मार्क झुकरबर्ग यांनी एलॉन मस्क यांच्या पावलांवर पाऊल ठेवत कंपनीच्या नियंत्रण धोरणांमध्ये आणि पद्धतींमध्ये मोठे बदल केले आहेत. झुकरबर्ग यांनी मंगळवारी (७ जानेवारी) ही घोषणा केली की, ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. एलॉन मस्क यांच्या ‘एक्स’वरील कम्युनिटी नोट्स मॉडलप्रमाणे हे मॉडेल असणार आहे. “राजकीय पक्षपाताच्या चिंतेमुळे तथ्य-तपासकांना काढून टाकण्याचा मेटाकडून निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत: अमेरिकेमध्ये याचे प्रमाण वाढत होते,” असे मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याऐवजी फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह मेटा प्लॅटफॉर्म, नोट्स मॉडेलवर लक्ष केंद्रित करेल, ज्याची सुरुवात अमेरिकेपासून होणार आहे, असेही ते म्हणाले. मेटाच्या तथ्य-तपासणी भागीदारांसह झुकरबर्गच्या निर्णयावर काहींना धक्का बसला आहे, तर एलॉन मस्क यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु, हा बदल नक्की काय आहे? वापरकर्त्यांवर या निर्णयाचा काय परिणाम होणार? यामुळे सोशल मीडियावर अफवांचे प्रमाण वाढणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

तथ्य तपासणी कार्यक्रम बंद

मंगळवारी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या कंपनीने ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये मार्क झुकरबर्ग यांनी मेटा प्लॅटफॉर्म म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्ससाठी करण्यात आलेल्या बदलांचे स्पष्टीकरण दिले. झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले, “जेव्हा आम्ही २०१६ मध्ये आमचा स्वतंत्र तथ्य तपासणी कार्यक्रम सुरू केला, तेव्हा आम्ही अगदी स्पष्ट होतो की, आम्हाला लोकांपर्यंत केवळ सत्य पोहोचवायचे आहे. आम्हाला जे साध्य करायचे होते ते अवघड होते. ही जबाबदारी स्वतंत्र तथ्य तपासणी संस्थांना सोपवण्यात आली होती. या स्वतंत्र तज्ज्ञांनी लोकांना ऑनलाइन पाहत असलेल्या गोष्टींबद्दल, विशेषत: व्हायरल फसवणुकीबद्दल अधिक माहिती द्यावी हा हेतू होता; जेणेकरून त्यांनी काय पाहिले आणि वाचले ते स्वतःच ठरवू शकतील. “विशेषत: अमेरिकेमध्ये अशा प्रकारे गोष्टी घडल्या नाहीत. तज्ज्ञ स्वतःचे पूर्वाग्रह आणि दृष्टिकोनानुसार काम करत होते. तथ्य काय आणि कसे तपासावे याबद्दल काहींनी केलेल्या निवडींमध्ये हे दिसून आले. कालांतराने आमच्याकडे खूप जास्त सामग्रीची सत्यता तपासली जाऊ लागली. त्यात कायदेशीर बाबी, राजकीय भाषण आदींचा समावेश होता.”

1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image Of Elon Musk And Priyanka Chaturvedi
Elon Musk : पाकिस्तानी Grooming Gangs चा मुद्दा भारतातही तापला, ठाकरे गटाच्या खासदाराला थेट एलॉन मस्क यांचा पाठिंबा
Ration Card
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम? वाचा!
Satya Nadella Praised Sharad Pawar for Agricultural Development Trust Baramati
Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!
Prithviraj Chavan on delhi Government
Prithviraj Chavan : “दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; स्पष्टीकरण देत म्हणाले…
झुकरबर्ग यांनी मंगळवारी (७ जानेवारी) ही घोषणा केली की, ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?

