष खरोखर उरलाय किती?

हवे असलेले यूट्यूब हँडल नसल्यास काय करावे?

कधीकधी एखाद्या कन्टेंट क्रिएटरला त्याला हवे असलेले यूट्यूब हँडल उपलब्ध नसू शकते. त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. बहुतांशवेळा क्रिएटरला हवे असलेले हँडल अगोदरच कोणी घेतलेले असेल तर त्याला दुसरे हँडल निवडावे लागेल. त्यासाठी यूट्यूब कन्टेंट क्रिएटरला काही पर्याय सुचवेल. यूट्यूब कम्यूनिटी गाईडलाईन्सच्या विसंगत असल्यानंतरही क्रिएटरला एखादे यूट्यूब हँडल नाकारले जाऊ शकते.

हेही वाचा >> विश्लेषण: पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर; पण म्हणजे नेमकं काय? भारताचा विरोध का?

यूट्यूब हँडल कुठे कुठे दिसणार?

शॉर्ट्स टॅब, सर्च रिझल्ट, कमेंट्स विभाग, तसेच काही ठिकाणी मेन्शन करण्यासाठीही यूट्यूब हँडल दिसू शकेल.

क्रिएटर्सना यूट्यूब हँडलचा काय फायदा होणार?

शॉर्ट्स व्हिडीओंच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा फायदा होईल.

यूट्यूब हँडल्सच्या माध्यमातून एखादा क्रिएटर किंवा वापरकर्ता दुसऱ्या क्रिएटरला टॅग करू शकतो.

क्रिएटरचा शोध घेण्यासाठी यूट्यूब हँडलचा उपयोग करता येईल.

यूट्यूब हँडल्सच्या माध्यमातून एक क्रिएटर दुसऱ्या क्रिएटरशी जोडला जाईल.