ते पुढे म्हणाले, “आम्ही आता हा दृष्टिकोन बदलत आहोत. आम्ही अमेरिकेतील सध्याचा तथ्य तपासणी कार्यक्रम संपवू आणि त्याऐवजी कम्युनिटी नोट्स प्रोग्रामकडे वळू. हा दृष्टिकोन ‘एक्स’वर काम करत असल्याचे आम्ही पाहिले आहे, जिथे ते त्यांच्या समुदायाला पोस्ट संभाव्यत: दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि अधिक संदर्भ आवश्यक आहेत हे ठरवण्यासाठी सक्षम करतात आणि लोक इतर वापरकर्त्यांना कोणत्या प्रकारचे संदर्भ पाहण्यासाठी उपयुक्त आहेत हे ठरवतात. आम्हाला असे वाटते की, लोकांना ते काय पहात आहेत याबद्दलची माहिती प्रदान करण्याचा आमचा मूळ हेतू साध्य करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो आणि जो पक्षपाती होण्याची शक्यताही कमी आहे.” विशेष म्हणजे, हे फक्त आमरिकेमध्येच लागू होईल असे वृत्त पॉलिटिकोने दिले. युरोपियन युनियनमध्ये तथ्य-तपासणी कार्यक्रम समाप्त करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही. धोरणातील बदलांमुळे वापरकर्त्यांना आता ‘स्त्रियांना घरातील वस्तू किंवा मालमत्ता’ आणि ‘ट्रान्सजेंडर किंवा नॉन-बायनरी लोक’ असा उल्लेख करता येईल.

२०१६ तील भूमिका आणि आताच्या निर्णयातील अंतर

मेटाची अमेरिकेमधील तथ्य-तपासणी बंद करण्याची योजना ही २०१६ मध्ये घेतलेल्या भूमिकेच्या उलट आहे. २०१६ मध्येच हा कार्यक्रम त्यांनी पहिल्यांदा सादर केला होता. त्या वेळी या कार्यक्रमामध्ये ९० पेक्षा जास्त संस्थांचा समावेश होता, ज्यांच्याकडे ६० पेक्षा जास्त भाषांमध्ये पोस्टची सत्यता तपासण्याचा अधिकार होता. अमेरिकेमध्ये त्यांनी PolitiFact आणि Factcheck.org सारख्या गटांचा समावेश केला आहे. त्यानंतर २०१९ मध्ये इन्स्टाग्राम आणि २०२४ मध्ये थ्रेड्सवर हा कार्यक्रम लागू करण्यात आला होता. फॅक्ट-चेकर्स जाहिराती, लेख, फोटो, व्हिडीओ, रील, ऑडिओ आणि फक्त मजकूर पोस्ट यांसह सामग्रीचे पुनरावलोकन करण्यास सक्षम होते.

या निर्णयामागील कारण काय?

अनेकांचा असा अंदाज आहे की, झुकरबर्ग यांचे पाऊल सध्याच्या राजकीय वातावरणाचा एक भाग आहे, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांची सत्तावापसी. बहुतेकांचे मत आहे की, मेटाचे हे पाऊल झुकरबर्ग यांनी अमेरिकेच्या निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षांना पसंती मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे. अलीकडच्या काळात ते ट्रम्प यांच्या दृष्टिक्षेपात येण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठी मेटाने एक दशलक्ष डॉलर्स देणगी दिली. मेटाने ट्रम्प यांच्या सहयोगी अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप सीईओ डाना व्हाईटट्रम्प यांना कंपनीच्या संचालक मंडळातदेखील जोडले. उल्लेखनीय म्हणजे, ट्रम्प अनेक वर्षांपासून मेटा आणि झुकरबर्ग यांचे कठोर टीकाकार राहिले आहेत. त्यांनी कंपनीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे आणि सत्तेत परत आल्यावर बदला घेण्याची धमकीही दिली होती. ६ जानेवारी २०२१ रोजी यूएस कॅपिटलवर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना फेसबुकवरून काढून टाकण्यात आले होते, मात्र कंपनीकडून २०२३ च्या सुरुवातीला त्यांचे खाते पुनर्संचयित करण्यात आले. परंतु, बदल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, आपण या निर्णयाने प्रभावित झालो आहोत.

मेटाची अमेरिकेमधील तथ्य-तपासणी बंद करण्याची योजना ही २०१६ मध्ये घेतलेल्या भूमिकेच्या उलट आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?

तथ्य तपासणी रद्द करणारी घोषणा करताना मार्क झुकरबर्गने मान्य केले की, “आम्ही आता कमी गोष्टींचा तपास करणार आहोत, परंतु आम्ही चुकीच्या पोस्ट आणि खात्यांची संख्यादेखील कमी करू.” झुकरबर्ग प्लॅटफॉर्मवरील तथ्य-तपासणी रद्द करण्याबद्दल चिंता व्यक्त करणारे एकटे नाहीत, समीक्षकांनीही या निर्णयामुळे चुकीच्या माहितीचा ओघ वाढेल अशी चिंता व्यक्त करत मार्क झुकरबर्ग यांच्यावर टीका केली आहे. “जेव्हा चुकीची माहिती आणि हानिकारक सामग्री पूर्वीपेक्षा वेगाने प्रसारित होत असताना सामग्री नियंत्रणासाठी हे एक मोठे पाऊल आहे,” असे नानफा सेंटर फॉर इन्फॉर्मेशन रेझिलिन्सचे सह-संस्थापक रॉस बर्ली यांनी ‘एएफपी’ला सांगितले.

मेटाचा आधीच चुकीच्या माहितीचा इतिहास राहिला आहे. २०१७ मध्ये ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने म्यानमारमध्ये रोहिंग्या लोकांविरुद्ध हिंसाचार भडकावण्यास मेटाच्या अल्गोरिदमचा सहभाग आढळून आला. २०२१ मधील एका वेगळ्या अभ्यासात असे आढळून आले की, लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुक २०२० च्या निवडणुकीशी संबंधित चुकीची माहिती सामायिक करणारे कोट्यवधी व्हिडीओ रोखू शकली असती, परंतु मेटा त्याचे अल्गोरिदम बदलण्यात अयशस्वी ठरली. परंतु, तथ्य-तपासणी सुरू झाल्यापासून नेचर ह्युमन बिहेवियर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे चुकीची माहिती कमी झाली आहे. झुकेरबर्गच्या या निर्णयाविषयी अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे की, हा व्यासपीठाद्वारे करण्यात आलेला जबाबदारीचा त्याग आहे.

हेही वाचा : आता गुन्हे करून परदेशात पळून जाणे अशक्य; ‘भारतपोल’ काय आहे? ते कसं काम करणार?

फ्री प्रेसमधील डिजिटल न्याय आणि नागरी हक्कांचे वरिष्ठ सल्लागार आणि संचालक नोरा बेनाविडेझ यांनी लॉस एंजेलिस टाईम्सला सांगितले की, फॅक्ट तपासण्याचे प्रमाण कमी करण्याचे मेटाचे नवीन वचन आश्चर्यकारक नाही. झुकेरबर्ग हे अनेक अब्जाधीशांपैकी एक आहेत, जे ट्रम्प यांच्यासारख्या धोकादायक व्यक्तीला मदत करत आहेत आणि पुढाकार घेत आहेत. इतर तथ्य-तपासकांनी सांगितले की, या निर्णयामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्रास होईल. जे निर्णय घेण्यासाठी अचूक, विश्वासार्ह माहिती शोधत आहेत, त्यांच्यावर याचा परिणाम होईल. मेटाच्या काही कर्मचाऱ्यांनीदेखील या निर्णयावर आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, फक्त स्वतःला कर्तव्यापासून मुक्त करणे म्हणजे एक सुरक्षित आणि संबंधित प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न करणे ही खरोखरच वाईट बाब आहे.”

Story img Loader